Join us  

व्हेजिटेरिअन आहात म्हणून आहारात प्रोटीन कमी पडतं? ५ व्हेज पदार्थ खा- मिळेल भरपूर प्रोटीन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2023 12:34 PM

High Proteins Foods for Vegetarian : बरेच लोक विचार करतात की, फक्त चिकन, मांस आणि अंड्यांमध्ये प्रोटीन्स असतात. पण व्हेजिटेरियन पदार्थांमध्येही प्रोटीन्स असतात.

चांगल्या आरोग्यासाठी प्रोटीन्सची खूप आवश्यकता असते. प्रोटीन्स शरीराच्या विकासासाठी आणि मजबूतीसाठी गरजेचं असतं. प्रोटिन्सच्या कमतरतेनं तुम्हाला अशक्तपणा जाणवू शकतो. मसल्स ग्रोथसाठी प्रोटीन्स आवश्यक आहे. कमकुवत हाडांना स्ट्रॉग बनवण्यासाठी प्रोटीन्स गरजेचं आहे. यामुळे त्वचा, केस, नखं निरोगी राहण्यास मदत होते. याशिवाय पचनक्रियाही चांगली राहते. शरीरातील प्रोटीन्सची कमतरता दूर करण्यासाठी तुम्ही किचनमधल्या काही पदार्थांचे सेवन करू शकता. (High Proteins Foods for Vegetarian)

बरेच लोक विचार करतात की, फक्त चिकन, मांस आणि अंड्यांमध्ये प्रोटीन्स असतात. पण व्हेजिटेरियन पदार्थांमध्येही प्रोटीन्स असतात. रोजची प्रोटीन्सची कमतरता पूर्ण करण्यासाठी ५५ ग्राम आणि महिलांनी ४५ ग्राम प्रोटीन्सचे सेवन करायला हवे. डाळी, बियांच्या सेवनानं तुम्हाला भरभरून प्रोटीन्स मिळतील.( 6 high protein beans and legumes in your diet to muscle growth and beat weakness)

प्रोटीन्सची कमतरता पूर्ण करण्यासाठी डाळी खा

डाळ व्हेजिटेरियन लोकांसाठी प्रोटीन्सचा उत्तम स्त्रोत आहे. एफडीएच्या रिपोर्टनुसार एक कप शिजवलेल्या डाळीत १७.९ ग्राम प्रोटीन्स असतात. यात 15.6 ग्राम  फायबर्स असतात तर आयरनचे प्रमाणही अधिक असते. जे शरीराला हिमोग्लोबिन बनवण्यास मदत करते याशिवाय डाळ ब्लड शुगर कमी करण्याासाठीही फायदेशीर ठरते.

प्रोटीन्सचा भंडार आहेत काबुली चणे

काबुली चणे फायबर्स आणि प्रोटीन्सचा उत्तम स्त्रोत आहेत. शिजवलेल्या काबुली चण्यांमध्ये १४.५ ग्राम प्रोटीन्स असतात. १२.५ ग्राम फायबर्स असतात. काबुली चणे डायबिटीसच्या रुग्णांमध्ये ब्लड शुगर कमी करण्यासाठी तसंच वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात. 

राजमा

राजमा प्रोटीन्सचा चांगला स्त्रोत आहे. राजमाच्या बियांमध्ये प्रोटीन्स असतात. राजमा भाताबरोबर खाल्ला जातो. एक कप राजमामध्ये १५.३ ग्राम प्रोटीन असते. फायबर्सचाही चांगला स्त्रोत आहे. यामुळे डायबिटीस आणि ब्लड प्रेशर, हृदयाचे आजार कमी करण्यास मदत होते. 

ब्लॅक बीन्स

ब्लॅक बीन्स फायबर्स, प्रोटीन्स आणि फोलेटचा चांगला स्त्रोत आहे. एक कप शिजलेल्या ब्लॅक बीन्समध्ये १५.२ ग्राम प्रोटीन्स असतात. पोषक तत्वांनी परिपूर्ण असलेल्या बीन्स इंसुलिन संवेदनशीलता सुधारण्यास  मदत करतात. याचा ग्लायलेमिक इंडेक्सही कमी असतो. यामुळे डायबिटीसच्या रुग्णांसाठी ते उत्तम ठरते.

सोयाबिन

सोयाबीन प्रोटीन्सचा एक उत्तम स्त्रोत आहे. १ कप शिजलेल्या  सोयाबीनमध्ये 31.3 ग्राम प्रोटीन असते. यामुळे फायबर्स, आयरर्न आणि कॅल्शियमसारखी पोषक तत्व मिळतात. सोयाबीनमध्ये एंटीऑक्सिडेंट्स असतात. यामुळे शरीर मजबूत होण्यास मदत होते. 

कायम तरूण राहण्यासाठी करायच्या ५ गोष्टी, अमेरिकन डॉक्टरांचं सिक्रेट- खरं वय ऐकाल तर चकीत व्हाल!

मूग डाळ

मुग डाळ प्रोटीन्सचा एक उत्तम स्त्रोत आहे. एक कप उकळेल्या मूग डाळीत जवळपास १४.२ ग्राम प्रोटीन असते. याव्यतिरिक्त १५.४ ग्राम  आणि ५४.४ मिलिग्राम कॅल्शियमसुद्धा असते.  

टॅग्स :फिटनेस टिप्सहेल्थ टिप्सआरोग्य