Lokmat Sakhi >Fitness > बॉबी देओल सांगतो ४ महिने साखर सोडली आणि.. खरंच साखर सोडल्यानं वजन पटकन कमी होतं?

बॉबी देओल सांगतो ४ महिने साखर सोडली आणि.. खरंच साखर सोडल्यानं वजन पटकन कमी होतं?

For Animal, Bobby Deol gave up sweets for 4 months : ॲनिमल सिनेमातली बॉबी देओलची भूमिका गाजली, वेटलॉससाठी त्यानं बघा केला सोपा उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2023 04:16 PM2023-12-05T16:16:21+5:302023-12-05T16:17:25+5:30

For Animal, Bobby Deol gave up sweets for 4 months : ॲनिमल सिनेमातली बॉबी देओलची भूमिका गाजली, वेटलॉससाठी त्यानं बघा केला सोपा उपाय

For Animal, Bobby Deol gave up sweets for 4 months | बॉबी देओल सांगतो ४ महिने साखर सोडली आणि.. खरंच साखर सोडल्यानं वजन पटकन कमी होतं?

बॉबी देओल सांगतो ४ महिने साखर सोडली आणि.. खरंच साखर सोडल्यानं वजन पटकन कमी होतं?

सध्या सर्वत्र 'अॅनिमल' (Animal) चित्रपटाचा बोलबाला सुरु आहे. या चित्रपटाने कमी दिवसात बॉक्स ऑफिसवर बख्खळ कमाई केली. चाहत्यांना रणबीरचा अँग्री यंग मॅन रोल प्रचंड आवडलं तर, विलेनच्या दमदार भूमिकेत बॉबी देओलने (Bobby Deol) बाजी मारली. डायलॉग एक ही नसताना बॉबीची मुक्याची भूमिका प्रेक्षकांना भावली. विशेष म्हणजे छोटासा रोल असूनही, त्याचा इम्पॅक्ट खूप मोठा होता. मुक्याची भूमिका साकारून बॉबी रणबीरवरही भारी पडला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. याआधी त्यांचा 'क्लास ८३' आणि 'आश्रम' ही वेब सिरीज तुफान गाजली. पण 'अॅनिमल' चित्रपटातील विलेनची भूमिका प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहील. या व्यतिरिक्त त्यांच्या फिटनेसचीही (Fitness) चर्चा सोशल मीडियात होत आहे(For Animal, Bobby Deol gave up sweets for 4 months).

वयाच्या ५४ व्या वर्षीही इतकं फिट राहणं अनेकांना जमलेच असे नाही. सध्या त्यांच्या बॉडी ट्रान्सफॉर्मेशनची चर्चा होत असून, पिळदार शरीरयष्टी तयार करण्यासाठी बॉबीने ४ महिन्यांकरीता आवडती मिठाई खाणं सोडलं होतं. पण सध्या लोकांमध्ये असा प्रश्न निर्माण झाला आहे की, आहारातून गोड पदार्थ वगळल्याने खरंच वजन कमी होते का?

अस्ताव्यस्त सुटलेलं बेढब पोट उपाशी राहून पोट कमी होणार नाही, चरबी घटवण्यासाठी खा ४ पदार्थ

यासंदर्भात, इंडियन एक्सप्रेस डॉट कॉमला मुलाखत देताना, बेंगळुरूच्या मणिपाल हॉस्पिटलमधील थायरॉईड आणि डायबिटिज रुग्णांचे सल्लागार, एंडोक्रिनोलॉजिस्ट डॉ. अभिजीत भोगराज सांगतात, 'महिनोमहिने चहा, कॉफी, ज्यूस, मिठाई, बेकरी प्रॉडक्ट्स खाल्ले नाही तर, निश्चितच आपल्याला सुरुवातीला त्रास होईल. पण आहारातून गोड पदार्थ वगळल्याने वजन नक्कीच कमी होते. एक कप चहा - कॉफीमध्ये ५०० ते ७०० कॅलरीज असतात. त्यामुळे वेट लॉस करताना शक्यतो गोड खाणं टाळाच. जर आपण २ ते ३ महिन्यांसाठी साखर आहारातून वगळली तर नक्कीच, वजन कमी होईल.'

साखर आहारातून वगळण्याचे इतर फायदे

वजन कमी करण्यासाठी प्रभावी

तंदुरुस्त आणि सुडौल शरीर मिळविण्यासाठी संतुलित आहाराचे सेवन करायला हवे. ज्यामध्ये पुरेशा प्रमाणात प्रथिने, फायबर आणि पोषक तत्वांचा समावेश असेल. शिवाय मिठाई कमी खाणं किंवा बंद केल्याने वजन कमी होऊ शकते. परंतु, तांदूळ आणि गव्हासारख्या धान्यांमध्ये कर्बोदके असतात. जे सहजपणे रक्तात ग्लुकोजमध्ये रूपांतरित होतात. ज्यामुळे फॅट्सच्या रूपात ते पोटात जमा होतात.

मसल ब‍िल्डिंगसाठी करा २ काम

वजन कमी करण्यासाठी कमी कॅलरीजयुक्त आहाराचे सेवन करायला हवे. साखर न खाल्ल्याने फॅट्स कमी होतील. पण मसल ब‍िल्डिंगसाठी प्रोटीन डाएटसोबत नियमित व्यायाम करणं देखील गरजेचं आहे.

सारा अली खान आणि अनन्या पांडे ज्याच्या फॅन, त्या ओरीचा फिटनेस फंडा वाचा..उगीच नाही सेलिब्रिटी त्याच्यावर फिदा..

२ आठवड्यात सुटेल साखरेची सवय

भारतीय लोकं आपल्या आरोग्याकडे कमी लक्ष देतात. चव आणि सवयींमुळे ते आवश्‍यकतेपेक्षा जास्त मिठाईचे सेवन करतात. शिवाय अनेकांना चहाची सवय असते. जिथे चहा आला तिथे साखर आलीच. पण मिठाई किंवा गोड पदार्थ काही काळासाठी खाणं टाळा. २ आठवड्यात आपली गोड खाण्याची सवय सुटेल. जर गोड खाण्याची इच्छा झालीच तर, फळे खा.

शुगर एलीमिनेशन बेस्‍ड फॉर्मुला

वजन कमी करताना कॅलरीजवर विशेष लक्ष द्यायला हवे. त्यामुळे आहारातून गोड पदार्थ वगळायला हवेत. कारण त्यात अधिक प्रमाणात कॅलरीज असतात. तज्ज्ञ सांगतात, ८००० कॅलरीज कमी केल्यानंतर एक किलो वजन कमी होते. जर आपण दिवसात ४०० कॅलरीज बर्न करत असाल तर, २० दिवसात आपले एक किलो वजन कमी होऊ शकते. जर आपण व्यायाम देखील करत असाल तर, १० दिवसात आपले एक किलो वजन कमी होऊ शकते.

वजन कमी करण्यासाठी या गोष्टींकडेही लक्ष द्या

फक्त गोड सोडून वजन कमी होत नाही, तर इतरही काही गोष्टींकडेही लक्ष द्यायला हवे. जसे की, आहारात पौष्टीक पदार्थांचा समावेश, स्ट्रेस फ्री राहणे, उत्तम झोप घेणे, आराम करणे, वर्कआउट, यासह वेळोवेळी या गोष्टी पाळणे. 

Web Title: For Animal, Bobby Deol gave up sweets for 4 months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.