गेल्या एका वर्षभरापासून लोकांच्या मनात कोरोना व्हायरसच्या संक्रमणाची भीती कायम आहे. कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारच्या उपायांचा अवलंब करत आहेत. यात श्वससन प्रणाली चांगली बनवण्यासाठी अनेक व्यायाम प्रकार लोक करत असल्याचं दिसून आलं आहे. कारण कोरोना व्हायरसचं संक्रमण झाल्यानंतर श्वसन तंत्राचे नुकसान होते. फुफ्फुसांच्या पेशी खराब होतात. अशा स्थितीत कफ खोकला वाढून श्वास घ्यायला त्रास जाणवतो.
तज्ञ कोविडपासून रक्षणासाठी श्वासोच्छ्वासाच्या व्यायामाचीही शिफारस करीत आहेत, परंतु काही लोक स्वतःच्या मर्जीनं काही व्यायाम करत आहेत, हीच बाब जीवघेणी ठरू शकते. श्वासोच्छवासाच्या व्यायामामुळे वायुमार्ग साफ होतो आणि फुफ्फुसांची श्वास घेण्याची क्षमता वाढते. श्वासांचे बरेच व्यायाम आहेत जे आपण संसर्गामुळे ग्रस्त झाल्यानंतर करू शकता, परंतु असे बरेच काही व्यायाम प्रकार आहेत. ज्यांच्यापासून लांब राहायला हवं. अशा व्यायामामुळे आपल्या श्वसनमार्गावर दबाव वाढून श्वास घ्यायला त्रास देखिल होऊ शकतो. आम्ही आपल्याला 3 व्यायामांबद्दल सांगत आहोत, जे आपण टाळले पाहिजे.
कपालभाती प्राणायम
कपालभाती हा शब्द दोन शब्दांनी बनलेला आहे, पहिलं कपाळ शब्दाचा अर्थ मस्तक किंवा डोकं, भाती म्हणजे चमकणे. वास्तविक पाहता श्वासोच्छवासाच्या या व्यायामामुळे शरीराची उष्णता निर्माण होते, शरीरातील विषारी पदार्थ आणि कचरा बाहेर टाकण्यास मदत करते. इतकेच नाही तर ते चयापचय दर सुधारून यकृत आणि मूत्रपिंडाचे कार्य सुधारते. तथापि, हे एक प्रकारचे श्वास घेण्याचे तंत्र आहे, जे आपल्या शरीराच्या अंतर्गत अवयवांवर अधिक दबाव आणण्याचे कार्य करते.
त्याच वेळी, दम्याचा त्रास, हृदयाच्या समस्या किंवा श्वसन समस्येने ग्रस्त लोकांना हा व्यायाम न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कोरोनामुळे त्रस्त असलेल्या व्यक्तीला हा व्यायाम न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे कारण यामुळे आपल्याला चक्कर येऊ शकते. या व्यतिरिक्त उच्च रक्तदाब आणि अल्सरने ग्रस्त असलेल्या लोकांनीही कपालभाती टाळावे.
मूर्छा प्राणायाम
मूर्छा म्हणजेच बेशुद्ध होणं. या प्रकारच्या व्यायामाला ब्रिदिंग व्यायामाच्या रूपानंही ओळखलं जातं. या व्यायाम प्रकारात व्यक्तीला हळूहळू श्वास घ्यायचा असतो. त्यानंतर श्वास दीर्घकाळापर्यंत रोखून ठेवायचा असतो. हे श्वास घेण्याचे एक प्रगत तंत्र मानले जाते. कोणत्याही सामान्य व्यक्तीला हा व्यायाम करण्याचा सल्ला दिला जात नाही. या व्यायाम प्रकारात पारंगत असलेल्या व्यक्तींनीच हा व्यायाम प्रकार करायला हवा. कोविड रूग्णांनी देखील हा व्यायाम करू नये कारण त्यांचा श्वास धरून त्यांना चक्कर येऊ शकतात जे संसर्गजन्य रोगांचे लक्षण आहे. एवढेच नव्हे तर यामुळे आपल्या फुफ्फुसांवर अतिरिक्त दबाव देखील निर्माण होतो, ज्यामुळे नुकताच बरे झालेल्या रुग्णांना त्रास होऊ शकतो.
भस्त्रिका प्राणायाम
कपालभ्रातीप्रमाणे वाटणारं भस्त्रिका प्राणायामची विधी खूपच वेगळी आहे. हा व्यायाम प्रकार करण्यासाठी श्वास घेऊन हळूवार सोडावा लागतो. हा एक साधारण व्यायाम प्रकार आहे. त्यामुळे शरीरात बरीच उष्णता तयार होते. फ्फुसांवर दबाब निर्माण होतो. त्यामुळे निरोगी व्यक्तीलाही चक्कर येण्याच्या समस्येचा सामना करावा लागू शकतो. म्हणून कोरोना पीडित व्यक्तीला या आजारापासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो. या व्यतिरिक्त ज्या लोकांना ब्लड प्रेशरची समस्या आहे. त्यांनी हा व्यायाम प्रकार करण्याचा प्रयत्न करू नये. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच हे व्यायाम प्रकार करायला हवेत.