Join us  

करिश्मा तन्नाचं जबरदस्त विकेंड वर्कआऊट, बघा फिटनेससाठी कशी घेतेय मेहनत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2022 8:21 AM

Fitness Tips by Actress Karishma Tanna: अभिनेत्री- मॉडेल करिश्मा तन्ना आणि तिचं फिटनेस प्रेम हे तर सगळ्यांना माहितीच आहे. आता पुन्हा तिने एक वर्कआऊट व्हिडिओ शेअर केला असून तो चांगलाच व्हायरल झाला आहे.

ठळक मुद्देकरिश्माचा नुकताच एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला असून यामध्ये ती जबरदस्त विकेंड वर्कआऊट करताना दिसत आहे. 

विविध मालिका, टीव्ही शो याद्वारे वेगवेगळ्या भूमिका साकारणारी अभिनेत्री करिश्मा तन्ना (Karishma Tanna) लोकप्रियतेच्या बाबतीत चांगलीच  अग्रेसर आहे. सोशल मिडियावर तिचे फॅन फॉलोईंग जबरदस्त असून तिच्या पोस्ट नेहमीच व्हायरल होत असतात. करिश्मा तिच्या फिटनेसबाबतही अतिशय जागरूक तर आहेच, पण फिटनेस- वर्कआऊट याचे वेगवेगळे व्हिडिओ टाकून ती तिच्या चाहत्यांनाही मोटीव्हेट करत असते. आता करिश्माचा नुकताच एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल (amazing workout video of Karishma Tanna) झाला असून यामध्ये ती जबरदस्त विकेंड वर्कआऊट करताना दिसत आहे. 

 

नेमकं कोणतं वर्कआऊट करतेय करिश्मा?या व्हिडिओमध्ये करिश्मा स्क्वॅट्स squats वर्कआऊट करताना दिसत आहे. यातली थोडी वेगळी पद्धत तिने वापरली असून रेझिस्टन्स कंट्रोल बेल्टच्या साहाय्याने ती व्यायाम करते आहे. हा बेल्ट तिच्या गुडघ्याला लपेटला गेला असून गुडघ्यातून खाली बेंड होऊन तिचा हा व्यायाम सुरू आहे.

श्रीलंकेची दाणादाण उडवणारी भारतीय संघाची तोफ रेणुका सिंग ठाकूर! बघा रेणुकाच्या कमाल संघर्षाचा प्रवास

“Calm down because it’s Saturdayyy,” असं कॅप्शन तिने या व्हिडिओला दिलं असून हा व्यायाम करणं खरोखरंच अतिशय अवघड असल्याचं तिच्या हालचाली आणि हावभावावरून दिसून येतं. यानंतर ती टायरच्या मदतीने एक वर्कआऊट करताना दिसते आहे. ते देखील अतिशय हार्ड वर्कआऊट असून यासाठी तिला तिच्या ट्रेनरचीही मदत घ्यावी लागते आहे.

 

करिश्मा करतेय त्या व्यायामाचे फायदे १. करिश्मा जो काही अवघड व्यायाम करतेय तो नेमका कशासाठी आणि काय त्याचे फायदे, असा प्रश्न पडणं अगदी साहजिकआहे. करिश्माचा हा व्यायाम लेग टोनिंगसाठी महत्त्वाचा मानला जातो.

दिवाळीत चमकेल चेहरा, खा ४ फळं आणि त्वचेला लावा १ स्पेशल स्क्रब

२. शिवाय या व्यायामाचे अनेक फायदे असून शरीराच्या अनेक भागातले मसल्स ग्रुप मजबूत करण्यासाठी हा व्यायाम उपयुक्त आहे.

३. फिटनेस लेव्हल वाढविण्यासाठी फायदेशीर व्यायाम. 

४. कॅलरी बर्न होण्यासाठीही हा व्यायाम उपयुक्त मानला जातो.

५. मसल्स टेंडॉन्स आणि लिगामेंट्स यांच्या बळकटीसाठीही हा व्यायाम चांगला आहे. 

 

टॅग्स :फिटनेस टिप्सव्यायामकरिश्मा तन्ना