मलायका अरोरा (Malaika Arora) तिचा रोजचा व्यायाम, योगा या बाबतीत किती काटेकोर आहे, हे तिच्या चाहत्यांना आता चांगलंच माहिती आहे. तिच्याप्रमाणेच तिच्या चाहत्यांनीही व्यायाम, वर्कआऊट गांभिर्याने घ्यावं, असं तिला वाटतं. त्यामुळेच तर व्यायाम, योगा करण्यासाठी चाहत्यांना प्रेरणा मिळावी म्हणून ती तिच्या याविषयीच्या पोस्ट नेहमीच सोशल मिडियावर शेअर करत असते. आता नुकताच मलायकाने एक फोटो सोशल मिडियावर शेअर केला असून यामध्ये ती गोमुखासन करताना दिसत आहे. वरवर पाहता हे आसन दिसायला सोपे वाटत असले तरी करायला मात्र तेवढेच अवघड आहे. त्यामुळे सगळ्यात आधी आपण गोमुखासन कसे करायचे ते पाहूया आणि त्यानंतर त्यामुळे शरीराला कोणते फायदे होतात (Benefits of Gomukhasan) याची माहिती घेऊया..(Gomukhasan for healthy heart and spinal health)
कसे करायचे गोमुखासन?How to do Gomukhasan १. गोमुखासन करण्यासाठी योगा मॅटवर किंवा सतरंजीवर बसावे. यानंतर डावा पाय गुडघ्यात वाकवून उजव्या नितंबाखाली ठेवावा. उजवा पाय डाव्या मांडीवर ठेवावा. दोन्ही पायांचे गुडघे एकमेकांवर येतील, अशा स्थितीत पाय असावेत.
मंगळागौरीसाठी परफेक्ट पारंपरिक लूक हवा? ७ स्पेशल टिप्स, चारचौघीत उठून दिसाल
२. जो पाय खाली आहे त्या बाजूचा हात कोपऱ्यात वाकवून खालच्या बाजूने पाठीवर घ्यावा. तसेच जो पाय वर आहे, त्या बाजुचा हात वरच्या बाजुने कोपऱ्यात वाकवून पाठीवर घ्यावा.
रक्षाबंधन स्पेशल: १०० रुपयांपेक्षा कमी किमतीतही मिळेल आकर्षक गिफ्ट, बघा ३ खास पर्याय
३. आता दोन्ही तळहात एकमेकांना जोडावेत. सुरुवातीला हे जमणार नाही. पण सरावाने जमेल. यावेळी पाठीचा कणा अगदी ताठ असावा. आता ही आसनस्थिती काही काळ टिकवा आणि नंतर डावा पाय वर करून अशाच पद्धतीने आसन करावे.
गोमुखासन करण्याचे फायदे Benefits of Gomukhasan १. शरीरातील रक्तपुरवठा सुरळीत होऊन हदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो.
२. पाठीचा कणा ताठ राहण्यास आणि बॉडी पोश्चर सुधारण्यास मदत होते.
सोन्याचांदीचे दागिने लख्ख चमकतील, स्वयंपाक घरातली फक्त १ गोष्ट वापरा, दागिने होतील चकाचक
३. पाठदुखी, कंबरदुखी, मानदुखी असे त्रास कमी होतात.
४. फ्रोजन शोल्डरचा त्रास कमी होतो.
५. किडनी, मुत्ररोग यासंदर्भात होणारे त्रास कमी होतात.