Join us  

हाडांमध्ये कॅल्शियम कमी झालंय, गुडघे दुखतात? हे ८ पदार्थ खा, म्हतारपणाही मजबूत राहतील हाडं

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2023 8:37 AM

Foods High in Calcium Low Budget (Calcium kashatun milte) : आठ शाकाहारी पदार्थांचा आहारात समावेश करून तुम्ही कॅल्शियमची कमतरता भरून काढू शकता.

कॅल्शियम (Calcium) एक असा पदार्थ आहे  जो हाडांना मजबूत बनवतो. (Calcium rich foods) हाडांच्या चांगल्या आरोग्यासाठी तसंच   मसल्स फंक्शन आणि हेल्दी सेल्स फंक्शन्ससाठी कॅल्शियम सहाय्यक ठरते. (foods high in calcium low budget) शरीराला ब्लड प्रेशर रेग्युलेट करण्यासाठी, हॉर्मोन्स लेव्हल नियंत्रणा ठेवणण्यासाठी  कॅल्शियमची आवश्यकता असते. हाडं मजबूत ठेवण्यासाठी आहारात कोणकोणत्या पदार्थांचा समावेश करायला हवा ते पाहूया. (Foods For Calcium) आठ शाकाहारी पदार्थांचा आहारात समावेश करून तुम्ही कॅल्शियमची कमतरता भरून काढू शकता. (Calcium kashat aste)

१) दूध

दूध आणि दूधापासून तयार झालेले पदार्थ कॅल्शियमचा उत्तम स्त्रोत आहे. यामुळे  हाडं चांगली राहतात. जास्त कॅल्शियमयुक्त पदार्थ  खाल्ल्यास हाडं बळकट होतात.

२) बदाम

कॅल्शियम व्यक्तिरिक्त  बदामातही प्रोटीन्सही असतात. यात फॅटी एसिड्स, व्हिटामीन्स, एंटी ऑक्सिडेंट्स आणि प्रोटीन्सही असतात. बदाम हाडांना मजबूत ठेवण्यात मदत करते. पण गरजेपेक्षा जास्त बदाम खाऊ नका.

३) हिरव्या भाज्या

हिरव्या भाज्या पोषक तत्वांनी परिपूर्ण असतात. यात कॅल्शियमचे प्रमाणही जास्त असते. पालक आणि मेथी कॅल्शियमचे चांगले स्त्रोत आहे. यामुळे हाडं मजबूत राहण्यास मदत होते. 

४)  केळी

केळी मॅग्नेशियम,  कॅल्शियमचा  उत्तम स्त्रोत आहे. यामुळे हाडं आण दात चांगले राहतात. हाडांना मजबूत बनवण्यासाठी तुम्ही रोज केळी खाऊ शकता. रोज १ केळी खाल्ल्याने कमकुवत हाडांची समस्या टाळण्यास मदत होते. 

५) सोयााबीन

सोयााबीनमध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असते.  सोयाबीन तुम्ही ड्राय किंवा रोस्ट करून खाऊ शकता. जे लोक व्हिगन डाएटवर आहेत. त्यांच्यासाठी सोयाबीन कॅल्शिमयचे चांगले स्त्रोत आहे. 

पोट कमी करायचं-व्यायामासाठी वेळ नाही? ५ मिनिटं भिंतीला पाय लावा-झरझर घटेल चरबी

६) योगर्ट

कॅल्शियमचा एक चांगला सोर्स आहे. नॅशनल लायब्रेरी ऑफ मेडिसनच्या रिपोर्टनुसार योगर्ट प्रोबायोटिक्सचा चांगला स्त्रोत आहे. प्रोबायोटिक्समध्ये गुड बॅक्टेरिया असतात ज्यामुळे इम्यून फंक्शन बुस्ट होते इतर पोषक तत्वही मिळतात.

७)  चीया सिड्स

चीया सिड्स, आळशीच्या बीया, कलिंगडाच्य बीया यातूनही कॅल्शियम मिळते.  चिया सिड्समध्ये ओमेगा ३ फॅटी एसिड्स असतात. याशिवाय प्रोटीन्स आणि कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असते. 

८) शेंगदाणे

शेंगदाणेसुद्धा प्रोटीन्सचा एक उत्तम स्त्रोत आहे. शेंगदाणे खाल्ल्याने कॅल्शियमसुद्धा मिळते. रोज सकाळी नाश्त्याला किंवा जेवणात उकळलेले शेंगदाणे खाल्ल्यास तुम्हाला बरेच फायदे मिळतील.

टॅग्स :फिटनेस टिप्सहेल्थ टिप्सआरोग्यवेट लॉस टिप्स