Join us  

पोट सुटलं, कंबरेचा घेर वाढल्यानं खूप जाड दिसता? घरीच ५ व्यायाम करा; स्लिम-फिट दिसाल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2023 12:55 PM

Home Exercises For Belly Fat Reduction : घरच्याघरी काही व्यायाम प्रकार करून तुम्ही स्वत:ला मेंटेन ठेवू शकता. (Weight Loss tips) 

सध्याच्या जीवनशैलीत वजन वाढणं हे खूपच कॉमन झालं आहे. अनेकांना ओव्हरवेट असल्याच्या त्रासाला तोंड द्यावं लागतं. याचं कारण म्हणजे तासनतास बसून राहणं, पाणी कमी पिणं, व्यायाम न करणं, गोड पदार्थ जास्त खाणं याचा सरळ परीणाम वजनावर होतो. वजन कमी करण्यासाठी जास्त काहीही न करता तुम्ही १० मिनिटं वेळ काढलायला हवा. (Home Exercises For Belly Fat Reduction) यामुळे वजन नियंत्रणात राहील आणि कपडेसुद्धा घट्ट बसणार नाहीत.  घरच्याघरी काही व्यायाम प्रकार करून तुम्ही स्वत:ला मेंटेन ठेवू शकता. (Weight Loss tips) 

१) बर्पी

बर्पी व्यायाम कॅलरीज कमी करण्यात फायदेशीर ठरतो. छाती, हात, पाय आणि कोअर मसल्ससाठी फायदेशीर ठरते. बर्पी करण्यासाठी आपले पाय खांद्यापासून लांब करून सरळ उभे राहा. गुडघे वाकवून हात जमिनीवर ठेवा.  आता पायांना मागच्या बाजूनं पूश करून पुश-अपच्या स्थितीत या. एक पुशअप करा नंतर पायांना आपल्या हातांनी मागच्या बाजूला न्या. एक मिनिटासाठी हा व्यायाम करा. रोज ३ सेट्स करा. 

२) दोरी उड्या 

दोरी उड्या हा एक कार्डिओ व्यायाम आहे. चरबी कमी करण्यासाठी आणि स्टॅमिना वाढवण्यासाठी, हृदय मजबूत ठेवण्यासाठी आणि मेटाबॉलिझ्म वाढवण्यासाठी हा व्यायाम करायला हवा. सुरूवातीला हा व्यायाम एक मिनिटासाठी करा नंतर हळूहळू वेळ वाढवा. दोरी उड्या करण्यासाठी तुम्हाला जीमला जाण्याचीही गरज नाही.  घरीच तुम्ही १० ते १५ मिनिटात हा व्यायाम करू  शकता. 

३) प्लँक 

प्लँक व्यायाम खूपच सोपा आहे. यात तुमचे एब्स, पाठ आणि खांद्यांचा समावेश होतो. हा व्यायाम पोजिशन, बॅलेंन्स सुधारण्यास मदत करतो. प्लँक करण्यासाठी आधी पोटावर झोपा. मग हातांवर कोपरापर्यंत हात जमिनीवर ठेवून हातांवर जोर देऊन वर उठा आणि पायांची बोट फक्त जमिनीला टेकलेली राहू द्या. १५ ते ३० सेकंदासाठी या स्थितीत राहा नंतर सामान्य स्थितीत या. या व्यायामाचे ३ सेट्स केल्यानं तुमच्या शरीरात सुधारणा झालेली दिसेल.

४) जंपिंक जॅक

जंपिग जॅक व्यायाम हा सगळ्यात सोपा आणि इफेक्टिव्ह आहे.  हा व्यायम करण्यासाठी तुम्हाला तुमच्या हातापायांची एकत्र हालचाल करावी लागते. या व्यायामाचे ३ सेट्स करा. या व्यायामानं कार्डिओवॅस्क्युरल हेल्थ सुधारते. पूर्ण शरीरातील फॅट्स कमी होण्यास मदत होते. शरीरावर जमा झालेली अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते.

५) पुशअप्स

पुशअप्स हा एक उत्तम व्यायाम आहे. जो  छाती, खांदे, ट्रायसेप्स आणि कोअर मसल्सना  मजबूत करण्यासाठी फायदेशीर ठरतो. या व्यायामुळे फक्त शरीराला ताकद मिळत नाही तर पोश्चरही सुधारते.  तुम्ही वॉल पुशअप्सही करू शकता.

टॅग्स :हेल्थ टिप्सफिटनेस टिप्स