Lokmat Sakhi >Fitness > वजन कमी करताना खाणं सोडत असाल तर थांबा! वाढतील पोटाचे विकार-दवाखान्यात वाढतील चकरा

वजन कमी करताना खाणं सोडत असाल तर थांबा! वाढतील पोटाचे विकार-दवाखान्यात वाढतील चकरा

Here's What Happens When You Skip Meals in Winter for Weight Loss : हिवाळ्यात जास्त भूक लागते, पण बरेच जण वजन कमी करण्यासाठी उपाशी राहतात; हे कितपत योग्य?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2024 06:07 PM2024-01-24T18:07:41+5:302024-01-24T18:08:34+5:30

Here's What Happens When You Skip Meals in Winter for Weight Loss : हिवाळ्यात जास्त भूक लागते, पण बरेच जण वजन कमी करण्यासाठी उपाशी राहतात; हे कितपत योग्य?

Here's What Happens When You Skip Meals in Winter for Weight Loss | वजन कमी करताना खाणं सोडत असाल तर थांबा! वाढतील पोटाचे विकार-दवाखान्यात वाढतील चकरा

वजन कमी करताना खाणं सोडत असाल तर थांबा! वाढतील पोटाचे विकार-दवाखान्यात वाढतील चकरा

वजन वाढू नये किंवा वाढलेलं वजन कमी करण्यासाठी आपण अनेक गोष्टी करून पाहतो. पण काही गोष्टी फायदेशीर ठरतीलच असे नाही. वजन वाढण्यामागे अनेक कारणे असू शकतात. शिवाय वाढलेलं वजन कमी करण्यासाठी अनेक फंडे बाजारात उपलब्ध आहेत. पण प्रत्येक फंडे वजन कमी करण्यास मदत करतीलच असे नाही. वजन वाढलं की फक्त शरीर बेढप दिसत नसून, इतर गंभीर आजारांचा देखील धोका वाढतो. यावर उपाय म्हणून बरेच लोकं डायटींग करतात.

डायटींग केल्याने वजन घटेल पण, आरोग्याचं काय? याचा थेट दुष्परिणाम आरोग्याला सहन करावा लागतो ते वेगळं. शिवाय हिवाळ्यात डायटिंग करून वजन कमी न करण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात(Here's What Happens When You Skip Meals in Winter for Weight Loss).

आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर वरालक्ष्मी सांगतात, 'हिवाळ्यात शरीराचे तापमान उबदार ठेवण्यासाठी अतिरिक्त चरबीची गरज भासते. बरेच जण वजन कमी करण्याच्या नादात कमी फॅट असलेले अन्न खातात. ज्याचा दुष्परिणाम पोटावर होतो. शिवाय बद्धकोष्ठता, पोटदुखी आणि मळमळ यांसारखी समस्या निर्माण होते. थंडीच्या दिवसात अनेकांना जास्त भूक लागते. जर भूक लागूनही आपण खाणं टाळत असाल तर, हानिकारक ठरू शकते.'

तेलकट खाल्लं तरी वजन वाढणार नाही, लक्षात ठेवा ३ मुख्य गोष्टी, वाढलेलं वजनही उतरेल चटकन

हिवाळ्यात वजन कमी झाल्याने पचनसंस्थेवर होतो परिणाम

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, आपले पोट रात्रंदिवस मशीनसारखे काम करत असते. थंडीच्या काळात पोटात तयार होणारे आम्ल खूप मजबूत होते. अशा परिस्थितीत पोटाला पुरेसे अन्न न मिळाल्यास पचनसंस्थेचे नुकसान होऊ शकते. मुख्य म्हणजे थंडीच्या काळात अधिक वेळ उपाशी राहिल्याने पोटदुखी, बद्धकोष्ठता आणि ऍसिडिटीचा त्रास होऊ शकतो.

पायऱ्या जा चढत- वजन घटेल झरझर; पण वजन कमी करण्यासाठी किती मिनिटे पायऱ्यांचा व्यायाम करावा?

डॉक्टरांचा सल्ला आवश्यक

हिवाळ्यात किंवा इतर कोणत्याही ऋतूत वजन कमी करताना तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या. जे लोकं मधुमेह, थायरॉईड किंवा इतर गंभीर आजारांनी ग्रस्त आहे, त्यांनी वजन कमी किंवा डायटिंग करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.

Web Title: Here's What Happens When You Skip Meals in Winter for Weight Loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.