Join us  

जिमला जातांना योग्य कपड्यांची निवड करताना लक्षात ठेवा ५ गोष्टी, चुकीचे कपडे आजारांना आमंत्रण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2023 9:23 PM

Gym Clothes For Women : Tips To Choose The Right Kind Of Workout Clothes & How To Dress Up Before You Hit The Gym : आपण परिधान केलेल्या कपड्यांमुळे जिममध्ये आपल्याला एक्सरसाइज करताना अडथळे येऊ शकतात.

आपण आपल्या बिझी श्येड्यूलमधून वेळ काढून दिवसांतील काही तास हे जिममध्ये घालवतो. बॉडी बनवण्यासाठी, वजन वाढवणे आणि कमी करण्यासाठी तर काही लोक पर्नालिटी मेंटेन रहावी यासाठी जिममध्ये मेहनत करतात. जिममध्ये वेगवेगळ्या मशिन्सवर वर्कआऊट केले जाते. त्यातील काही उपकरणे ही जड असतात. त्यामुळे जिममध्ये वावरताना आरामदायक वाटेल असेच कपडे घालावे लागतात. जिम जॉईन केल्यावर वर्कआउट रुटीनमध्ये कोणते एक्सरसाइज करायचे. डाएटमध्ये काय खावे किंवा नाही हे ठरवले जाते. त्याचप्रमाणे जिमला जाण्यासाठी शारीरिक क्षमता आणि स्फूर्ती जेवढी महत्वाची आहे तेवढीच कपड्यांची निवड देखील महत्वाची आहे.

जिमला जाताना स्ट्रेचेबल स्पोर्टस्वेअर प्रकारचे कपडे घालावेत. जास्त जाड कपडे घालू नयेत. जर आपण कम्फर्टपेक्षा जास्त स्टाइलबद्दल विचार केला तर तुम्ही जिममध्ये जास्त चांगल्या रीतीने वर्कआऊट करू शकणार नाहीत. यासाठी स्टाइल आणि कम्फर्ट असणाऱ्या ड्रेसला प्राधान्य देणे महत्वाचे ठरु शकते. जास्त टाइट कपड्यांमुळे जिममध्ये आपल्याला एक्सरसाइज करताना अडथळे येऊ शकतात. यामुळे आपण नॉर्मल फिटिंगचे कपडे घालून जिममध्ये जाऊ शकता(Gym Clothes For Women: Tips To Choose The Right Kind Of Workout Clothes And How To Dress Up Before You Hit The Gym).  

जिममध्ये जाताना नेमक कोणत्या प्रकारच्या कपड्यांची निवड करावी? 

१. जॉगर्स पॅन्ट :- आपण जे कपडे परिधान केले आहेत, ते कपडे घालूंन आपल्याला व्यवस्थित एक्सरसाइज करता आले पाहिजे. या गोष्टीकडे सर्वप्रथम लक्ष देणे खूपच गरजेचे आहे. पायांचे एक्सरसाइज करताना कपड्यांमुळे आपल्याला कोणताही अडथळा येणार नाही असेच कपडे निवडावेत. पायांचे एक्सरसाइज करताना जॉगर्स पॅन्ट हा एक उत्तम पर्याय असू शकतो. सध्या बाजारांत विविध डिज़ाईन्सच्या जॉगर्स पँट्स सहजपणे उपलब्ध मिळतील. जॉगर्स पॅन्ट ही स्किनफीट नसून खूपच लूज आणि सुटसुटीत असते. ही पॅन्ट अतिशय लूज असल्यामुळे एक्सरसाइज करताना आपल्याला कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येत नाही. यामुळे आपण अगदी सहजपणे एक्सरसाइज करु शकतो. जॉगर्स पॅन्टस घालून आपण अतिशय सहजरित्या पायांचे एक्सरसाइज करु शकता. या जॉगर्स पॅन्टस आपल्याला बाजारांत ५०० रुपयांपासून ते १००० रुपयांपर्यंत अगदी सहज मिळू शकतात. 

