Join us  

सतत स्क्रिन पाहून डोळ्यांवर ताण येतो, ड्रायनेस जाणवतो? १ सोपा उपाय, डोळ्यांना चटकन मिळेल आराम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2022 8:14 AM

How To Reduce Dryness And Stress On Eyes: प्रत्येकाचाच स्क्रिनटाईम सध्या खूप वाढलेला आहे. त्यामुळे हा त्रास अनेक जणांना जाणवतोच. म्हणूनच बघा त्यावरचा हा एक सोपा उपाय.

ठळक मुद्देडोळे लाल होणे, डोळ्यांवर ताण आल्यासारखा वाटणे, डोळे कोरडे पडणे असा त्रास तुम्हालाही जाणवत असेल तर तो कमी करण्यासाठी हा एक सोपा घरगुती उपाय

लॉकडाऊनपासून प्रत्येकाचंच स्क्रिनशी असणारं नातं जरा जास्तच घट्ट झालं आहे. कामानिमित्त तर अनेक जणांना ८- १० तास सतत स्क्रिन पाहावीच लागते. त्याला नाईलाज आहे. पण कामाव्यतिरिक्त मनोरंजन किंवा टाईमपास म्हणून वेगवेगळे गॅझेट्स बघत बसणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. लहान बालकांप्रमाणेच वयस्कर मंडळी आणि गृहिणीही यात अग्रेसर आहेत. त्यामुळे वाढत्या स्क्रिन टाईमचा (screen time) त्रास आता प्रत्येक वयोगटातील मंडळींना होत आहे. डोळे लाल होणे, डोळ्यांवर ताण आल्यासारखा वाटणे, डोळे कोरडे पडणे (Home remedies for reducing dryness of eyes) असा त्रास तुम्हालाही जाणवत असेल तर तो कमी करण्यासाठी हा एक सोपा घरगुती उपाय करून बघा. (How to get relief from stress on eyes)

 

अर्थातच तुमचा त्रास जर खूप जास्त असेल तर सगळ्यात आधी जाऊन डॉक्टरांचा सल्ला घेऊन येणे आणि त्यानुसार लवकरात लवकर योग्य औषधोपचार करणे कधीही उत्तम.

चिमुकलीला करायची होती आईची नक्कल, म्हणून मग तिच्या बाबांनी..... बघा व्हायरल व्हिडिओ

पण हा त्या आधी एक दोन वेळा घरच्याघरी हा उपाय करून बघायला हरकत नाही. एरवीही दररोज सकाळी ब्रश केल्यानंतर चेहरा धुतानाही तुम्ही हा उपाय करून पाहू शकता. यामुळे डोळे नक्कीच फ्रेश होतील. हा उपाय इन्स्टाग्रामच्या karthikmayur या पेजवर शेअर करण्यात आला आहे. 

 

डोळ्यांवरचा ताण कमी करण्यासाठी...१. हा उपाय करण्यासाठी सगळ्यात आधी मावेल तेवढे थंड पाणी तोंडात घ्या. 

थंडीमुळे अंग कोरडं पडून खूपच खाज येतेय? ३ उपाय करा, त्वचा होईल मऊ- मुलायम 

२. त्यानंतर पाणी तोंडात तसेच राहू द्या. आणि दोन्ही हातांच्या ओंजळीत स्वच्छ थंड पाणी घ्या. या ओंजळीतले पाणी डोळ्यांना लावा आणि डोळ्यांची उघडझाप करा. अशी क्रिया ३ ते ४ वेळा करा.

३. त्यानंतर तोंडातले पाणी बाहेर काढून टाका. 

४. हा उपाय केल्याने डोळ्यातली उष्णता बाहेर पडून त्यांच्यावरचा ताण कमी होण्यास मदत होईल. 

 

टॅग्स :फिटनेस टिप्सडोळ्यांची निगाहोम रेमेडी