Lokmat Sakhi >Fitness > पोट फुगल्यासारखं वाटतं, नीट भूकही लागत नाही? खा ८ गोष्टी, गॅस-ॲसिडिटीचा करा बंदोबस्त

पोट फुगल्यासारखं वाटतं, नीट भूकही लागत नाही? खा ८ गोष्टी, गॅस-ॲसिडिटीचा करा बंदोबस्त

Home Remedies for Gas, Bloating and Acidity : बडीशेपेमध्ये असलेले तेलं, पचन सुधारण्यास मदत करते आणि गॅस आणि पोट फुगण्याची शक्यता कमी करते

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2023 10:58 AM2023-02-22T10:58:16+5:302023-02-22T13:38:11+5:30

Home Remedies for Gas, Bloating and Acidity : बडीशेपेमध्ये असलेले तेलं, पचन सुधारण्यास मदत करते आणि गॅस आणि पोट फुगण्याची शक्यता कमी करते

Home Remedies for Gas, Bloating and Acidity : 8 foods that can help beat bloating acidity and gas | पोट फुगल्यासारखं वाटतं, नीट भूकही लागत नाही? खा ८ गोष्टी, गॅस-ॲसिडिटीचा करा बंदोबस्त

पोट फुगल्यासारखं वाटतं, नीट भूकही लागत नाही? खा ८ गोष्टी, गॅस-ॲसिडिटीचा करा बंदोबस्त

उन्हाळ्यात बऱ्याच जणांना पोटाशी संबंधित  समस्यांचा सामना करावा लागतो. पोट नेहमी  भरल्यासारखं  वाटतं. थोडं खाल्लं तरी पोट गच्च भरल्यासारखं वाटतं आणि एसिडीटीचा त्रास होतो. फिजिकल एक्टिव्हीटीजचा अभाव, कमी पाणी पिणं, जेवणात फायबर्ययुक्त पदार्थांचं कमी प्रमाण पनचतंत्रात गॅस आणि सूज येण्याच्या समस्येला निमंत्रण देते. (Home Remedies for Gas, Bloating and Acidity)

ही समस्या टाळण्यासाठी खाण्यापिण्यात बदल करायला हवा.  युट्रिशनिस्ट शिखा अग्रवाल यांनी एका हिंदी वेबसाईडशी बोलताना उन्हाळ्यात कोणत्या पदार्थांचे सेवन टाळायचे याबाबत सांगितलेआहे. पोट, पचनक्रिया निरोगी ठेवण्यासाठी या टिप्स उपयुक्त ठरू शकतात. 

दही

दह्यात लॅक्टोबॅसिलस, एसिडोफिलस आणि बिफिड्सारखे बॅक्टेरीया असतात  ज्यामुळे पचनक्रिया चांगली राहते. गॅस सूजेची समस्याही टाळता येते. जेवणानंतर बिना साखरेचं दही खाल्ल्यानं पोट निरोगी, तंदरूस्त राहण्यात मदत होते. 

कलिंगड

कलिंगडात ९२ टक्के पाणी असतं यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात कलिंगडाचे सेवन फायदेशीर ठरतं. उन्हाळ्यात पाण्याची कमतरता भासत असल्यानं कलिंगड खाल्ल्यानं शरीर हायड्रेट राहतं. यातील पोटॅशियम, ब्लोटिंग आणि गॅस नियंत्रणात ठेवण्यात मदत करते. 

हळद

हळद पचनासंबंधी समस्यांवर उत्तम उपाय आहे. यामुळे पित्ताचा त्रास कमी होतो. यातील एंटी इंफ्लेमेटरी एजंट्सही असतात.  ज्यामुळे सूज कमी  करण्यात मदत होते. 

पालक

पालकात अविघनटनशील फायबर्स असतात. यामुळे पचन तंत्र साफ राहून गॅस, पोट फुगण्याची समस्या कमी होण्यात मदत होते. पण तुम्ही कच्चं पालक खाणं टाळावं कारण यामुळे गंभीर समस्या उद्भवू शकतात. 

अननस

या फळात ८५ टक्के पाणी असतं. ब्रोमेलॅन नावाचे एक प्रभावी पचन एंजाईम्सही यात असतात ज्यामुळे पचनतंत्र साफ राहण्यास मदत होते. यामुळे त्वचा चमकदार आणि ग्लोईंग दिसते. 

लिंबू

पोटासाठी सर्वात प्रभावी उपाय आहे. उन्हाळ्यात पोटाच्या तक्रारींपासून सुटका मिळवण्यासाठी लिंबूपाणी प्यावे. लिंबू पाणी एक सौम्य रेचक आहे, जे आतडी स्वच्छ करण्यास आणि सूज दूर करण्यास देखील मदत करते.

काकडी

काकडीत सिलिका आणि व्हिटॅमिन सी जास्त प्रमाणात आढळते. काकडीच्या या दोन गोष्टी पाणी धरून ठेवण्यास प्रतिबंध करतात. हे तुम्हाला सूज टाळण्यास मदत करते. याशिवाय आतड्यांची कार्यक्षमता वाढवून पोटाच्या समस्या दूर करतात.

बडीशेप

बडीशेपेमध्ये असलेले तेलं, पचन सुधारण्यास मदत करते आणि गॅस आणि पोट फुगण्याची शक्यता कमी करतात आणि म्हणूनच जेवणानंतर बडीशेप चघळण्याची शिफारस केली जाते.

Web Title: Home Remedies for Gas, Bloating and Acidity : 8 foods that can help beat bloating acidity and gas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.