Lokmat Sakhi >Fitness > पोट, मांड्यांचा आकार वाढलाय-कपडे घट्ट होतात? ५ पदार्थ रोज खा, फॅट लॉसचा वेग वाढेल

पोट, मांड्यांचा आकार वाढलाय-कपडे घट्ट होतात? ५ पदार्थ रोज खा, फॅट लॉसचा वेग वाढेल

Foods for Weight Loss : बेली फॅट कमी करण्यासाठी सगळ्यात आधी इंसुलिन सेसिटिव्हीटी वाढवणं गरजेचं असतं. यासाठी आहारात बदल करायला हवा.  

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2023 02:00 PM2023-07-02T14:00:15+5:302023-07-03T13:11:34+5:30

Foods for Weight Loss : बेली फॅट कमी करण्यासाठी सगळ्यात आधी इंसुलिन सेसिटिव्हीटी वाढवणं गरजेचं असतं. यासाठी आहारात बदल करायला हवा.  

Foods for Weight Loss : Best Foods to Eat for Weight Loss What foods help burn belly fat | पोट, मांड्यांचा आकार वाढलाय-कपडे घट्ट होतात? ५ पदार्थ रोज खा, फॅट लॉसचा वेग वाढेल

पोट, मांड्यांचा आकार वाढलाय-कपडे घट्ट होतात? ५ पदार्थ रोज खा, फॅट लॉसचा वेग वाढेल

महिनोमहिनें वजन कमी होत नाही, शरीराचा आकार जास्तच बेढब होत चाललाय असे प्रोब्लेम्स अनेकांना उद्भवतात. बरेच  लोक बेली फॅट कमी करण्याच्या प्रयत्नात असतात. (What foods help burn belly fat) पण हवातसा रिजल्ट खूप  कमी लोकांना मिळतो. जोपर्यंत तुम्ही पोटाची चरबी वाढण्याची कारणं समजून घेत नाही आणि ही चरबी दूर घालवण्यासाठी योग्य आहार घेत नाही. (Foods to Help You Lose Weight) तोपर्यंत चांगले परिणाम दिसून येणार नाहीत. बेली फॅटचं सगळ्यात मोठं कारण इंसुलिन रेजिस्टेंस आहे. इंसुलिन रेजिस्टेंसमुळे पोटाच्या जवळपास चरबी जमा होते,  मानेवर पिग्मेंटेशन त्वचेवर डाग पडणं अशा समस्या उद्भवतात. (Best Foods to Eat for Weight Loss)

बेली फॅट कमी करण्यासाठी सगळ्यात आधी इंसुलिन सेसिटिव्हीटी वाढवणं गरजेचं असतं. यासाठी आहारात बदल करायला हवा.  मायक्रो न्युट्रिएंट्ससचा आहारात समावेश करून तुम्ही इंसुलिन सेंसिटिव्हीटी वाढवू शकता आणि बेली फॅट कमी करू शकता. आहारतज्ज्ञ मनप्रीत यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. (Foods for effective weight loss)

व्हिटामीन डी

इंसुलिन सेंसिटिव्हीटी सुधारण्यासाठी व्हिटामीन डी गरजेचं असतं. अनेकांना असं वाटतं की व्हिटामीन डी फक्त  हाडांना मजबूत बनवते. पण असं नाही. यामुळे शरीराला इतर फायदेही मिळतात. व्हिटामीन डी, इंसुलिन रेजिस्टंस कमी करते. इंसुलनित रेग्युलेट करण्यातही मदत करते. शरीरातील व्हिटामीन डी ची कमतरता पूर्ण करण्यासाठी रोज सकाळी ९ ते ११ च्या मध्ये १० ते १५ मिनिटं सुर्याची किरणं घ्यायला हवीत.

व्हिटामीन बी-12

शरीरातील व्हिटामीन बी-१२ अनेक समस्या कमी करू शकते. यातील एक इंसुलिन रेजिस्टेंटसही आहे. व्हिटामीन बी-१२ ब्लड शुगर लेव्हल  रेग्युलेट करण्यास मदत करते. यामुळे आहारात दूध, दही आणि पनीर यांचा आहारात समावेश करू शकता.

व्हिटामीन ई

व्हिटॅमिन ई तणाव आणि जळजळ कमी करून इन्सुलिन सेंसिटिव्हीटी सुधारते. जेव्हा आपण तणावाखाली असतो तेव्हा त्याचा थेट परिणाम शरीरातील इन्सुलिनच्या संवेदनशीलतेवर होतो. शरीरात व्हिटॅमिन ई संतुलित ठेवण्यासाठी तुम्ही सूर्यफुलाच्या बिया, बदाम आणि शेंगदाणे खावेत.

डाळ

डाळ हे भारतीय खाद्यपदार्थाचे मूळ अन्न आहे. पण या साध्या दिसणाऱ्या डाळीची खास गोष्ट म्हणजे वजन कमी करण्यास मदत होते. सर्व डाळी आणि सोयाबीन, राजमा, चणे, हरभरा, या सर्वांमध्ये फारच कमी चरबी आणि भरपूर प्रथिने असतात. कडधान्ये शिजवायलाही खूप सोपी असतात आणि ते खाल्ल्यानंतर लवकर भूक लागत नाही.

पालेभाज्या

पालक, मेथी, केल, लेट्युस यांसारख्या हिरव्या पालेभाज्यांमध्ये फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. वजन कमी करण्यासाठी हिरव्या पालेभाज्या सर्वोत्तम मानल्या जातात. या भाज्या दिवसभरात कोणत्याही स्वरूपात खाल्ल्याने शरीराला पूर्ण पोषण मिळते आणि वजन वाढत नाही. हिरव्या पालेभाज्या कच्च्या किंवा सॅलेडच्या स्वरूपात किंवा शिजवूनही खाता येतात

Web Title: Foods for Weight Loss : Best Foods to Eat for Weight Loss What foods help burn belly fat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.