Lokmat Sakhi >Fitness > चहा कॉफी विसरा आता प्या प्रॉफी! वजन कमी करताना प्रॉफी पिण्याचा ट्रेण्ड, पण आहे काय ते?

चहा कॉफी विसरा आता प्या प्रॉफी! वजन कमी करताना प्रॉफी पिण्याचा ट्रेण्ड, पण आहे काय ते?

Proffee: What Is It & How to Make This Protein Coffee Recipe : प्री-वर्कआऊट ब्लॅक कॉफीची जागा प्रॉफीने घेतली आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2023 11:08 AM2023-02-16T11:08:42+5:302023-02-16T11:14:29+5:30

Proffee: What Is It & How to Make This Protein Coffee Recipe : प्री-वर्कआऊट ब्लॅक कॉफीची जागा प्रॉफीने घेतली आहे.

Forget tea coffee now drink profi! The trend of drinking pro for weight loss.... | चहा कॉफी विसरा आता प्या प्रॉफी! वजन कमी करताना प्रॉफी पिण्याचा ट्रेण्ड, पण आहे काय ते?

चहा कॉफी विसरा आता प्या प्रॉफी! वजन कमी करताना प्रॉफी पिण्याचा ट्रेण्ड, पण आहे काय ते?

आपल्यापैकी बरेचजण आजकाल चहापेक्षा कॉफी पिणे पसंत करतात. कामाचा ताण हलका करण्यासाठी, फ्रेश वाटण्यासाठी तसेच वजन कमी करण्यासाठी अनेकजण कॉफीचा पर्याय निवडतात. कॉफीचं नाव ऐकताच त्यातून मिळणाऱ्या उर्जेचं स्मरण अनेकांना होत. बरेचदा अनेकजण सकाळी उठल्याबरोबर त्यांना हातात कॉफीचा मग लागतो. काही जणांना कॉफी प्यायल्यानंतर अतिशय ताजेतवाने वाटते तर काही जणांना याचा फ्लेवर खूप चांगला वाटतो. साध्या कॉफीपासून ते अगदी कॅपेचिनो पर्यंत कॉफीचे असे असंख्य प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. 

फॅमिलीसोबत गेटटुगेदर असो किंवा मित्रमंडळींसोबतच रियुनियन असो, किंवा मग डेटवर जाणं असो. या सर्व खास भेटीगाठींची सुरुवात अनेकदा कॉफीने होते. वर्कआऊट करण्यापूर्वी काहीतरी हेल्दी ड्रिंक प्यायल्याने किंवा जेवण केल्याने आपल्याला वर्कआऊट करताना भरपूर ऊर्जा मिळते. प्री-वर्कआऊट ड्रिंक्सचा वापर प्रामुख्याने फिटनेस इंडस्ट्रीमध्ये केला जातो. आपल्यापैकी बरेचजण प्री-वर्कआऊट म्हणून ब्लॅक कॉफी पितात. परंतु आता या प्री-वर्कआऊट ब्लॅक कॉफीची जागा प्रॉफीने घेतली आहे. स्टेडफास्ट न्यूट्रिशनचे संस्थापक आणि न्यूट्रिशनिस्ट अमन पुरी यांनी प्रॉफी पिण्याचे नेमके काय फायदे आहेत ते समजावून सांगितले आहे(Proffee: What Is It & How to Make This Protein Coffee Recipe). 

प्रॉफी म्हणजे नेमकं काय ? 
प्रोटीन पावडर आणि कॉफी यांच्या एकत्रित मिश्रणापासून तयार होणाऱ्या पेयाला 'प्रॉफी' असे म्हटले जाते. 

प्रॉफी पिण्याचे फायदे :- 

१. वजन कमी करण्यास मदत होऊ शकते :- कॉफीमध्ये प्रोटीन पावडर घातल्याने वजन कमी होण्यास मदत होऊ शकते. कॉफीमध्ये प्रोटीन पावडर घालून कॉफी तयार केल्यास आपल्या शरीराची प्रोटीनची गरज थोड्या अधिक प्रमाणात भागवली जाते. प्रोटीन पावडरचे सेवन केल्याने आपले पोट पुढील बऱ्याच तासांसाठी भरलेले राहते. जेणेकरून आपल्याला वारंवार भूक लागत नाही. वारंवार भूक न लागल्यामुळे आपण फारसे काही खात नाही. त्याचबरोबर यामुळे आपली ओव्हर इटिंग किंवा कधीही काहीही खाण्याची सवय मोडते. वजन कमी करताना पुरेसे प्रोटीन खाल्ल्याने शरीरातील चरबी कमी होत असताना स्नायूंची  मजबुती राखण्याकरता फायदेशीर ठरते. 

