बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खानला त्याची स्टाईल आणि फिटनेसमुळे ओळखल जात. परंतु या दोन्ही गोष्टींमध्ये त्याची आई हेलन देखील काही कमी नाही असे म्हणावे लागेल. डान्सर, अभिनेत्री असणाऱ्या हेलन यांना हिंदी सिनेमांमध्ये आयटम सॉंग सुरु करण्याचं श्रेय दिल जात. दिलखेच अदा, घायाळ करणार नृत्य यामुळे हेलन (Helen Khan) यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवायला सुरुवात केली. मेरा नाम 'चीन चीन चू' या गाण्याने त्यांच्या चाहत्यांना वेड लावलं, यामुळे त्यांना बॉलिवूडची पहिली आयटम गर्ल अशी ओळख मिळाली(Helen Proves Age Is Just A Number With Her Intense Pilates Session At 83).
फिट राहण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या वयाचे बंधन नसते, हे हेलन यांच्या फिटनेस मधून दिसून येते. साधारणतः वयाची साठी उलटली की आपण आपल्या फिटनेसकडे लक्ष देणे सोडून देतो. याचबरोबर हे वय असं असत की ज्यात पाठदुखी, कंबरदुखी, गुढघेदुखी अशा असंख्य समस्यांना सामोरे जावे लागते. आजकाल कामाच्या गडबडीत तसेच रुटीनमधून वेळ न मिळाल्याने फिटनेसकडे दुर्लक्ष करणारे अनेकजण आहेत. परंतु अशा अनेकजणांसाठी फिटनेसच्या बाबतीत ८५ वर्षांच्या हेलन एक उत्तम उदाहरण ठरत आहेत.सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर नम्रता पुरोहित हिने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती हेलन यांचा एक्सरसाइज प्रॅक्टिस घेताना दिसत आहे. हेलन यांनी या वयातही फिट राहण्यासाठी पिलाटे एक्सरसाइज (85-Year-Old Helen Practises Pilates) करण्यास सुरुवात केली आहे. ज्यामुळे त्यांना गुडघेदुखीपासून बराच आराम मिळालं असल्याचं त्या सांगत आहेत. आलिया भट्ट, करीना कपूर, मलायका अरोरा खान, जान्हवी कपूर आणि कतरिना कैफ यासारख्या जवळपास सर्व प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री पिलाटे (Pilates) करणे पसंत करतात(Helen impresses fans as she starts Pilates at 85).
पिलाटे म्हणजे काय ?
पिलाटेस हा व्यायामाचा अत्यंत जुना प्रकार आहे, परंतु सध्या तो लोकप्रिय होत आहे. पिलाटेसच्या सर्व मुव्हमेंट्स लो - इम्पॅक्ट असतात. म्हणजेच शारीरिक मेहनत कमी लागते. या व्यायामामुळे सर्व सांध्यांची गतिशीलता वाढते. कारण हा व्यायाम मसल्स ग्रुपवर काम करतो. यामुळे स्नायूंमध्ये होणारा ताण कमी होतो. पिलाटेसचे दोन प्रकार आहेत. पहिला फ्लोअर पिलाटेस हा जमिनीवर केला जातो आणि दुसरा रिफॉर्मर पिलाटेस हा मशीनच्या मदतीने करतात.
पिलाटे करण्याचे फायदे :-
१. पिलाटे करणे आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर असते.
२. पिलाटे केल्याने शरीराचे संतुलन चांगले राहते आणि पोटाचे स्नायूही मजबूत होतात.
३. यामुळे शरीरात लवचिकता येते आणि स्नायूंची वाढही होते.
४. हा व्यायाम तुमच्या स्नायूंचे आरोग्य सुधारण्यासाठी देखील उपयुक्त आहे.
५. बॉडी पोश्चर सुधारण्यासाठी पिलाटे करणे फायदेशीर ठरते.
६. पिलाटे केल्याने पाठदुखी, कंबरदुखी, गुढघेदुखी कमी होते, त्याचबरोबर स्नायू जखडण्याच्या समस्यपासून देखील मुक्तता मिळते.
वेळ मिळेल तसा केव्हाही व्यायाम करताय? थांबा, एक्स्पर्ट सांगतात योग्य वेळ कोणती...
योगासनं करायची पण तुमच्याही मनात योगाभ्यासाविषयी ५ गैरसमज आहेत? स्वत:ला तंदुरुस्त ठेवायचं असेल तर..
पिलाटे कुणी करावा ?
पिलाटेस हा व्यायाम प्रकार सर्वच वयोगटांतील व्यक्ती करु शकतात. ही एक प्रकारची कोअर अॅक्टिव्हिटी आहे. यामुळे शरीराच्या कोणत्याही भागावर फोकस होऊ शकतो. खासकरून चुकीचे बॉडी पॉश्चर, गर्भावस्थेनंतर शरीराचा एखादा भाग ढिला पडणे किंवा फॅट जमा झाल्यावर हा व्यायाम केल्यास फायदा होतो. तसेच खेळाडू आणि जे लोक हेवी एक्झरसाइज करू शकत नाहीत त्यांच्यासाठीही हा व्यायाम फायदेशीर आहे.