Join us  

ना जीम ना डाएटची गरज;  घरीच रोज ५ पदार्थ खा,  पटकन वजन घटेल, स्लिम फीट दिसाल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2022 11:54 AM

Foods That Can Reduce Body Fat : मुळा ही कमी-कॅलरी भाजी आहे जी भरपूर फायबर देखील प्रदान करते.

वजन कमी करणं खूप  कठीण काम आहे. हिवाळ्यात भूक लागण्याचं प्रमाण वाढतं आणि लोक पोटभरून खातात. अशात जास्त कॅलरीजयुक्त पदार्थाचं सेवन केलं जातं. गोड पदार्थ खाण्यात येतात त्यामुळे वजन आणि शरीरातील चरबी कधी वाढत जाते कळत नाही.(Foods That Can Reduce Body Fat) एकदा वजन वाढलं की कमी करणं खूपच कठीण होतं.  वजन कमी करण्याचे वेगवेगळे प्रयत्न करूनही हवातसा परिणाम दिसत नाही. काहीजण जीमला जातात तर कोणी डाएट करतं. पण या दोन्ही गोष्टींमध्ये सातत्य नसल्यानं वजन कमी होत नाही. (Holistic nutritionist told 5 winter foods that can reduce body fat without exercise and workout)

न्युट्रिशनिस्ट शिखा अग्रवाल शर्मा  यांच्या मते, स्वयंपाकघरातील अनेक वस्तू आहेत ज्या प्रत्यक्षात फॅटमुक्त असतात आणि आपल्या शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करतात. हे कमी चरबीयुक्त पदार्थ पचनास मदत करतात आणि वजन कमी करण्यास देखील मदत करतात.

बीट 

बीटाच्या सेवनानं पचनक्रिया चांगली राहते. यूनाइटेड स्टेट्स डिपार्टमेंट ऑफ एग्रीकल्चरच्यामते (यूएसडीए) बीटाच्या १०० ग्राम सर्विंगमध्ये केवळ ४३ कॅलरीज असतात. आणि ०१२ ग्राम फॅट आणि १० ग्राम कार्बोहायड्रेट्स असतात. वजन कमी करण्यासाठी  बीट फायदेशीर ठरते. 

गाजर

हिवाळ्यात फ्रेश गाजर बाजारात बरेच दिसतात.  चवीला गोड, पौष्टीक गाजर पोषक तत्वांनी परिपूर्ण असतात. गाजरात फायबर्स जास्त असतात आणि कार्बोहायड्रेट्स कमी असतात. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी गाजर हा उत्तम उपाय आहे. 

पालक

वजन कमी करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात फायबरचे प्रमाण वाढवावे. यासाठी पालेभाज्यासारख्या उच्च फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करता येईल. पालक, मोहरीची पाने आणि मेथीची पाने यांसारख्या भाज्या वजन कमी करण्यास मदत करू शकतात कारण त्यात खूप कमी कॅलरीज असतात.

मुळा

मुळा ही कमी-कॅलरी भाजी आहे जी भरपूर फायबर देखील प्रदान करते. फायबर म्हणजे चांगले पचन आणि कमी पोटाची चरबी. मुळा पोट साफ करते आणि पचन सुधारते, तसेच बद्धकोष्ठता आणि अपचन सारख्या समस्यांपासून आराम देते.

पेरू

पेरूमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. दैनंदिन गरजेच्या 12% फायबर त्यात आढळतात. हिवाळ्यात या रसाळ मऊ फळाचे सेवन करा आणि वजन कमी करण्यात मदत होते. हे कमी उष्मांक असलेले अन्न पचन आणि चयापचय सुधारण्यासाठी उपयुक्त आहे.

टॅग्स :वेट लॉस टिप्सफिटनेस टिप्सहेल्थ टिप्सआरोग्य