Lokmat Sakhi >Fitness > ओटी पोट सुटलं-मांड्या मोठ्या दिसतात? नाश्ता-जेवणाला काय खायचं पाहा, महिन्याभरात वजन घटेल

ओटी पोट सुटलं-मांड्या मोठ्या दिसतात? नाश्ता-जेवणाला काय खायचं पाहा, महिन्याभरात वजन घटेल

Healthy Diet Plan To Lose Weight Experts : अनेकदा क्रॅश डाएट वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतं.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2024 12:55 PM2024-10-02T12:55:28+5:302024-10-02T13:04:59+5:30

Healthy Diet Plan To Lose Weight Experts : अनेकदा क्रॅश डाएट वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतं.

Healthy Diet Plan To Lose Weight Experts : Weight Loss Diet by Experts | ओटी पोट सुटलं-मांड्या मोठ्या दिसतात? नाश्ता-जेवणाला काय खायचं पाहा, महिन्याभरात वजन घटेल

ओटी पोट सुटलं-मांड्या मोठ्या दिसतात? नाश्ता-जेवणाला काय खायचं पाहा, महिन्याभरात वजन घटेल

निरोगी पद्धतीनं वजन कमी करणं हे संतुलनावर अवंलबून असते. एस्क्ट्रा कॅलरीजचे सेवन न करून पोषक तत्व असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करायला हवा. (Health Tips) वजन कमी करण्यापासून मेंटेन करण्यासाठी काही सोपे उपाय करून पाहायला हवेत.  अनेकदा क्रॅश डाएट वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतं. पण शरीरावर याची लक्षणं उशीरा दिसतात. या प्रकारचे डाएट तुमच्यासाठी नुकसानकारक ठरू शकते. (Healthy Diet Plan To Lose Weight Experts)

डाएटव्यतिरिक्त पोषक तत्वांनी परिपूर्ण पदार्थांचा आहारात समावेश करा. न्युट्रिशनिस्ट  रीतू छाबडा सांगतात, की, वजन कमी करण्यासाठी जेवण सोडणं तुमच्यासाठी अधिक धोकादायक ठरू शकतं. खासकरून तुम्ही सकाळचा पहिला मील सोडता तेव्हा मेटाबॉलिज्म स्लो होतो ज्यामुळे वजन वाढतं वजन कमी करणं तुमच्यासाठी कठीण होऊ शकतं. हेल्दी डाएट प्लॅन  वजन कमी करण्यात मदत करू शकतो. या पदार्थांचा आपल्या आहारात समावेश करू शकता. 

दिवस पहिला

तुम्ही नाश्त्याला होल व्हिट टोस्ट , १ उकडलेलं अंड, दीड एवोकाडो आणि ग्रीन टी ने आपल्या दिवसाची सुरूवात करा. नाश्ता केल्यानंतर दीड तासानंतर मुठभर नट्स आणि १ सफरचंद खा. दुपारच्या जेवणात  ग्रिल्ड भाज्या किंवा मिक्स ग्रीन्स खाऊ शकता. काकडी, चेरी टोमॅटो आणि हलकं ऑलिव्ह ऑईल आणि लिंबाचा समावेश करा. तुम्ही टोफू सॅलेडबरोबर १ कप क्विनोआ किंवा ब्राऊन राईस घेऊ शकता.

दुपारच्या जेवणानंतर भूक लागत असेल तर  ४ वाजताच्या सुमारास ग्रीक योगर्ट किंवा बेरीज घेऊ शकता. रात्रीच्या जेवणात पनीर एक उत्तम पदार्थ आहे. याशिवाय स्टिम्ड ब्रोकोली आणि गाजर प्लेटमध्ये समावेश करू शकता याशिवाय १ छोटं रताळंसुद्धा घ्या. संध्याकाळचं जेवण ७ वाजतापर्यंत झालेलं असायला हवं. रात्री  तुम्ही उशीरा झोपत असाल तर एक तास आधी हळदीचं दूध किंवा ग्रीन टी पिऊन झोपा.

वजन कमी करण्यासाठी खास टिप्स

पोर्शन कंट्रोल

जास्त खाणं टाळायला हवं आपल्या सर्विंग्सकडे लक्ष द्या. अशी प्लेट निवड ज्यात पोर्शनिंग केलं गेलं असेल. ज्यामुळे जास्त खाणं टाळता येतं. 

एक्टिव्ह राहा

 वजन कमी करण्यासाठी नियमित व्यायाम करणं गरजेचं आहे दिवसभरात 30 मिनिटांचा व्यायाम करा पायी चाला. सायकल असो किंवा स्ट्रेंथ ट्रेनिंग असो.

शरीर हायड्रेट ठेवा

वजन कमी करण्याासाठी भरपूर पाणी पिणं खूप गरजेचं आहे. याशिवाय हर्बल टी किंवा ग्रीन टी प्यायल्यानं तुम्ही वजन नियंत्रणात ठेवू शकता ज्यामुळे शरीर पूर्णपणे हायड्रेट राहते.

आपली प्रोग्रेस ट्रॅक करा

आपली प्रोग्रेस ट्रॅक करण्यासाठी प्रेरीत राहा. रोज स्वत:ला छोटे छोटे गोल्स द्या आणि दिवसाच्या शेवटी ते पूर्ण केलं की नाही ते लिहा. न्युट्रिशनिस्टच्या सल्ल्यानुसार तुम्ही डाएटमध्ये फेरबदल  करू शकता. 

Web Title: Healthy Diet Plan To Lose Weight Experts : Weight Loss Diet by Experts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.