Lokmat Sakhi >Fitness > अंगात रक्त कमी आहे? खूप अशक्तपणा आलाय? खा ४ पदार्थ, राहा कायम फिट

अंगात रक्त कमी आहे? खूप अशक्तपणा आलाय? खा ४ पदार्थ, राहा कायम फिट

Hemoglobin Foods : पिस्त्याची चव अनेकांना आवडते. मूठभर पिस्त्यामध्ये 1.11 मिलीग्राम लोह असते. नियमित आहारात याचा समावेश केल्यास शरीरात लोहाचे प्रमाण वाढते.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2022 01:41 PM2022-09-30T13:41:06+5:302022-09-30T14:13:02+5:30

Hemoglobin Foods : पिस्त्याची चव अनेकांना आवडते. मूठभर पिस्त्यामध्ये 1.11 मिलीग्राम लोह असते. नियमित आहारात याचा समावेश केल्यास शरीरात लोहाचे प्रमाण वाढते.

Hemoglobin Foods : Dry fruits to increase hemoglobin deficiency disease food to eat walnut pistachio cashew almonds | अंगात रक्त कमी आहे? खूप अशक्तपणा आलाय? खा ४ पदार्थ, राहा कायम फिट

अंगात रक्त कमी आहे? खूप अशक्तपणा आलाय? खा ४ पदार्थ, राहा कायम फिट

जर आपल्या रक्तात हिमोग्लोबिनची कमतरता असेल तर शरीरात अशक्तपणा येतो आणि दैनंदिन जीवनातील सामान्य कामे करणे कठीण होते. हिमोग्लोबिन हे लोह-आधारित प्रथिने रक्त पेशींमध्ये असते. (How to increase hemoglobin) जे शरीराच्या सर्व अवयवांना ऑक्सिजन पोहोचवण्याचे काम करते. यासाठी तुम्हाला काही लोहयुक्त पदार्थांचे सेवन करावे लागेल, तरच हिमोग्लोबिनच्या कमतरतेवर मात करणे शक्य होईल. अशा परिस्थितीत तुमच्यासाठी कोणते ड्रायफ्रुट्स फायदेशीर ठरू शकतात ते समजून घेऊया. (Dry fruits to increase hemoglobin deficiency disease food to eat walnut pistachio cashew almonds)

अक्रोड

अक्रोड हे एक असे ड्रायफ्रूट आहे ज्यामध्ये पोषक तत्वांची कमतरता नसते. मूठभर सोललेल्या अक्रोडातून शरीराला सुमारे 0.82 मिलीग्राम लोह मिळते. जर हिमोग्लोबिनची कमतरता असेल तर दररोज अक्रोडाचे सेवन करावे.

पिस्ता

पिस्त्याची चव अनेकांना त्याकडे आकर्षित करते. मूठभर पिस्त्यामध्ये 1.11 मिलीग्राम लोह असते. नियमित आहारात याचा समावेश केल्यास शरीरात लोहाचे प्रमाण वाढते. ज्यामुळे हिमोग्लोबिनची कमतरता दूर होते.

काजू

अनेक मिठाई आणि पाककृती सजवण्यासाठी काजूचा वापर केला जातो.  मूठभर काजूमध्ये सुमारे 1.89 मिलीग्राम लोह असते. लोह आणि हिमोग्लोबिनच्या कमतरतेवर मात करण्यासाठी हा एक प्रभावी उपाय आहे.

बदाम

 आपण रोज बदाम खावेत असे अनेकदा म्हटले जाते, परंतु जर तुमचे शरीर हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे अशक्त झाले असेल तर दररोज सकाळी भिजवलेले बदाम तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतात. 
 

Web Title: Hemoglobin Foods : Dry fruits to increase hemoglobin deficiency disease food to eat walnut pistachio cashew almonds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.