Lokmat Sakhi >Fitness > सुटलेलं पोट होईल कमी, डबल चिन गायब,रामदेव बाबा सांगतात सोपे उपाय

सुटलेलं पोट होईल कमी, डबल चिन गायब,रामदेव बाबा सांगतात सोपे उपाय

Get rid of belly fat, double chin with Swami Ramdev's effective yoga tips संपूर्ण शरीरातील अतिरिक्त चरबी होईल कमी, ही ११ योगासने नियमित फॉलो करा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2023 01:38 PM2023-05-28T13:38:50+5:302023-05-28T13:44:46+5:30

Get rid of belly fat, double chin with Swami Ramdev's effective yoga tips संपूर्ण शरीरातील अतिरिक्त चरबी होईल कमी, ही ११ योगासने नियमित फॉलो करा..

Get rid of belly fat, double chin with Swami Ramdev's effective yoga tips | सुटलेलं पोट होईल कमी, डबल चिन गायब,रामदेव बाबा सांगतात सोपे उपाय

सुटलेलं पोट होईल कमी, डबल चिन गायब,रामदेव बाबा सांगतात सोपे उपाय

भारतीय लोकांमध्ये लठ्ठपणाची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. लठ्ठपणामुळे अनेक आजार छळतात. काही लोकांचे हात - पाय सडपातळ पण पोटाची चरबी ही झपाट्याने वाढत जाते. यासह तोंडावर अतिरिक्त चरबी दिसून येते. ज्यामुळे आपला चेहरा खूप गुबगुबीत व डबल - चीन दिसतो. बेली फॅट कमी करण्यासाठी कितीही प्रयत्न केले तरी देखील कमी होत नाही. यासाठी योगगुरु बाबा रामदेव यांनी ११ योगासने सांगितले आहे. या योगासनांमुळे शरीरातील अतिरिक्त चरबी नक्कीच वितळेल.

स्वामी रामदेव यांच्या मते, ''जेव्हा आपल्या शरीरातील चयापचय क्रिया मंदावते, तेव्हा लठ्ठपणाची समस्या उद्भवते. लठ्ठपणा वाढल्यामुळे रक्तदाब, मधुमेह, हृदयाच्या संबंधित समस्या, कर्करोग, सांधेदुखी यांसारख्या समस्या निर्माण होतात. लठ्ठपणा हे प्रत्येक आजाराचे मूळ कारण आहे. त्यामुळे रोज प्राणायामसह योगासना करण्यासोबतच आहाराची काळजी घेतली पाहिजे. ही ११ योगासने रोज केल्याने, तुमचे वजन काही दिवसांतच कमी होऊ शकते''(Get rid of belly fat, double chin with Swami Ramdev's effective yoga tips).

ही ११ योगासने नियमित करा

त्रियक ताडासन - हे आसन दररोज 3-4 वेळा करा. यामुळे तुमच्या संपूर्ण शरीराची चरबी कमी होईल.

त्रिकोनासन किंवा त्रिकोणी आसन- या आसनामुळे तुमच्या पोटाची, कंबरेची चरबी सहज कमी होईल.

बद्ध कोनासन- हे आसन पोटाची चरबी कमी करते. दीर्घ श्वास घेण्यासोबत हे आसन २० ते ५० वेळा करा.

पदासन - हे आसन केल्याने डबल - चीनसह संपूर्ण शरीरातील चरबी कमी होते. हे आसन तुम्ही २० ते ५० वेळा करू शकता.

गरोदरपणानंतर १० दिवसात १० किलो वजन कमी? गौहर खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, फोटो व्हायरल..

चक्की आसन - हे आसन केल्याने पोटाची चरबी सहज कमी होईल. हे आसन ३० वेळा करा.

भुजंगासन- हे आसन केल्याने डबल - चीनसह पोटाची चरबी कमी होईल.

सालभासन- हे आसन नियमित केल्याने ओटीपोट कमी होण्यास मदत होते.

पादहस्तासन - हा योग केल्याने तुमचे संपूर्ण शरीर निरोगी राहील. व पचनसंस्था देखील मजबूत होईल.

पवनमुक्तासन- हे आसन केल्याने पोटातील अतिरिक्त चरबी निघून जाईल. त्यामुळे बद्धकोष्ठता, अॅसिडिटीची समस्याही संपेल.

शवासन - हे आसन केल्याने मन शांत राहील आणि शरीरात हलकेपणा जाणवेल.

प्राणायाम - स्वामी रामदेव यांच्या म्हणण्यानुसार, ''दररोज या ११ योगासनांसह प्राणायाम करणे आवश्यक आहे. यासह कपालभाती, भस्त्रिका, उद्गीथ, उज्जयी, सूर्यनमस्कार आणि अनुलोम-विलोम नियमितपणे करा.''

लठ्ठपणा कमी करण्यासाठी काही घरगुती टिप्स

सकाळी गरम पाणी प्या

थंड पाणी पिणे बंद करा

अधिक भाज्या आणि फळे खा

हात पाय बारीक पण पोट सुटले? १ आयुर्वेदिक उपाय, पोट होईल कमी

अधिक वेळा खाऊ नका

मल्टीग्रेन पीठ आणि ओट्सचे चिला खा

रात्री अन्नधान्य किंवा भात खाणे टाळा.

Web Title: Get rid of belly fat, double chin with Swami Ramdev's effective yoga tips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.