Lokmat Sakhi >Fitness > जेवताना १ चमचा ही चटणी खा; वजन भराभर कमी होईल-हाडं राहतील बळकट, चटणीची सोपी रेसिपी

जेवताना १ चमचा ही चटणी खा; वजन भराभर कमी होईल-हाडं राहतील बळकट, चटणीची सोपी रेसिपी

Health Benefits Of Flax Seeds Chutney : आळशीची चटणी खाल्ल्याने तब्येतीला बरेच फायदे मिळतात.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 18:23 IST2024-12-10T18:16:54+5:302024-12-10T18:23:13+5:30

Health Benefits Of Flax Seeds Chutney : आळशीची चटणी खाल्ल्याने तब्येतीला बरेच फायदे मिळतात.

Health Benefits Of Flax Seeds Chutney : Benefits Of Eating Flax Seeds Chutney | जेवताना १ चमचा ही चटणी खा; वजन भराभर कमी होईल-हाडं राहतील बळकट, चटणीची सोपी रेसिपी

जेवताना १ चमचा ही चटणी खा; वजन भराभर कमी होईल-हाडं राहतील बळकट, चटणीची सोपी रेसिपी

भारतीय  जेवणात चटण्यांना महत्वाचे स्थान आहे. चटण्यांचे सेवन तब्येतीसाठी बरेच फायदेशीर ठरते. चटणी एक असा पदार्थ आहे ज्याच्या सेवनानं फक्त तोंडाला चव येत नाहीतर तब्येतीलाही बरेच फायदे मिळतात. शरीरात मांसपेशींची कमतरता असल्यास त्यांच्यासाठी आळशीची चटणी फायदेशीर ठरते. (Health Benefits Of Flax Seeds Chutney)

ज्या महिलांना मासिक पाळीसंबंधित समस्या आहे  तसंच  हॉर्मोनल हेल्थ चांगली ठेवण्यासाठी आळशीची चटणी गरजेची असते. आळशीची चटणी खाल्ल्याने तब्येतीला बरेच फायदे मिळतात. याव्यतिरिक्त आळशीच्या बीया खाल्ल्यानं पोट भरलेलं राहतं. (Benefits Of Eating Flax Seeds Chutney)

आळशीच्या चटणीचे फायदे

वजन कमी करण्यासाठी आळशीची चटणी खाणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. आळशीच्या बीयांमध्ये फायबर्सचे प्रमाण जास्त असते ज्यामुळे मेटाबॉलिझ्म वेगानं वाढतो आणि वजन कमी होण्यास मदत होते. 
हाडांच्या चांगल्या आरोग्यासाठी आळशीची चटणी खाणं फायदेशीर ठरतं.

जेवणाआधी पाणी प्यायलं की वजन वाढत नाही? तज्ज्ञ सांगतात वजन कमी करण्याासाठी पाणी किती-केव्हा प्यावं

ज्यामुळे हाडं आतून निरोगी  होतात. याशिवाय हाडांना कॅल्शियम, प्रोटीन भरपूर प्रमाणात मिळते आणि हाडांची ताकद वाढते. महिलांसाठी आळशीच्या चटणीचे सेवन अनेक प्रकारे फायदेशीर ठरते. ज्यामुळे हॉर्मोनल हेल्थ चांगली राहते. मासिक पाळीत होणाऱ्या वेदनांपासून आराम मिळतो. तसंच महिलांचे शरीर आतून निरोगी राहण्यास  मदत होते. 

हाडांना मजबूत बनवण्यासाठी आणि आजारांपासून बचावासाठी अळशीची चटणी भरपूर खाल्ली जाते. आळशीतील कॅल्शियम, प्रोटीन भरपूर असते. ज्यामुळे आर्थरायटीससारख्या आजारांपासून सुटका होते.

आळशीची चटणी कशी करावी?

आळशीची चटणी करण्यासाठी सगळ्यात आधी तव्यावर आळशी भाजून घ्या. नंतर त्याच तव्यावर लसणाच्या पाकळ्या भाजा. नंतर दोन्ही पदार्थ मिक्सरच्या जारमध्ये  घालून वाटून घ्या. नंतर एका वाटीत काढून घ्या. त्यात मोहोरीचं तेल आणि मीठ मिसळा नंतर या चटणीचे सेवन करा. ज्यामुळे आळशीची चटणी चवदार, चविष्ट बनेल. ही चटणी तुम्ही मोहोरी किंवा कढीपत्त्याचा तडका लावून खाऊ शकता.

Web Title: Health Benefits Of Flax Seeds Chutney : Benefits Of Eating Flax Seeds Chutney

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.