Join us  

काकडीसारखी स्लिम फिगर हवी, खा काकडीच्या बिया! पोषण हवं तर बिया फेकू नका कारण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2024 11:12 AM

Health benefits of eating cucumber seed : काकडीच्या बिया खाण्याचे नेमके काय फायदे आहेत...

छोट्याशा हिरव्यागार काकडीचा आपण आपल्या आहारात समावेश करतो. काकडीच्या कोशिंबिरीपासून ते काकडीच्या थालीपीठापर्यंत काकडीचे अनेक पदार्थ तयार केले जातात. कधी जेवणासोबत तर कधी छोट्याशा भुकेसाठी काकडीला तिखट, मीठ लावून अतिशय आवडीने खाल्ले जाते. काकडी खाणे आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर ठरते. काकडी खाल्ल्याने आपल्या शरीराला केवळ व्हिटॅमिनच नाही तर अनेक पोषक तत्व मिळतात. वजन कमी करण्यापासून ते शरीरात पाण्याचे प्रमाण योग्य ठेवण्याचं कामही काकडी करते. काकडीमध्ये कॅलरी, फॅट, कोलेस्ट्रॉल आणि सोडिअम इत्यादीचे प्रमाण कमी असते. जे आपल्या शरीरासाठी अनेक प्रकार फायदेशीर ठरते(Health benefits of eating cucumber seed). 

ऋतु कोणताही असू द्या बाजारात काकडी अगदी सहज उपलब्ध होते. उन्हाळ्यात काकडी खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. काकडी खाल्ल्याने पोटाला थंडावा मिळतो तसेच पोटाच्या अनेक समस्या देखील दूर होतात. परंतु फक्त काकडीचं नाही तर काकडीमध्ये असणाऱ्या बिया खाल्ल्यानेही त्याचा आपल्या  शरीराला अनेक प्रकारे फायदा होतो. काकडीच्या बियांमध्ये (Do You Know These Benefits Of Cucumber Seeds?) अँटीऑक्सिडंट्स, खनिज, पाणी आणि फायबरचे प्रमाण जास्त असते त्यामुळे काकडीच्या बियांमधील हे सगळे महत्वाचे घटक आपल्या आरोग्याला अतिशय उपयुक्त ठरतात. काकडीच्या बिया खाण्याचे नेमके काय फायदे आहेत हे पाहूयात(cucumber Seeds Health Benefits).

काकडीच्या बिया खाण्याचे फायदे... 

१. वजन कमी करण्यासाठी :- तुम्हाला जर वजन कमी करायचे असेल तर यासाठी काकडीच्या बिया खाणे फायदेशीर ठरेल. काकडीच्या बियांमध्ये फायबर खूप मोठ्या प्रमाणात असते, तसेच यात कॅलरीचे प्रमाण खूपच कमी असते. त्यामुळे काकडी सोबतच काकडीच्या बिया खाल्ल्याने वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते. 

२. पचनक्रिया चांगली राहण्यासाठी :-  ज्याप्रमाणे काकडीत फायबरचे प्रमाण भरपूर असते, त्याचप्रमाणे याच्या बियांमध्येही भरपूर प्रमाणात फायबर असते. ज्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते आणि आतडे स्वच्छ होतात. काकडीच्या बिया नेहमी खाल्ल्यास पोटाशी संबंधित अनेक समस्या दूर होतात. जर तुम्ही पचनाच्या समस्येने त्रस्त असाल तर काकडीच्या बिया वरदानापेक्षा कमी नाहीत. यामध्ये असलेले फायबर पचनक्रिया सुधारण्यास मदत करते. 

३. हृदयासाठी फायदेशीर :- काकडीच्या बिया हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. यामध्ये असलेले मॅग्नेशियम आणि पोटॅशियम हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त असतात. ही खनिजे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास आणि हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतात.

४. त्वचेच्या आरोग्यासाठी :- काकडीच्या बियां व्हिटॅमिन 'ई' आणि अत्यावश्यक फॅटी ऍसिडने समृद्ध, त्वचेसाठी देखील खूप फायदेशीर आहेत. हे दोन्ही घटक त्वचेचे आरोग्य सुधारण्यासाठी महत्वाचे असतात. काकडीच्या बियांमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे असतात, ज्यामुळे त्वचेचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. वृद्धत्वाची लक्षणे कमी करण्यासाठी देखील हे फायदेशीर आहे.

५. हाडांच्या मजबुतीसाठी :- काकडीच्या बियांमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस सारखी आवश्यक खनिजे असतात, जी हाडांच्या आरोग्यासाठी महत्त्वाची असतात. ही खनिजे हाडांची घनता टिकवून ठेवण्यास मदत करतात. 

६. प्रतिकारशक्ती वाढवणे :- जर तुम्हाला सतत चक्कर येत असेल, थकवा जाणवत असेल तर तुमच्यात प्रतिकारशक्ती कमी आहे. त्यामुळे काकडीच्या बियांमध्ये असलेले झिंक तुमची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करेल. झिंक रोगप्रतिकारक पेशींच्या विकासासाठी आणि कार्यासाठी आवश्यक आहे. हे शरीराला संक्रमणांशी अधिक प्रभावीपणे लढण्यास मदत करते.

टॅग्स :फिटनेस टिप्सआरोग्यहेल्थ टिप्स