२. डबल टी - शर्ट :- डबल टी - शर्ट हे आपल्या जिम लूकसाठी एकदम परफेक्ट स्पोर्टस्वेअर आहे. डबल टी - शर्ट मुळे आपल्याला स्टायलिश लूक मिळण्यास मदत मिळेल. आपण फुल स्लीव्स बॉडी फिट टी- शर्टच्या वर एखादे ओव्हरसाईज टी- शर्टदेखील घालू शकता. डबल टी - शर्ट आपल्याला बाजारांत ५०० रुपयांपासून ते १००० रुपयांपर्यंत मिळू शकतात.   

३. स्ट्रेच पॅन्टस :- एक्सरसाइज करताना जर आपण लूज कपडे घालण्याऐवजी स्किनफीट कपडे घालणे पसंत करत असाल तर स्ट्रेच पॅन्टस हा आपल्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. स्ट्रेच पॅन्टस या स्ट्रेचेबल असतात म्हणून वाय्य्म करतांना आपल्या पायांची जशी हालचाल होते तशा त्या स्ट्रेच होतात. म्हणून एक्सरसाइज करताना स्ट्रेच पॅन्टसचा वापर करणे योग्य ठरते. सध्या बाजारांत वेगवेगळ्या ब्रॅण्डच्या स्ट्रेच पॅन्टस विकत मिळतात. १००० रुपयांपासून ते १५०० रुपयांपर्यंत स्ट्रेच पॅन्टस बाजारांत अगदी सहज मिळू शकतात.   

४. ओव्हरसाईज टी - शर्ट :- ओव्हरसाईज टी - शर्ट घालून आपण अगदी सहजरित्या न अडखळता एक्सरसाइज करु शकता. ओव्हरसाईज टी - शर्ट घातल्यामुळे आपल्याला एक्सरसाइज करतांना हातांची हालचाल करणे सोपे जाईल. ओव्हरसाईज टी - शर्ट हे खूपच लूज आणि आपल्या साईजपेक्षा १ किंवा २ साईज मोठे असल्यामुळे ते घालून एक्सरसाइज करणे आपल्याला सोपे जाते. या प्रकारचे ओव्हरसाईज टी - शर्ट आपल्याला बाजारांत २०० ते ५०० रुपयांपर्यंत सहज मिळू शकतात. 

५. वर्कआउट हूडी :- आपण एक्सरसाइज करताना वर्कआउट हूडी देखील परिधान करु शकता. फुल स्लिव्ह्जच्या स्किनफीट वर्कआउट हूडीमध्ये आपल्याला एक्सरसाइज करणे सोपे जाते. आपण एखादे स्लिव्हलेस स्किनफीट टीशर्ट घालून त्यावर फुल स्लिव्ह्ज स्किनफीट वर्कआउट हूडी घालू शकता.     

जिमवेअर निवडतांना कोणती काळजी घ्यावी : -

कपड्यांची क्वालिटी चांगली असावी. ज्या कपड्यात जास्त घाम शोषण्याची क्षमता आहे, असे कपडे निवडावेत. जिमसाठी वापरले जाणारे कपडे चांगले असावेत. जिमचे स्पोर्टस्वेअर अधिक घट्ट किंवा खूपच सैलसर नसावेत. महिलांनी योग्य स्पोर्ट्स ब्रा निवडावी. स्टायलिश जिम आउटफिट निवडण्यास हरकत नाही, परंतु कपड्यांचा आरामदायकपणा लक्षात ठेवा. एक्सरसाइज करताना प्रचंड प्रमाणात घाम येतो. त्यामुळे घाम शोषून घेण्यासाठी चांगल्या दर्जाच्या जिमच्या कपड्यांची गरज असते. त्यामुळे आपल्याला चिकटपणा जाणवू शकत नाही. योग्य साइजचे कपडे निवडल्याने आत्मविश्वास येतो. त्यामुळे एक्सरसाइज करणे सोपे जाते. यामुळे वर्कआउट्स देखील योग्य पद्धतीने केला जातो.

टॅग्स :फिटनेस टिप्स