Lokmat Sakhi >Fitness > रोज रोज एकच व्यायाम, महाबोअर काम; शिल्पा शेट्टी सांगतेय व्यायामाचाही व्हरायटी स्पाइस, जरा हटके

रोज रोज एकच व्यायाम, महाबोअर काम; शिल्पा शेट्टी सांगतेय व्यायामाचाही व्हरायटी स्पाइस, जरा हटके

Fitness tips: रोज सकाळी उठून तोच तो व्यायाम करू नका.. तुमच्या डेली वर्कआऊटमध्ये व्हरायटी आणा.. असं सांगतेय फिटनेस फ्रिक अभिनेत्री शिल्पा शेट्टी (fitness mantra by Shilpa Shetty  ).. वाचा तिचं म्हणणं काय आहे ते..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2022 04:37 PM2022-01-22T16:37:51+5:302022-01-22T16:41:18+5:30

Fitness tips: रोज सकाळी उठून तोच तो व्यायाम करू नका.. तुमच्या डेली वर्कआऊटमध्ये व्हरायटी आणा.. असं सांगतेय फिटनेस फ्रिक अभिनेत्री शिल्पा शेट्टी (fitness mantra by Shilpa Shetty  ).. वाचा तिचं म्हणणं काय आहे ते..

For more fitness always try different types of workouts, says actress Shilpa Shetty ! | रोज रोज एकच व्यायाम, महाबोअर काम; शिल्पा शेट्टी सांगतेय व्यायामाचाही व्हरायटी स्पाइस, जरा हटके

रोज रोज एकच व्यायाम, महाबोअर काम; शिल्पा शेट्टी सांगतेय व्यायामाचाही व्हरायटी स्पाइस, जरा हटके

Highlightsवेगवेगळे वर्कआऊट ट्राय केल्यामुळे तुम्ही अधिक फोकस किंवा एकाग्र राहता आणि त्यामुळे तुमचा मेंदूही अधिक तल्लख, सजग राहतो.

शिल्पा शेट्टी म्हणजे बॉलीवूडच्या सुपरफिट अभिनेत्रींपैकी एक... म्हणूनच तर शिल्पा फिटनेसविषयी, हेल्थविषयी किंवा योगा, एखादं वर्कआऊट याविषयी काय शेअर करते आहे, हे जाणून घेण्यासाठी अनेक जण उत्सूक असतात. असंच एक फिटनेस सिक्रेट सध्या तिनं शेअर केलं आहे.. ती म्हणते की रोज सकाळी  उठून एकसारखा तोच तो व्यायाम करण्याचा जाम कंटाळा येतो ना.. म्हणूनच असं करूच नका.. व्यायामात व्हरायटीआणण्याचा प्रयत्न करा..

 

शिल्पाने तिचा आणि तिच्या ट्रेनरचा डान्स वर्कआऊटचा एक व्हिडिओ नुकताच इन्स्टाग्रामवर शेअर केला  आहे.. यामध्ये शिल्पा तिच्या ट्रेनरसोबत खूपच आनंदात आणि अतिशय उत्साहात वर्कआऊट करताना  दिसते आहे. हा व्हिडिओ शेअर करताना शिल्पाने जी पोस्ट टाकली आहे, त्यात ती म्हणते की जर तुम्ही  एकसारखा व्यायाम रोज- रोज करत राहिलात तर त्यामुळे तुमच्या शरीराचा फिटनेस खंडीत होऊ शकताे. आपल्या डेली वर्कआऊटमध्ये नेहमी व्हरायटी का ठेवली पाहिजे, याची तिने काही कारणं सांगितली आहेत, ती सगळ्यांनाच खूप उपयुक्त ठरणारी आहेत.

 

डेली वर्कआऊटमध्ये वेगवेगळे प्रकार सातत्याने करत राहिल्यामुळे होणारे फायदे.......
Benefits of doing different types of workouts

- तुम्ही काहीतरी नविन करता आहात याचा आनंद मिळतो आणि त्यामुळे वर्कआऊट करताना अधिक उत्साह येतो, अधिक मजा वाटते.
- यामुळे तुमची फिटनेस लेव्हल आणि स्टॅमिना वाढण्यास मदत होते. कारण एकच एक वर्कआऊट नेहमी केलं तर तुमच्या शरीराला त्याची सवय होऊन जाते. त्यामुळे शरीराला अधिक फिट करण्यासाठी अधिक व्हरायटी द्या..

- वेगवेगळे वर्कआऊट ट्राय केल्यामुळे तुम्ही अधिक फोकस किंवा एकाग्र राहता आणि त्यामुळे तुमचा मेंदूही अधिक तल्लख, सजग राहतो.

 

शिल्पाप्रमाणेच डान्स वर्कआऊट करण्याचे फायदे...
Benefits of dance workout

या व्हिडिओमध्ये शिल्पा डान्स वर्कआऊट करताना दिसते आहे. ती जे करते आहे त्याला Freestyle Aerobics program असं म्हणतात. यामध्ये एरोबिक्सप्रमाणेच तुम्हाला वेगवेगळ्या डान्स स्टेप करून वकआऊट करायचं असतं. पण फक्त या प्रकारात तुमच्या डान्स स्टेप्स एरोबिक्सपेक्षाही अधिक ग्रेसफुल, एनर्जेटिक असतात. शिल्पा म्हणजे की शरीरातील एक्स्ट्रा फॅट बर्न करण्यासाचा हा एक सगळ्यात मजेशीर मार्ग आहे. डान्स स्टेप्समुळे मेंदू अधिक शार्प होण्यास मदत होते. यावेळी होणाऱ्या बॉडी मुव्हमेंट्स तुमची cardiorespiratory health सुधारण्यासाठी मदत करतात. तुमचे शरीर खूप चांगल्या पद्धतीने टोन्ड होते.. त्यामुळे Freestyle Aerobics program हे एक कम्प्लिट पॅकेज आहे, असं शिल्पाचं म्हणणं आहे.. 

 

Web Title: For more fitness always try different types of workouts, says actress Shilpa Shetty !

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.