Join us  

अपचन वारंवार होते, गॅसेसचा त्रास होतो? ५ योगासने करा, त्रास होईल कमी..पचन सुधारेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2023 4:00 PM

Yogas for Indigestion हिवाळ्यात पचनाच्यासंबंधित अनेक समस्या उद्भवतात, वेळीच काळजी घेणं उत्तम. ५ योगासने करा मिळेल आराम..

असं म्हणतात की हिवाळ्याच्या दिवसात आपण दोन घास जास्तच खातो. गरमागरम, कुरकुरीत, चविष्ट पदार्थ खाण्याचा मोह आपल्याला आवरत नाही. मात्र, मसालेदार आणि तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे अनेकदा आपल्या पोटात गडबड होते. गॅस अॅसिडिटी आणि अपचनाची समस्या देखील खूप वाढते. याने आपल्या आरोग्यावर परिणाम तर होतोच, यासह अल्सर, बद्धकोष्ठता, पोटात संसर्ग यांसारख्या इतर समस्याही शरीरात वाढतात. या समस्येपासून सुटका हवी असल्यास काही योगासनांना फॉलो करा. जेणेकरून तुमची पचनसंस्था सुधारेल यासह तंदुरुस्त देखील वाटेल.

पोटात गॅस होण्यामागचे विविध कारणे

खूप जलद खाणे, एकाच वेळी खूप खाणे, तेलकट-मसालेदार अन्नाचे सेवन करणे, मिठाईचे सेवन करणे, तणाव, प्रमाणाबाहेर सिगारेट आणि दारू पिणे या कारणांमुळे देखील गॅसची समस्या निर्माण होते. या गॅसच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी काही योगासने खूप प्रभावी ठरू शकतात. जसे की..

अर्धमत्स्येंद्रासन

अर्धमत्स्येंद्रासन हा एक योगासनाचा प्रकार आहे. मधुमेहासोबतच, गॅस आणि अॅसिडिटीपासून आराम करण्यासाठी फायदेशीर आहे. हे आसन केल्याने पोटावर दाब पडतो ज्यामुळे गॅस सहज बाहेर पडते. यासोबतच शरीर डिटॉक्सिफाईड होते. त्यामुळे पोटाच्या अंतर्गत अवयवांमध्ये रक्ताभिसरणही वाढते.

बालासन

गॅस आणि ऍसिडिटी दूर करण्यासाठी बालासन हे अत्यंत प्रभावी आसन मानले जाते. या आसनामुळे पोटाच्या अवयवांची मालिश होते, ज्यामुळे पचन सुधारते आणि अंतर्गत अवयव मजबूत होतात. बालासनाच्या सरावापासून तणावही दूर होतो.

अधोमुख श्वान

अधोमुख श्वान हे आसन केल्याने गॅस आणि अॅसिडिटीची समस्या दूर होते. या आसनामुळे पोटावर दाब पडतो, त्यामुळे गॅस बाहेर पडतो, तसेच पोटात ऑक्सिजनचा पुरवठाही व्यवस्थित होतो. 

वज्रासन

वज्रासन केल्याने पोटाची समस्या दूर होते. जेवल्यानंतर लगेच 3 ते 4 मिनिटांनी वज्रासनात बसल्यास पचनाशी संबंधित अनेक समस्या दूर होतात. या आसनामुळे पोट आणि आतड्यात रक्ताभिसरण वाढते आणि अन्नाचे योग्य पचन होण्यासही मदत होते.

मार्जरीआसन

मार्जरीआसन केल्याने गॅसपासून मुक्त होण्यास मदत मिळते. हे आसन खूप प्रभावी मानले जाते. हे आसन केल्याने पाचन अवयवांची मालिश होते आणि रक्ताभिसरणही व्यवस्थित होते. त्यामुळे गॅससोबतच अॅसिडिटीपासूनही आराम मिळतो.

टॅग्स :हेल्थ टिप्सव्यायामआरोग्ययोगासने प्रकार व फायदे