२. दैनंदिन प्रोटीनची आवश्यकता पूर्ण करण्यास मदत करते :- दिवसभर आपण जे काही खातो त्यातून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे प्रोटीन, व्हिटॅमिन्स, मिनरल्स हे शरीराला मिळत असतात. जर आपण मसल्स वाढवू इच्छित असाल किंवा आपण जिम करत असाल तर अशा परिस्थिती आपल्या शरीराला भरपूर प्रमाणात प्रोटीनची गरज असते. काहीवेळा आपल्या रोजच्या आहारातून आपल्या शरीराला दैनंदिन हवे तेवढे प्रोटीन मिळत नाही. अशावेळी शरीराची दैनंदिन प्रोटीनची गरज भागवण्यासाठी आपण प्रॉफीचे सेवन करु शकता. सध्याच्या व्यस्थ जीवनशैलीमुळे आपण कधी कधी नाश्ता, दुपारचे जेवण स्किप करतो, किंबहुना आपल्याकडे तेवढा वेळ नसतो. अशावेळी दैनंदिन प्रोटीनची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी प्रॉफी हा उत्तम पर्याय आहे.  

 

३. वर्कआऊट केल्यानंतर शक्तीवर्धक म्हणून :- कॉफीमध्ये कॅफीन हा घटक असतो. कॅफीन हे एक नैसर्गिक उत्तेजक म्हणून ओळखले जाते. व्यायाम केल्यानंतर आपल्या शरीरातील स्नायू आकुंचन पावतात आणि आपल्याला थोडा थकवा येतो. वर्कआऊट केल्यानंतर शरीरातील स्नायूंना पोषण मिळवून देण्यासाठी आणि थकवा दूर करण्यासाठी वर्कआऊट केल्यानंतर शक्तीवर्धक पेय म्हणून प्रॉफी हा एक उत्तम पर्याय आहे. वर्कआऊट केल्यानंतर किमान ६० मिनिटांच्या आत प्रॉफी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. व्यायाम करताना स्नायूंना काही इजा झाली तर ते भरुन काढण्यासाठी, स्नायूंच्या वाढीसाठी, स्नायू मजबूत होण्यासाठी प्रॉफी फायदेशीर ठरते.   

 प्रॉफी कशी बनवायची?   
प्रॉफी बनवण्याची रेसिपी तुलनेने सोपी आहे आणि आपण घरी केव्हाही प्रॉफी बनवू शकतो. किचनमध्ये उपलब्ध असणाऱ्या साहित्यात प्रॉफी झटपट बनवून होते. 

कृती :- 

१. प्रॉफी बनवण्यासाठी मिक्सरमध्ये पाणी किंवा दूध (दोघांपैकी एक, आपल्या आवडीनुसार) आणि प्रोटीन पावडर घाला. हे सगळे मिश्रण मिक्सरमध्ये फिरवून एकजीव करून घ्यावे. 
२. आता या मिश्रणात आपल्या आवडीनुसार किंवा १ टेबलस्पून कॉफी घालावी. 
३. त्यानंतर आपल्या आवडीनुसार त्यात साखर घालावी, पण जर आपण डाएटवर असाल तर साखर घालणे टाळावे. 

४. आता हे सर्व मिश्रण मिक्सरमधून परत एकदा फिरवून घ्या. 
५. जर आपल्याला कोल्ड प्रॉफी हवी असल्यास मिक्सरच्या भांड्यातून प्रॉफी काढून ती १० मिनिटे फ्रिजमध्ये ठेवावी किंवा बर्फाचे खडे घालून सर्व्ह करावी. 
६. आपण जर गरमागरम प्रॉफी पिणे पसंत करत असाल तर मिक्सरच्या भांड्यातून प्रॉफी काढून ती एका भांड्यात घेऊन उकळी येईपर्यंत गरम करावी. 
अशाप्रकारे आपण गरम, थंड अशा दोन्ही रूपांत प्रॉफी पिण्याचा आनंद लुटू शकता.

Web Title: Forget tea coffee now drink profi! The trend of drinking pro for weight loss....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.