Lokmat Sakhi >Fitness > बघा प्रिटी झिंटाचं जबरदस्त वर्कआऊट, जिममध्ये जाऊन केलं वेटलिफ्टिंग, व्हिडिओ व्हायरल

बघा प्रिटी झिंटाचं जबरदस्त वर्कआऊट, जिममध्ये जाऊन केलं वेटलिफ्टिंग, व्हिडिओ व्हायरल

Benefits Of Weight Lifting: खूप दिवसांनी जिममध्ये जाऊन प्रिटी झिंटाने ( Preity Zinta) पुन्हा व्यायामाला (exercise) सुरुवात केली आहे. बघा नेमका कोणता व्यायाम तिने केलाय आणि त्याचे काय फायदे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2022 05:23 PM2022-08-31T17:23:43+5:302022-08-31T17:24:33+5:30

Benefits Of Weight Lifting: खूप दिवसांनी जिममध्ये जाऊन प्रिटी झिंटाने ( Preity Zinta) पुन्हा व्यायामाला (exercise) सुरुवात केली आहे. बघा नेमका कोणता व्यायाम तिने केलाय आणि त्याचे काय फायदे.

Heavy workout by Preity Zinta, 5 Benefits of weight lifting, What is dead lift? Benefits of dead lift | बघा प्रिटी झिंटाचं जबरदस्त वर्कआऊट, जिममध्ये जाऊन केलं वेटलिफ्टिंग, व्हिडिओ व्हायरल

बघा प्रिटी झिंटाचं जबरदस्त वर्कआऊट, जिममध्ये जाऊन केलं वेटलिफ्टिंग, व्हिडिओ व्हायरल

Highlightsवेटलिफ्टिंगच्या इतर प्रकारांपेक्षा हा प्रकार थोडा जास्त अवघड आहे, असं मानलं जातं. कारण यामध्ये थेट जमिनीवरून वेटलिफ्टिंग करावं लागतं.

दिसायला एकदम चब्बी चिक्स या कॅटेगिरीत मोडणारी असली तरी प्रिटी झिंटा  ( Preity Zinta) तिच्या व्यायामाच्या आणि फिटनेसच्या बाबतीत चांगलीच नियमित आहे. तिचे फिटनेस (fitness) विषयीचे, जिममध्ये (gym) व्यायाम करतानाचे अनेक व्हिडिओ सोशल मिडियावर नेहमीच व्हायरल (viral video) होत असतात. व्यायामात खंड पडला होता आणि आता मात्र पुन्हा आपण जिममध्ये जाऊन व्यायामाला जबरदस्त सुरुवात केली आहे, असं सांगायलाही ती लाजत नाही. कारण काही महिन्यांपुर्वीही तिने अशीच एक पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली होती आणि आताही तिने जी पोस्ट शेअर केली आहे, त्याला तिने "Back in the gym after the longest time. Struggling a bit..But I know it will get better. Gotta start somewhere" असं कॅप्शन दिलं आहे.

 

कोणतं वर्कआऊट करतेय प्रिटी झिंटा?
आपल्याही व्यायामात अनेकदा खंड पडतो. पण आपल्यापैकी बऱ्याच जणांचा खंड हा काही महिन्यांचा किंवा काही वर्षांचा असतो. त्यासाठीच तर आपणही प्रिटीकडून हे शिकलं पाहिजे आणि व्यायाम, वर्कआऊटमधला खंड कमीतकमी ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या व्हिडिओमध्ये प्रिटी झिंटा वेट लिफ्टिंग प्रकारातलं वर्कआऊट करते आहे. वेटलिफ्टिंगचे अनेक प्रकार असून यापैकी डेड लिफ्ट (dead lift) हा प्रकार ती करतेय. वेटलिफ्टिंगच्या इतर प्रकारांपेक्षा हा प्रकार थोडा जास्त अवघड आहे, असं मानलं जातं. कारण यामध्ये थेट जमिनीवरून वेटलिफ्टिंग (weight lifting) करावं लागतं.

 

डेड वेटलिफ्ट करण्याचे फायदे 
(Benefits of dead lift)

१. hip extensors साठी हा सगळ्यात चांगला व्यायाम मानला जातो. 

२. कंबरेचं दुखणं कमी करण्यासाठी उपयुक्त्

३. चयापचय क्रिया म्हणजे मेटाबॉलिझम सुधारण्यासाठी फायदेशीर

४. बोन मिनरल डेन्सिटी वाढविण्यासाठी हा व्यायाम अधिक चांगला मानला जातो. 

५. हा व्यायाम करताना शरिरावरील अनेक ठिकाणच्या स्नायूंवर एकत्रित काम केलं जातं. त्यामुळे हा व्यायाम वेटलॉससाठीही उपयुक्त मानला जातो. 

 

 

Web Title: Heavy workout by Preity Zinta, 5 Benefits of weight lifting, What is dead lift? Benefits of dead lift

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.