आपण कायम तरूण दिसावं असं प्रत्येकालाच वाटत असत. परंतु वाढत्या वयानुसार प्रत्येकालाच आपल्या शरीरयष्टीत, चेहऱ्यात बदल झालेला जाणवतो. जर खाण्यापिण्याची व्यवस्थित काळजी घेतली तर आपण आपल्यातील वृद्धावाच्या लक्षणांना लांबणीवर टाकू शकतो. याच सिद्धांतावर, हार्वर्ड युनिव्हर्सिटीने (Harvard University)आपल्या असलेल्या वयापेक्षा कायमच तरुण दिसण्यासाठी काही गोष्टीं लक्षात ठेवायला सांगितल्या आहेत. हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या (Harvard University) म्हणण्यानुसार, सकस व पौष्टिक आहार आणि कायम काहीतरी शारीरिक हालचाली किंवा अॅक्टिव्हिटी करत राहणं यांच्या मदतीने म्हातारपणातही चेहऱ्यावर तरुणपणा दिसून येतो. कितीही चांगल्या ब्रॅण्डची सौंदर्य उत्पादनं वापरली तरी तरुण आणि सुंदर दिसण्यासाठी फक्त हेच महत्वाचं नसतं. यासाठी आहारात जाणिवपूर्वक कोलॅजनयुक्त, ॲण्टिएजिंग फूडसचा समावेश करणे गरजेचे असते.
आपल्या वयोमानानुसार, सुंदर व तरुण दिसण्यासाठी आहारातून अपायकारक ठरेल असे अन्न कायमचे वळगळून टाकावे लागेल आणि त्या जागी सकस अन्न खावे लागेल. हार्वर्ड मेडिकल एज्युकेशनच्या वेबसाइटनुसार, या संस्थेने निरोगी आहारासाठीची एक यादी तयार केली आहे. या आहाराची चाचणी करण्यासाठी, संशोधन संघाने काही सेवानिवृत्त लोकांच्या आयुष्यभरातील आहार आणि आरोग्याचा बारकाईने अभ्यास केला आहे(Harvard study reveals the 5 simple habits that may increase Your Longevity).
आपल्या वाढत्या वयापेक्षा कायम तरुण दिसण्यासाठी पाळा ही पंचसूत्री :-
१. बोरं-करवंद-छोटी बी असलेली फळं खा :- आपण कायम सुंदर व तरुण दिसण्यासाठी बोरं-करवंद अशी छोटी बी असलेली फळं जास्त प्रमाणात खाणे गरजेचे असते. बेरीज प्रकारांतील फळांमध्ये ब्लूबेरी, स्ट्रॉबेरी, रासबेरी (Barriers Fruit) यांसारख्या फळांचा अधिक समावेश करावा. कोणत्याही प्रकारच्या बेरीज फळांमध्ये वृद्धत्वविरोधी गुणधर्म असतात. त्यात व्हिटॅमिन ए, सी, अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट्स आढळतात जे आपल्या त्वचेला व आरोग्याला कायम तरुण ठेवण्यास मदत करतात. ही फळे नियमित खाल्ल्याने त्वचा आणि मज्जातंतूंचे आरोग्य अतिशय चांगले राहण्यास मदत होते. याबरोबरच चेहरा दीर्घकाळ तरूण दिसण्यासही मदत होते.
२. सुकामेवा खाणे :- ड्राय फ्रूट्स मध्ये बदाम, काजू, अक्रोड, पिस्ता इत्यादी ड्राय फ्रूट्स खाणे हे अतिशय आवश्यक आहे. सर्वच प्रकारचे ड्राय फ्रुटस हे ॲण्टिएजिंग गुणधर्म असलेले पौष्टिक पदार्थ आहेत. खरे तर बदाम हा पौष्टिक घटकांचा खजिना आहे. यामध्ये भरपूर प्रथिने, ओमेगा-३ फॅटी अॅसिड आणि इतर पोषक घटक असतात. ओमेगा-३ फॅटी अॅसिडमुळे त्वचेवर वयाचा प्रभाव कमी होतो. याशिवाय कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवते. ड्राय फ्रूट्स खाल्ल्याने ते रक्तवहिन्यासंबंधी होणारे रोग प्रतिबंधित करण्यास मदत करतात.
महागडा सुकामेवा पावसाळ्यात सादळू नये म्हणून ४ टिप्स, बदाम-काजू-अंजीर टिकतील छान...
३. पालेभाज्या :- खरेतर हिरव्या पालेभाज्यांमध्ये आरोग्याचा खजिना दडलेला आहे. संशोधनानुसार, दररोज किमान एका तरी हिरव्या पालेभाजीचा आपल्या आहारात समावेश केला पाहिजे. त्यात पुरेशा प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स असतात. हिरव्या पालेभाज्यांमध्ये व्हिटॅमिन सी, के, फायबर, फोलेट, ल्युटीन, कॅल्शियम इत्यादी असतात, ज्यामुळे त्वचा तरुण ठेवण्यासाठी शरीरामध्ये कोलेजनची पातळी सुधारण्यात मदत करतात. हिरव्या पालेभाज्या त्वचेला लवचिकता आणून तिची चमक देखील वाढवतात. हिरव्या पालेभाज्या मेंदूच्या आरोग्यासाठी आणि स्मरणशक्तीसाठीही चांगल्या मानल्या जातात.
पोटावरची चरबी कमी करण्यासाठी करा ‘उशीचे व्यायाम’! फिट होण्यासाठी पिलो एक्सरसाइजचा पाहा खास प्रयोग...
४. डाळी व कडधान्य :- हार्वर्ड मेडिकलनुसार, म्हातारपणातही तरुण ठेवण्याचा खजिना हा धान्यामध्ये दडलेला आहे. जर आपण आपल्या रोजच्या आहारात डाळी, कडधान्ये, भरड धान्ये यांचा समावेश केला तर त्याचा आपल्या आरोग्याला भरपूर फायदा होऊ शकतो. संपूर्ण साल असलेली मूग डाळ हे पौष्टिक धान्याचे उत्तम उदाहरण आहे. जर आपण ही धान्ये - कडधान्ये पाण्यात भिजवून खाल्ली तर त्यांच्यापासून सर्व प्रकारची पोषक तत्व आपल्याला मिळतील. यामुळे शरीरातील नसा कमकुवत होत नाहीत आणि पचनशक्ती निरोगी राहते.
घोट - घोट पाणी पिण्याचा आहे खास नियम, लठ्ठपणा ते डिहायड्रेशन पर्यंतच्या समस्या होतील दूर...
५. बीन्स :- विविध प्रकारच्या शेंगा देखील आरोग्याच्या दृष्ट्टीने अतिशय उपयुक्त मानल्या जातात. त्वचा तरूण ठेवण्यासाठी आणि एकूणच आरोग्यासाठी या भाज्या खूप फायदेशीर मानल्या जातात. या भाज्यांमध्ये आहारातील फायबर मुबलक प्रमाणात असते ज्यामुळे पचनशक्ती मजबूत होते. बीन्समध्ये अनेक प्रकारची जीवनसत्त्वे आणि खनिजे आढळतात, ज्यामुळे मेंदूचे आरोग्य देखील चांगले राखले जाते. यामुळे बौद्धिक क्षमता दीर्घकाळ अबाधित राहते.