Lokmat Sakhi >Fitness > ९० टक्के लोक चालताना 'ही' चूक करतात म्हणून वजन जसच्या तसंच राहतं; नेमकं कधी चालावं,पाहा

९० टक्के लोक चालताना 'ही' चूक करतात म्हणून वजन जसच्या तसंच राहतं; नेमकं कधी चालावं,पाहा

Healthy Empty Stomach or Post Meal Walk :  रोज १० हजार पाऊलं चालणं हा फिटनेसचा ट्रेंड झाला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2024 09:37 PM2024-10-03T21:37:29+5:302024-10-03T21:42:17+5:30

Healthy Empty Stomach or Post Meal Walk :  रोज १० हजार पाऊलं चालणं हा फिटनेसचा ट्रेंड झाला आहे.

Healthy Empty Stomach or Post Meal Walk Which Has Miraculous Benefits For Weight Loss | ९० टक्के लोक चालताना 'ही' चूक करतात म्हणून वजन जसच्या तसंच राहतं; नेमकं कधी चालावं,पाहा

९० टक्के लोक चालताना 'ही' चूक करतात म्हणून वजन जसच्या तसंच राहतं; नेमकं कधी चालावं,पाहा

चालणं (Walk) हा एक उत्तम व्यायाम आहे वजन कमी करण्यासाठी अनेक वर्षांपासून लोक चालण्याचा व्यायाम करत आहेत. जुन्या जमान्यात लोक ना जीमला जायचे ना योगा क्लासेसला पण दिवसभर चालणं आणि मेहनतीचे काम करणं हेच त्यांचं फिटनेस सिक्रेट होतं. (Healthy Empty Stomach or Post Meal Walk) आजकाल लोक फिटनेससाठी मॉर्निंग वॉक किंवा इव्हिनिंग वॉक करतात.  रोज १० हजार पाऊलं चालणं हा फिटनेसचा ट्रेंड झाला आहे. कोणतंही फॅन्सी डाएट करून तुम्ही वजन कमी करण्यापेक्षा तुम्ही एक चांगलं हेल्दी डाएट घेऊ शकता. मानसिक आरोग्यासाठी हे फायदेशीर ठरते. (90% of people make this mistake while walking)

जामा न्युरोलॉजी आणि जामा इंटरनल मेडिसिनच्या अभ्यासानुसार रोज कमीत कमी ३० मिनिटं चालल्यानं कॅन्सर आणि वेळेआधी मृत्यू होण्याचा धोका १० टक्के कमी होतो. जर तुम्ही रोज १० हजार पाऊलं चाललात हेल्थ रिस्क जास्त असते वॉकिंगमुळे फक्त शारीरिक स्वास्थ चांगले राहते याशिवाय मानसिक आरोग्यही चांगले राहते आणि तब्येतीवरही सकारात्मक परिणाम होतो.

ऐन सणासुधीला मान काळवंडलेली दिसते? चमचाभर बेसनात 'हा' पदार्थ मिसळून लावा; चमकेल मान

रिकाम्या पोटी चालण्याचे फायदे

रात्री झोपण्यासाठी सकाळी पहिल्यांदा चालल्यानंतर मेटाबॉलिझ्म चांगला राहतो आणि शरीर पोषक तत्वांना व्यवस्थित शोषून घेते. 

एक उत्तम मेटाबॉलिझ्म तुमची एनर्जी चांगली ठेवतो आणि तुम्ही पूर्ण दिवस न थकता काम करू शकता. चालल्यानं ब्लड फ्लो चांगला राहतो आणि एनर्जी वाढते. 

अभ्यासानुसार पोटाचे व्यायाम केल्यानं वजन कमी होण्यास मदत होते आणि वेगानं फॅट बर्न होण्यास मदत होते. जर तुम्ही वजन कमी करू शकत असाल तर वॉकिंगमुळे फायदे होतात.

नॉटिंगम ट्रेंट युनिव्हर्सिटीच्या अभ्यासानुसार रिकाम्या पोटी व्यायाम केल्यानं  ७० टक्के कॅलरीज बर्न होण्यास मदत होते. जे लोक खाण्याच्या दोन तासांनी व्यायाम करतात. त्यांच्याही शरीरात चांगला परिणाम दिसून येतो. 

...तर आपल्या आईचं सुद्धा ऐकू नका; काजोल सांगतेय आई झाल्यानंतरच्या मानसिक दबावाचा अनुभव

सकाळी रिकाम्या पोटी चालल्यानं तुम्हाला व्हिटामीन डी मिळेल. कारण सकाळच्या ऊन्हात गेल्यानं व्हिटामीन डी मिळते.  सकाळी ८ वाजताची वेळ व्हिटामीन डी च्या अवशोषणासाठी उत्तम आहे. ज्यामुळे इम्यूनिटी वाढण्यासही मदत होते. 

Web Title: Healthy Empty Stomach or Post Meal Walk Which Has Miraculous Benefits For Weight Loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.