Lokmat Sakhi >Fitness > मेंटेन फिगरसाठी मलायका वर्षानुवर्ष पितेय पिते Black Water; वाचा 'या' पाण्याचे फायदे अन् किंमत

मेंटेन फिगरसाठी मलायका वर्षानुवर्ष पितेय पिते Black Water; वाचा 'या' पाण्याचे फायदे अन् किंमत

Health Tips : बॉलीवूड अभिनेत्री आणि खेळाडूसुद्धा वेळोवेळी चांगल्या शरीरयष्टीसाठी पाण्याचं सेवन किती गरजेचं आहे हे लोकांना पटवून देतात. कारण प्रत्येकालाच सिलिब्रिटींचा फिटनेस फंडा माहित करून घ्यायचा असतो. 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2021 05:13 PM2021-08-20T17:13:03+5:302021-08-20T17:27:41+5:30

Health Tips : बॉलीवूड अभिनेत्री आणि खेळाडूसुद्धा वेळोवेळी चांगल्या शरीरयष्टीसाठी पाण्याचं सेवन किती गरजेचं आहे हे लोकांना पटवून देतात. कारण प्रत्येकालाच सिलिब्रिटींचा फिटनेस फंडा माहित करून घ्यायचा असतो. 

Health Tips : Celebrity malaika arora virat kohli drink black water benefits of this water | मेंटेन फिगरसाठी मलायका वर्षानुवर्ष पितेय पिते Black Water; वाचा 'या' पाण्याचे फायदे अन् किंमत

मेंटेन फिगरसाठी मलायका वर्षानुवर्ष पितेय पिते Black Water; वाचा 'या' पाण्याचे फायदे अन् किंमत

Highlightsकिटो डाएट, योगा, जिम वर्कआऊट यांचा आधार घेत सेलिब्रिटि स्वतःला वर्षानुवर्ष मेटेंन ठेवतात. त्यापैकीच एक म्हणजे ‘ब्लॅक वॉटर’.

आपलं आरोग्य चांगलं राहण्यासाठी पाण्याचे सेवन  फार महत्वाचं आहे. त्वचा, शरीर निरोगी राहण्याची भरपूर पाणी पिण्याची आवश्यकता असते. पाणी प्यायल्यानं शरीरातील टॉक्सिन्स बाहेर निघून जाण्यास मदत होते, त्वचेवरही ग्लो येतो.  बॉलीवूड अभिनेत्री आणि खेळाडूसुद्धा वेळोवेळी चांगल्या शरीरयष्टीसाठी पाण्याचं सेवन किती गरजेचं आहे हे लोकांना पटवून देतात. कारण प्रत्येकालाच सिलिब्रिटींचा फिटनेस फंडा माहित करून घ्यायचा असतो. 

किटो डाएट, योगा, जिम वर्कआऊट यांचा आधार घेत सेलिब्रिटि स्वतःला वर्षानुवर्ष मेटेंन ठेवतात. त्यापैकीच एक म्हणजे ‘ब्लॅक वॉटर’.  उर्वशी रौतेला, श्रुती हसन आणि विराट कोहली  यांसारखे सेलिब्रिटी ब्लॅक वॉटरचे सेवन  करतात. फिटनेस मेंटेन ठेवण्यासाठी हे सेलिब्रेटी ब्लॅक अल्कलाइन वॉटरचं (Alkaline Black water) सेवन करतात. 

अहवालानुसार, ब्लॅक वॉटर तयार करण्यासाठी  ब्लॅक मिनरल्सचा (Black minerals) वापर केला जातो. पाण्यात 70 टक्के खनिजं टाकली जातात, त्यामुळे पाण्याचा रंगही काळा होतो. यामुळेच हे पाणी साध्या पाण्यापेक्षा जास्त हेल्दी (Black water healthy) होतं. या पाण्याची किंमत 3 ते 4 हजार प्रति लिटर  एवढी असते. हे पाणी प्यायल्यानं शरीराला अनेक फायदे मिळतात.

या पाण्यात शरीरासाठी आवश्यक असणारी पोषक तत्व असतात.  अल्कलाइन वॉटर साध्या पाण्यासारखेचं असते. पण यात पोषणमुल्यांचे प्रमाण जास्त असते. बीपी, डायबिटिस आणि हाय कॉलेस्ट्रॉलची समस्या असलेल्यांसाठी या पाण्याचे सेवन फायदेशीर ठरते. 

ब्लॅक वॉटरच्या सेवनाचे फायदे

ब्लॅक वॉटरमध्ये पाण्याचे कम्पाऊंट्स साध्या पाण्याच्या तुलनेत लहान असतात म्हणून ते शरीरात लगेच शोषले जातात. त्यामुळे  शरीर जास्तवेळ हायड्रेट राहते. स्नायू जास्त लवकर बळकट होतात आणि सांधे देखील ल्युब्रिकंट व्यवस्थित होतात. 

ब्लॅक वॉटरच एसिडिटी कमी करून शरीरातील पीएच संतुलित ठेवण्यासाठी मदत करते. या पाण्यामुळे शरीराच्या विविध अवयवांतून निर्माण होणारं अॅसिड नियंत्रणात राहतं. अल्कलाइन वॉटर पचनक्रिया (Black water for metabolism) चांगली करते. 

या पाण्याच्या सेवनानं रोगप्रतिकारकशक्ती चांगली राहते. दिवसभर फ्रेश वाटतं. ब्लॅक वॉटरमध्ये मोठ्या प्रमाणात अँटी ऑक्सिडंट आणि मिनरल्स असतात त्यामुळे कॅलरीज कमी होण्यास मदत होते. हे पाणी फ्री रेडिकल्स कमी करण्यात मदत करतात.  त्वचेसह, केसांसाठी या पाण्याचे सेवन फायदेशीर ठरतं. 
 

Web Title: Health Tips : Celebrity malaika arora virat kohli drink black water benefits of this water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.