Join us  

जेवल्यानंतर शतपावली करण्याचे ५ फायदे, जुनाट काहीतरी म्हणून नाक न मुरडता चालून तर पाहा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2023 3:25 PM

Here's Why Walking After Eating Is Good For Your Health रात्रीच्या जेवणानंतर चालावे का? नियमित १०० पावले चालल्याने खरंच फरक पडतो का?

जेवल्यानंतर नियमित शतपावली करावे, असा सल्ला थोरामोठ्यांनी आपल्याला दिलाच असेल. पण जेवल्यानंतर शतपावली करावी का? यामुळे खरंच वजन कमी होते का? जर शतपावली करणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते, तर किती वेळ चालावे? असे प्रश्न आपल्याही मनात निर्माण झाले असतील.

एकीकडे जेवणानंतर लगेच व्यायाम करू नये, असा सल्ला तज्ज्ञ देतात. मग चालणे देखील हा व्यायामाचा एक प्रकार आहे. त्यामुळे जेवल्यानंतर लगेच चालणे आरोग्यासाठी उत्तम ठरू शकते का? काही लोकं जेवल्यानंतर लगेच पहुडतात, व काही क्षणात झोपतात. पण ही क्रिया आरोग्यासाठी योग्य नाही. यामुळे लठ्ठपणा, मधुमेह आणि थायरॉईडसारख्या आजारांचा धोका वाढतो. डिनरनंतर किती वेळाने, व किती पावले चालावी हे पाहूयात(Here's Why Walking After Eating Is Good For Your Health).

शतपावली करण्याचे फायदे

अपचनाचा त्रास होईल कमी

ऑन्ली माय हेल्थ या वेबसाईटनुसार, 'जेवल्यानंतर काही लोकांना लगेच झोपण्याची सवय असते. ज्यामुळे अन्न व्यवस्थित पचत नाही. डिनरनंतर जर आपण शतपावली केली तर, अन्न व्यवस्थित पचेल. पचनसंस्थेशी संबंधित त्रास होणार नाही. यासाठी नियमित निदान १०० पावले चालावे.'

दूध प्यायले नाही तर काय होईल? कॅल्शियमच्या कमतरतेव्यतिरिक्त शरीरात आणखी काय बदल घडतील?

वजन नियंत्रित राहील

वजन कमी करण्यासाठी चालणे हा एक उत्तम व्यायाम मानला जातो. नियमित चालल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो. शतपावली केल्याने पचनाच्या संबंधित त्रास होत नाही. मुख्य म्हणजे पोटात गॅस, पोट फुग्ण्याचा त्रासही कमी होतो. नियमित शतपावली केल्याने पोटाची चरबी कमी होते.

लेव्हलमध्ये राहील ब्लड शुगर

जेवल्यानंतर शतपावली केल्याने ब्लड शुगर नियंत्रणात राहते. ज्यामुळे मधुमेह होण्याचा धोका कमी होतो. त्यामुळे जेवल्यानंतर २ मिनिटे चाला.

मिडनाईट क्रेविंग्स होणार नाही

सध्या लोकं उशिरा जेवण करतात, उशिरा झोपतात. ज्यामुळे अनेकांना मिडनाईट क्रेविंग्स होतात. मध्यरात्री अचानक काही ना काही खाण्याची इच्छा होते. मिडनाईट क्रेविंग्स टाळण्यासाठी जेवल्यानंतर लगेच झोपू नका, शतपावली करा. पौष्टीक आहार खा. मुख्य म्हणजे वेळेवर जेवा.

दात पिवळे म्हणून चेहऱ्यावरची स्माइल हरवली? चिमूटभर मीठाचे ३ सोपे उपाय, दात दिसतील पांढरेशुभ्र

स्ट्रेस होतो कमी

रात्रीच्या जेवणानंतर चालल्याने शरीरात एंडोर्फिन नावाचे हार्मोन्स तयार होतात. ज्यामुळे तणाव कमी होतो. या कारणामुळे निद्रानाशाची समस्याही कमी होते.

टॅग्स :हेल्थ टिप्सआरोग्य