आजकाल प्रत्येकाचीच जीवनशैली खूप बदलली आहे. आहारात तर बदल झाला आहेच, पण चालण्या- फिरण्याची सवयही अनेकांची कमी झाली आहे. त्या तुलनेत बैठ्या कामाचे तास मात्र वाढले आहेत. यामुळे एकतर चालण्याचा सराव नसतो. आणि दुसरं म्हणजे वजन वाढत जातं. या दोन्हींचा एकत्रित परिणाम म्हणजे मग कमी वयातच गुडघे कुरकुरायला ( exercise for knee pain) लागतात. कमी वयात हा त्रास सुरू झाला असेल किंवा गुडघेदुखी मागे लागूच नये, असं वाटत असेल, तर आतापासूनच हे काही व्यायाम नियमित करायला सुरुवात करा. हा उपाय इन्स्टाग्रामच्या consciouslivingtips या पेजवर शेअर करण्यात आला आहे.
गुडघेदुखी कमी करण्यासाठी ५ व्यायाम१. पहिला व्यायाम करण्यासाठी पाठीवर झोपा. एक पाय गुडघ्यात दुमडून पोटावर घ्या. तो पाय दोन्ही हातानी पकडा. आता दुसरा पाय सरळ ९० डिग्री कोनात वर उचला आणि पुन्हा खाली घ्या. ही क्रिया प्रत्येकी १०- १० वेळा दोन्ही पायांनी करा.
हिवाळ्यात खायलाच पाहिजे बाजरी, कारण... वाचा बाजरी खाण्याचे ६ जबरदस्त फायदे
२. दुसऱ्या व्यायामासाठी एका अंगावर झोपा. एक हात डोक्याखाली घ्या. जो पाय जमिनीला टेकलेला आहे, तो गुडघ्यात दुमडून घ्या. दुसरा पाय सरळ रेषेत वर उचला आणि पुन्हा खाली घ्या. दोन्ही पायांनी ही क्रिया प्रत्येकी १०- १० वेळा करा.
३. तिसरा व्यायाम करण्यासाठी जमिनीवर पाठीवर झोपा. एक पाय गुडघ्यात दुमडून घ्या. दुसऱ्या पायाच्या गुडघ्याखाली टॉवेलची गुंडाळी ठेवा. आता तो पाय वर उचला. ५ ते ६ सेकंद राहू द्या. पुन्हा जमिनीला टेकवा. हा व्यायाम दोन्ही पायांनी प्रत्येकी ५- ५ वेळा करा.
२० हजारांची साडी आणि त्यावर ९ हजारांची बांगडी... पहा करिश्मा कपूरच्या ऑर्गेंझा साडीचा अनोखा थाट
४. चौथ्या व्यायामासाठी पाठीवर झोपा. दोन्ही पाय गुडघ्यात दुमडा आणि दोन्ही गुडघ्यांच्यामध्ये टॉवेलची गुंडाळी पकडा. आता कंबर उचला. ५ ते ६ सेकंद ही अवस्था टिकवा. पुन्हा पुर्वस्थितीत या. ही क्रिया ५ ते ६ वेळा करा.
५. पाचवा व्यायाम करण्यासाठी खुर्चीवर ताठ बसा. दोन्ही गुडघ्यांच्यामध्ये टॉवेलची गुंडाळी ठेवा. एक पाय वर उचलून जमिनीला समांतर ठेवा. पुन्हा खाली करा. ही क्रिया ५ ते ६ वेळा करा. आता दुसऱ्या पायानेही असाच व्यायाम करा.