Join us  

वजन कमी करण्याचे सगळेच फंडे फेल? 'या' चहामध्ये तूप घालून प्या; थुलथुलीत पोट होईल सपाट आणि..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2024 8:27 PM

Ghee Tea The Latest Weight Loss Trend, Tried It Yet? : फक्त चहा पिऊ नका त्यात तूप घालून पाहा.. फरक दिसेल..

आपल्या देशात फार पूर्वीपासून तुपाचा वापर करण्यात येत आहे (Ghee Tea). तुपाचा वापर केल्याने त्वचा तुकतुकीत आणि आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात. हृदय सुरक्षित ते बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी आपण नियमित तूप खाऊ शकता (Weight Loss). पण फक्त तूप पुरेसं नाही (Fitness). जर आपल्याला वजन कमी करायचं असेल तर, एका विशिष्ट चहामध्ये तूप घालून प्या. यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होईल. आणि आरोग्याला अनेक फायदेही मिळतील.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वेबसाईटनुसार, 'तुपात वजन कमी करण्याचे घटक असतात. तुपात ब्यूटायरेट अॅसिड असते. ज्यामुळे भूक कमी लागते. काही लोक कोमट पाण्यात किंवा ब्लॅक कॉफीमध्ये तूप घालून पितात. पण आपण मसाला चहामध्येही तूप घालून पिऊ शकता(Ghee Tea The Latest Weight Loss Trend, Tried It Yet?).

अदिती राव हैदरीने केलं दुसरं लग्न; सोनेरी रंगाच्या लेहेंगा घालून दिसत होती अप्सरा; पाहा देखणे रूप..

मसाला चहा तयार करण्यासाठी एका भांड्यात पाणी गरम करण्यासाठी ठेवा. त्यात आलं, लिंबाचा रस, दालचिनी, लवंगा, वेलची, जायफळ घालून मिक्स करा. पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस बंद करा. नंतर त्यात थोडे तूप आणि मध घाला. अशा प्रकारे वेट लॉस मसाला चहा पिण्यासाठी रेडी. आपण हा चहा कोणत्याही वेळेत पिऊ शकता. हा चहा पोटाची चरबी झपाट्याने कमी करण्यास मदत करते.

हाय बीपी असताना खाल्ले तर हे 'हेल्दी' पदार्थ बनतात सायलेंट किलर; हृदयावरही होतो परिणाम

मसाला चहा वजन कमी कसे करते?

तुपामध्ये व्हिटॅमिन ए, डी, ई आणि के असते. याशिवाय यामध्ये ओमेगा ३ फॅटी ॲसिड असते. तुपामध्ये शॉर्ट चेन फॅटी ऍसिड ब्युटीरेट असते, जे पचनशक्ती मजबूत करण्यासाठी खूप चांगले मानले जाते. यासोबतच तुपामध्ये हेल्दी फॅट, प्रोटीन आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. ज्याचा फायदा संपूर्ण आरोग्याला होतो. जेव्हा चयापचय बुस्ट होते, तेव्हा पचनक्रिया सुधारते आणि वेट लॉससाठी मदत होते. 

टॅग्स :वेट लॉस टिप्सफिटनेस टिप्स