Join us  

Health Tips : जीवघेण्या हार्ट अटॅकसह स्ट्रोकचा धोका कायमचा दूर होईल; फक्त रोज 'या' ३ गोष्टी करा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2021 5:04 PM

Health Tips : तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार शरीरात कॉलेस्ट्रॉलचे अतिप्रमाण हृदयरोगाचा धोका वाढवते.  

ठळक मुद्देलोक योग करण्यासाठी आपल्या मनानुसार वेळ निवडतात. पण योग्य परिणाम दिसून येण्यासाठी सकाळी रिकाम्या पोटी योगा करायला हवा.

चुकीची जीवनशैली, अनियमित खाण्यापिण्याच्या सवयी, तणाव, आळस, रात्री उशीरापर्यंत जागणं आणि उशीर उठण्याच्या सवयीनं कॉलेस्ट्रॉल, शुगर आणि फॅट्सचे प्रमाण वाढते. गुड कॉलेस्ट्रॉल आणि बॅड कॉलेस्ट्रॉल असे दोन प्रकार आहेत. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार शरीरात कॉलेस्ट्रॉलचे अतिप्रमाण हृदयरोगाचा धोका वाढवते.  

खराब कॉलेस्टेरॉल रक्त प्रवाह कमी करू शकते. यासाठी तुम्हाला तुमच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. जर तुम्ही देखील कोलेस्टेरॉल वाढल्यानं त्रस्त असाल आणि त्यावर नियंत्रण मिळवू इच्छित असाल तर प्राणायाम तुम्हाला मदत करू शकतो. यामुळे तुमचा हॉस्पिटलचा खर्च वाचेल. प्राणायाम केल्याने खराब कॉलेस्टेरॉल नियंत्रणात राहते, असेही काही संशोधनातून समोर आले आहे.

योगा करून गंभीर आजारांना लांब ठेवता येऊ शकतं.

एका संशोधनात योगाचे फायदे तपशीलात स्पष्ट केले आहेत. या संशोधनानुसार, बॅड कॉलेस्टेरॉल, उच्च रक्तदाब, मधुमेह, लठ्ठपणासह अनेक आजारांपासून मुक्त होण्यासाठी योगा फायदेशीर असल्याचं असं म्हटलं आहे. या संशोधनात 64 लोकांचा समावेश करण्यात आला. त्यापैकी ४१ पुरुष आणि २३ महिला होत्या. त्यांना दररोज प्राणायाम आणि हलका योगा करण्याचा सल्ला देण्यात आला. संशोधनात असे दिसून आले आहे की प्राणायाम करून वाढत्या कोलेस्टेरॉलवर नियंत्रण ठेवता येतं.

​भस्त्रिका प्राणायाम

स्वच्छ वातावरणात पद्मासनाच्या मुद्रेत बसून आपली मान आणि पाठीचा कणा सरळ रेषेत ठेवा. प्रथम एक दीर्घ श्वास घ्या आणि नंतर आपले फुफ्फुसे हवेनं भरा. त्यानंतर हळूहळू वेगाने श्वास बाहेर काढा. हे आसन एका वेळी किमान दहा वेळा करा. योगाचा हा प्रकार दररोज सकाळी आणि संध्याकाळी करा. याद्वारे कॉलेस्टेरॉल याद्वारे नियंत्रित केले जाऊ शकते.

उज्जयी प्राणायाम

उज्जयी हा शब्द संस्कृत शब्दापासून  तयार झाले आहे. इंग्रजीत याचा अर्थ विजय आहे. हा योगाप्रकार केल्याने एकाग्रता वाढते आणि चिंता दूर होते. त्याच वेळी, फुफ्फुसे सुरळीत काम करू लागतात. या योगामध्ये खोल श्वास सोडला जातो. रोज उज्जयी प्राणायाम केल्याने श्वसन प्रणाली मजबूत होते.

कपालभाती

या योगामध्ये दीर्घकाळ श्वास रोखण्याचा प्रयत्न केला जातो. यासह, पोट आणि फुफ्फुसांच्या मदतीने श्वास बाहेर काढला जातो. यामुळे फुफ्फुसे शुद्ध होतात. हा योगा प्रकार केल्याने पचन आणि श्वसन प्रणाली मजबूत होते.लोक योग करण्यासाठी आपल्या मनानुसार वेळ निवडतात. पण योग्य परिणाम दिसून येण्यासाठी सकाळी रिकाम्या पोटी योगा करायला हवा. यावेळी तुम्ही बराचेळ काही खाल्लं नसेल म्हणून योगावर व्यवस्थित लक्ष केंद्रीत करता येईल. झोपेतून उठल्यानंतर ३० मिनिटांनंतर तुम्ही योगा करायला हवा.  जर सकाळी वेळ मिळत नसेल तर तुम्ही संध्याकाळीसुद्धा योगा करू शकता. फक्त रात्रीच्या जेवणाच्या ६० किंवा ९० मिनिटं आधी योगा करायला हवा. 

जर तुम्ही  सकाळच्यावेळी योगा करत असाल आणि उठून  जवळपास १ ते २ तास झाले असतील तर योगा करण्याच्या  ४५ मिनिटं आधी तुम्ही काहीतरी खायला हवं. कारण तुम्हाला उठून बराचवेळ झाला आहे. शरीरातील उर्जाही हळूहळू कमी होऊ लागते. असा स्थितीत योगा करणं शक्य होत नाही. म्हणून सकाळी उठल्यानंतर लगेचच योगा करायला हवा. उशीर झाल्यास  ४५ मिनिटं आधी फळांचा रस किंवा फळांचे सेवन करायला हवं. त्यामुळे शरीराला त्रास जाणवत नाही. 

टॅग्स :हृदयरोगहृदयविकाराचा झटकायोगहेल्थ टिप्सआरोग्य