बिझी लाईफस्टाईलमुले लोक आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात यामुळे लठ्ठपणा वाढत चालला आहे. जास्त चरबी शरीरावर जमा झाल्यास अनेक गंभीर आजारही उद्भवतात. व्यस्त जीवनशैलीतून वेळ काढून तुम्ही वॉकिंग किंवा रनिंग करू शकता. (Belly Fat And Weight Loss) वजन कमी करण्याासाठी वॉकिंग करावं की रनिंग ते समजून घेऊया. शारीरिक क्षमता आणि वयानुसार तुम्ही चालायचं की धावायचं ते ठरवू शकता. जर तुम्हाला कोणताही आजार असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने व्यायाम करा. (Health Walking Vs Running Which Is Best For loosing Belly Fat)
मेडिकल न्यूज टु डे च्या रिपोर्टनुसार वॉक आणि रन हे दोन्ही प्रकार कार्डिओ प्रकारात येतात. कार्डिओ आपला फिटनेस सुधारण्यासाठी उत्तम आहे. ज्यामुळे कॅलरीज बर्न होतात. वजन आणि फॅट दोन्ही कमी होते.
याव्यतिरिक्त कोलेस्टेरॉल लेव्हलही मेंटेन राहते. हाय ब्लड शुगर, हाय ब्लड प्रेशर आणि हार्टशी संबंधित आजार टाळण्यासाठी कार्डिओ गरजेचा आहे. ज्यामुळे तुमचा स्लिप पॅटर्न आणि स्ट्रेस कमी होतो. याव्यतिरिक्त इम्यूनिटी पण बुस्ट होते.
कॅलरीज बर्न करण्यासाठी सगळ्यात उत्तम काय ठरतं?
चालणं आणि धावणं दोन्ही तब्येतीसाठी उत्तम ठरतात. पण जास्त कॅलरीज बर्न करण्यासाठी धावणं हा उत्तम पर्याय आहे. अमेरिकन काऊंसिल ऑन एक्सरसााईजच्या रिपोर्टनुसार जे लोक १६० पाऊंड चे आहेत ते धावल्याने प्रत्येक मिनिटाला १५.१ कॅलरीज बर्न करू शकतात.
याच वजनाचे व्यक्ती वॉक करतात प्रत्येक मिनिटांला ८.७ कॅलरीज बर्न करतात. रिपोर्टनुसार वॉकींगच्या तुलनेत रनिंग कॅलरीज बर्न करण्यास मदत करते. या दोन्ही व्यायामांमुळे मेंटल हेल्थ चांगली राहते. १५० मिनिटं चालल्याने हार्ट डिसीजची रिस्क कमी होते. बेली फॅटही वेगाने कमी होते.
गुडघे-पाठीचं दुखणं वाढलंय? सकाळी फक्त १ लाडू खा, हाडांना येईल बळकटी-पोलादी शरीर होईल
रनिंगमुळे स्टॅमिना बुस्ट होण्यास मदत होते. जर तुम्हाला सवय नसेल तर तुम्ही आधी वॉक करा. त्यानंतर रनिंगची सवय लावा. सकाळी ७ ते ९ ही वेळ चालण्यासाठी उत्तम आहे. तुम्हाला सकाळी चालायला जमत नसले तर तुम्ही संध्याकाळी चालू शकता.