भारतीय घरांमध्ये तुरीची डाळ, चण्याची डाळ मोठ्या प्रमाणात खाल्ली जाते. तुरीची डाळ, मुगाची डाळ तब्येतीसाठी बरीच फायदेशीर ठरते. (Health Tips) डाळीचे सेवन सगळ्यात पौष्टीक मानले जाते. वजन कमी करण्यासाठीही तुम्ही डाळीचे सेवन करू सकता. मूगाची डाळ खाल्ल्यानं शरीराला एनर्जी मिळते. मूगाच्या डाळीचे सेवन केल्यानं तब्येतीला कोणकोणते फायदे मिळतात समजून घेऊ. (Green Moong Dal Provides Many Health Benefits)
हिरवी मूगाची डाळ खाण्याचे फायदे
मुगाची डाळ हाय फायबर्स आणि प्रोटीन्सनी परिपूर्ण असते. जर तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर तुम्ही नियमित या डाळीचे सेवन करू शकता. या डाळीचे सॅलेडच्या स्वरूपात सेवन करू शकता. हिरवी मूगाची डाळ रात्रभर भिजवायला ठेवा. सकाळी मोड आलेले दाणे उकळून यात कांदा, टोमॅटो, काकडी, हिरवी मिरची, लिंबाचा रस आणि चुटकीभर मीठ घाला.
हाय ब्लड प्रेशर
मूग डाळीत फायबर्स, पोटेशियम आणि मॅग्नेशियम असते ज्यामुळे शरीरातील रक्तदाब कमी करण्यास मदत होते. रक्तातील मॅग्नेशियमचा स्तर नियंत्रणात राहतो. मॅग्नेशियम रक्त वाहिन्यांनांमध्ये रक्त प्रवाह सुरळीत करते आणि ब्लड प्रेशर कमी होण्यासही मदत होते.
५९ व्या वर्षी तरूण दिसणाऱ्या मिलिंद सोमणच्या ५ सवयी; आजपासूनच सुरू करा-कायम फिट राहाल
कोलेस्टेरॉल
हिरवी मुगाची डाळ कोलेस्टेरॉल आणि लिपिड कमी करण्यास मदत करते. ज्यातील कोलेस्टेरॉल हृदय रोगाची जोखिम वाढवते. संधोधनांतून असं कळतं की मूगाच्या डाळीने एलडीएल कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत होते. एक वाटी मुगाच्या डाळीने एलडीएल कोलेस्टेरॉल जवळपास ५ टक्के कमी करू शकता. ज्यामुळे फक्त सूज कमी होत नाही तर प्लाक हटवता येतो. ज्यामुळे स्ट्रोकची जोखिम कमी होते.
हिरवी मुगाची डाळ खाल्ल्यानं रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होते. व्हिटामीन्स, मिनरल्स आणि एंटी ऑक्सिडेंट्स असतात. मूंग डाळ शरीराची इम्यूनिटी व्यवस्थित ठेवते. यातील फायटोन्युट्रिएंट्स एंटी मायक्रोबियल हानीकारक बॅक्टेरिया आणि व्हायरसशी लढतात आणि रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यास मदत होते.
भात कमी खाता तरी पोट सुटलंय? अनिरूद्धाचार्य सांगतात 'ही' डाळ खा, वजन भराभर होईल कमी
हिरवी मुगाची डाळ त्वचेला चमक देते. मूग डाळ स्क्रबच्या स्वरूपात तुम्ही वापरू शकता. हा एक चांगला मार्ग आहे. घरी तुम्ही मूगाच्या डाळीचा वापर करून एक्सफोलिएटिंग फेस पॅक बनवू शकता. हा फेस पॅक चेहऱ्याला लावल्यानं तुमची त्वचा चमकदार दिसेल.