सध्याचे दिवस असे आहेत की धड ना हिवाळा ना धड उन्हाळा अशी गत झाली आहे. कारण ऋतू बदलतोय. त्यामुळे हवा बदल झाला आहे. सकाळी आणि रात्री हवेत गारवा असतो, तर दिवसा अगदी पंखा लावावा लागतो. वातावरणात असा बदल झाला की मग लहान मुलांसकट सगळेच आजारी पडतात. विशेषत: सर्दी- खोकला आणि काही जणांना ताप असं या आजारपणाचं लक्षण असतं. त्यामुळे सध्या सर्दीमुळे नाक बंद होऊन श्वास घ्यायला त्रास होतोय, असं म्हणणारे खूप आहेत. असा त्रास होणाऱ्या प्रत्येकासाठीच हा उपाय खूपच फायदेशीर ठरणारा आहे. ( How to get rid of breathing problem because of sardi or cold)
सर्दीमुळे नाक बंद झालं असेल तर उपाय
सर्दीमुळे नाक बंद झालं असेल किंवा चोंदल्यामुळे श्वास घ्यायला त्रास होत असेल तर काय उपाय करायचा, याची माहिती wellnesswithmanisha या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे.
घरी लावलेलं दही खूपच पातळ होतं? विकतसारखं घट्ट-गोड दही होण्यासाठी ४ टिप्स लक्षात ठेवा
हा उपाय तुम्ही कधीही करू शकता. हा उपाय करण्यासाठी सगळ्यात आधी ताठ बसा. यानंतर जी नाकपुडी बंद आहे त्या तळहाताची मुठ घाला. मुठ घालताना आधी अंगठा आत घ्या आणि मग बाकीची बोटे त्यावर ठेवा. यानंतर आता ती मुठ दुसऱ्या हाताच्या काखेत ठेवून दाब द्या. काही मिनिटांतच बंद पडलेली नाकपुडी मोकळी होईल आणि चांगला श्वास घेता येईल.