Join us  

रोज चालता तरी १ इंच ही पोट कमी होत नाही? पाहा चालण्याची योग्य पद्धत, झरझर घटेल वजन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2023 10:11 AM

Health Benefits of Walking for Weight Loss : रिपोर्टनुसार हळूहळू चालण्याच्या तुलनेत रोज फास्ट चालल्याने अधिक फायदे मिळतात.

पायी चालणं तब्येतीसाठी उत्तम ठरते पण रोज किती चालायचं हे बऱ्याचजणांना माहित नसते. वजन कमी करण्यासाठी तर कोणी फिट राहण्यासाटी लोक १० हजार पाऊले चालण्यावर लक्ष केंद्रीत करतात. ग्रेनाडा विश्वविद्यालयातील एका अभ्यासानुसार मृत्यूचा धोका टाळण्यासाठी रोज  ८ हजार ८०० पाऊलं चालायला हवं. रिसर्चनुसार रोज चालल्याने काय फायदे मिळतात समजून घेऊ. (Health Benefits of Walking for Weight Loss)

संशोधकांनी ११, ००० पेक्षा जास्त लोकांवर अभ्यास केला.  यात पायी चालण्याच्या स्टेप्स, मृत्यूदर आणि हृदय रोगातील संबंधांची तपासणी करण्यात आली. मृत्यूदराचा जोखिम कमी करण्यासाठी रोज ८,८०० पाऊलं चालणं आदर्श मानले जाते. रोज १० हजारांपेक्षा ८ हजार ८०० पाऊलं चालल्यानेही तिककाच फायदा मिळतो. ७,२०० पाऊल चालणं पुरेसं असते.  

फास्ट वॉक जास्त फायदेशीर ठरतं

रिपोर्टनुसार हळूहळू चालण्याच्या तुलनेत रोज फास्ट चालल्याने अधिक फायदे मिळतात. रोज सकाळी १ तास पायी चालल्याने आरोग्याला बरेच फायदे मिळतात. शारीरिक आरोग्य सुधारण्यास मदत होते. हृदयाचे आजार कमी होण्यास मदत होते. 

पाय सडपातळ पण मांड्यांची चरबी खूपच वाढलीये? घरीच ३ सोपे व्यायाम करा-स्लिम, मेंटेन दिसाल

वजन कमी करण्यासाठी रोज ८ हजार ८०० स्टेप्स चालणं प्रभावी ठरतं. वेगानं चालल्याने कॅलरीज वेगाने बर्न होतात. ज्यामुळे वजन कमी करण्यासही मदत होते.  रोज पायी चालल्याने शरीराला खूप घाम येतो. याशिवाय शरीरातील टॉक्सिन्स बाहेर निघतात. आजारांचा धोकाही कमी होतो. डायबिटीस असलेल्यांसाठी रोज चालणं फायदेशीर ठरते. यामुळे ब्लड शुगर लेव्हलही नियंत्रणात राहते.  रोज पायी चालल्याने ब्लड प्रेशर नियंत्रणात राहण्यास मदत होते.  व्यायामाने शारीरिक स्वास्थही यामुळे उत्तम राहते. 

पायी चालण्यासाठी योग्य वेळ कोणती?

रोज सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही अर्धा ते एक तास वेगाने चालू शकता. रोज चालल्याने आजार लांब राहण्यास मदत होते. सकाळी ८ ते १० या वेळेत सुर्यप्रकाशात चालल्याने व्हिटामीन डी मिळते. सकाळी रिकाम्या पोटी चालल्यास वजन कमी होण्यास मदत होते. याशिवाय पोटाचे त्रासही टळतात. पण जर तुम्हाला सकाळी वेळ मिळत नसेल तर जमेल तसे सकाळी किंवा संध्याकाळी चालायला जा.

टॅग्स :वेट लॉस टिप्सहेल्थ टिप्सफिटनेस टिप्स