Lokmat Sakhi >Fitness > कॅल्शियम हवं पण दूध नको? दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देतात ५ पदार्थ, हाडं होतील बळकट

कॅल्शियम हवं पण दूध नको? दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देतात ५ पदार्थ, हाडं होतील बळकट

Foods Which Are Milk Alternative To Make Strong Bone : आहारात कॅल्शियमचे सेवन वाढवण्यासाठी आहारात केल, पालक अशा हिरव्या भाज्यांचा समावेश करा.  

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2024 11:42 AM2024-06-28T11:42:57+5:302024-06-28T18:58:29+5:30

Foods Which Are Milk Alternative To Make Strong Bone : आहारात कॅल्शियमचे सेवन वाढवण्यासाठी आहारात केल, पालक अशा हिरव्या भाज्यांचा समावेश करा.  

Foods Which Are Milk Alternative To Make Strong Bone : Top 5 Non Dairy Foods That Help In Building Strong Bones | कॅल्शियम हवं पण दूध नको? दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देतात ५ पदार्थ, हाडं होतील बळकट

कॅल्शियम हवं पण दूध नको? दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देतात ५ पदार्थ, हाडं होतील बळकट

दूधाचे सेवन अनेकजण  करतात. दूध कॅल्शियमचा  एक चांगला स्त्रोत आहे. दुधाामुळे फक्त कॅल्शियमची कमतरता पूर्ण होत नाही तर दात मजबूत राहण्यासही मदत होते. (Fitness Tips) हाडं मजबूत करण्यासाठी तुम्ही दूधाचे सेवन करण्याऐवजी इतर पदार्थही खाऊ शकता.  ज्यामुळे शरीरात कॅल्शियमची कमतरता भासणार नाही. (Foods Which Are Milk Alternative To Make Strong Bone)

नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ हेल्थमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार एका दिवसात  ३ ग्लासपेक्षा जास्त दूध प्यायल्याने हिप्स फॅक्चरचा धोका वाढतो आणि मृत्यूदर दुप्पटीने वाढते. अशा स्थितीत दूध पिणं कमी करायला  हवं. (Ref) रिसर्चनुसार रोज फक्त १ ग्लास दूध पिणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. याचे अल्टरनेटिव्ह तुम्ही ट्राय करू शकता. आहारातज्ज्ञ अंजली मुखर्जी यांनी दुधाशिवाय कोणत्या पदार्थांचा आहारात समावेश करता येईल याबाबत सांगितले आहे. 

आहारात काळ्या तिळांचा समावेश करा

काळे आणि पांढरे तीळ आकारात लहान असले तरी कॅल्शियम बुस्टर आहे, जर तुम्ही रोज  आपल्या आहारात  १० ग्राम तिळाचे सेवन केले तर तुम्हाला ४० मिलीग्राम कॅल्शियम मिळेल. रोज २ ते ३ मोठे चमचे तिळाचे सेवन करू शकता. भाज्या, सूप, सॅलेडवर खाऊ शकता. ज्यामुळे पौष्टीकता वाढेल आणि हाडं चांगली राहतील.

बीन्स खाण्याचे फायदे

कॅल्शियमसाठी तुम्ही दुधाऐवजी डाळींचा आहारात समावेश करू शकता. १०० ग्राम राजमा, काबुली चणे, काळी डाळ, कुळीथ यात २०० मिलीग्राम कॅल्शियम असते. ज्यामुळे दिवसभरात कॅल्शियमची कमतरता भासत नाही. तुम्ही सॅलेडमध्ये मिसळूनही खाऊ शकतात. दूधातून तुम्हाला जास्त पोषण मिळेल.

हिरव्या पालेभाज्या खा

आहारात कॅल्शियमचे सेवन वाढवण्यासाठी आहारात केल, पालक अशा हिरव्या भाज्यांचा समावेश करा.   २४० ग्राम पालकात ३२२ मिलीग्राम कॅल्शियम असते. याच्या सेवनाने हृदयाचे आरोग्य चांगले राहते. 

भेंडी खा

अनेकांना भेंडी आणि ब्रोकोली  खायला अजिबात आवडत नाही. २ कप ब्रोकोलीमध्ये एक ग्लास दूधाइतके कॅल्शियम असते.  शरीराला मिळणारं कॅल्शियम लवकर शोषून घेतलं जातं. ज्यामुळे हाडांना योग्य प्रमाणात कॅल्शियम  मिळते. 

Web Title: Foods Which Are Milk Alternative To Make Strong Bone : Top 5 Non Dairy Foods That Help In Building Strong Bones

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.