Lokmat Sakhi >Fitness > Home remedies : पावसाळ्यात सर्दी, खोकल्यापासून बचावासाठी भाग्यश्रीनं शेअर केला जबदस्त उपाय; पाहा व्हिडीओ

Home remedies : पावसाळ्यात सर्दी, खोकल्यापासून बचावासाठी भाग्यश्रीनं शेअर केला जबदस्त उपाय; पाहा व्हिडीओ

Home remedies : दिवसातून दोन वेळा या जिन्नसांचे मिश्रण घेतल्यास पावसाचा मनसोक्त आनंद घेता येऊ शकतो. आजची मंगळवारची टिप सगळ्या मातांसाठी आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2021 03:34 PM2021-07-14T15:34:37+5:302021-07-14T15:52:10+5:30

Home remedies : दिवसातून दोन वेळा या जिन्नसांचे मिश्रण घेतल्यास पावसाचा मनसोक्त आनंद घेता येऊ शकतो. आजची मंगळवारची टिप सगळ्या मातांसाठी आहे.

Home remedies : Monsoon cold and cough remedy by bhagyashree article | Home remedies : पावसाळ्यात सर्दी, खोकल्यापासून बचावासाठी भाग्यश्रीनं शेअर केला जबदस्त उपाय; पाहा व्हिडीओ

Home remedies : पावसाळ्यात सर्दी, खोकल्यापासून बचावासाठी भाग्यश्रीनं शेअर केला जबदस्त उपाय; पाहा व्हिडीओ

Highlightsनियमित दोन चमचे मध खाल्ल्याने सर्दी-खोकल्यापासून आराम मिळतो. मधामध्ये अॅन्टी मायक्रोव्हियल गुण असल्यानं यामुळे संसर्ग पसरवणाऱ्या जिवाणूंचाही खात्मा होतो.पाऊस नक्कीच कोणालाही सुखदायक वाटू शकतो. पण हे देखील नाकारता येत नाही की पाऊस आपल्याला काही साथीचे रोग देखील देऊ शकतो.

'मैंने प्यार किया' फेम अभिनेत्री भाग्यश्री आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर दर मंगळवारी त्वचेसाठी, आरोग्यासाठी घरगुती उपाय शेअर करत असते. तिच्या सोशल मीडिया पोस्ट नेहमीच चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असतात. अलिकडेच भाग्यश्रीने पावसाळ्यातील सर्दी, खोकला, ताप या समस्यांपासून बचावासाठी एक घरगुती उपाय शेअर केला आहे. पावसाळ्याच्या दिवसात तब्येतीची काळजी घेण्यासाठी स्वयंपाकघरातील चार ते पाच पदार्थांचा वापर केला जाऊ शकतो. फक्त मोठी मंडळीच नाही तर लहान मुलांसाठीही हा उपाय करता येऊ शकतो. 

आपल्या सर्वांना पावसाळा आवडतो, कारण उन्हाच्या त्रासापासून आराम मिळतो. गरम आणि दमट दिवसानंतर, पाऊस  कोणालाही सुखदायक वाटू शकतो. पण हे देखील नाकारता येत नाही की पाऊस आपल्याला काही साथीचे रोग देखील देऊ शकतो. पावसाळ्यात आपली प्रतिकारशक्ती कमकुवत होते आणि यामुळे पाण्यामुळे होणा-या रोगाचा धोका असतो.

या हंगामात सर्दीची समस्या बहुतेक प्रत्येकालाच त्रास देते. केवळ मुलेच नाही तर प्रौढ देखील सहजपणे या त्रासाला बळी पडतात.  या पावसाळ्यात तापमानात होणारी वाढ आणि घसरण आपल्या शरीरात संक्रमण पसरण्यास कारणीभूत ठरते. परिणामी सर्दी आणि फ्लू होतो. 

इंस्टाग्रामवर घरगुती उपाय  शेअर करून भाग्यश्रीनं कॅप्शन लिहिलंय की, 'पावसाळा मौजमजेचा ऋतू आहे. याचवेळी आपण आपल्या लहान पणीच्या आठवणींना ताजं करतो. फक्त सर्दी, खोकल्याचा सामना  करण्यासाठी एक मजबूत इम्‍यूनिटी असणं गरजेचं आहे. नियमित व्हिटामीन सी घेतल्यानंतर रोगप्रतिकारकशक्ती मजबूत राहते. याव्यतिरिक्त मी आपल्या लहान मुलांना तुळशीची पानं, आल्याचा तुकडा आणि 1/2 चमचा मधाचं मिश्रण देते. यात २ ताज्या बारीक केलेल्या काळी मिरीसुद्धा घातले. दिवसातून दोन वेळा या जिन्नसांचे मिश्रण घेतल्यास पावसाचा मनसोक्त आनंद घेता येऊ शकतो. आजची मंगळवारची टिप सगळ्या मातांसाठी आहे. मुलांना संयमात ठेवण्यापेक्षा चांगल्या पद्धतीनं सुसज्ज करा.'

या घरगुती उपायांचे फायदे

तुळस

शरीरातील रोगप्रतिकारक वाढवण्यासाठीही तुळस गुणकारी मानली जाते. तुळशीमध्ये अनेक गुणकारी तत्वे आढळून येतात. ज्यांमुळे शरिरातील रोगप्रतिकारक शक्ती, प्लेटलेट्स वाढविण्यासाठी मदत होते. तसेच शरिरातील थकवा दूर करण्यासाठीही तुळस उपयुक्त ठरते. 

ताप आल्यावर तुळशीच्या पानांचा रस प्यायल्यानंतर ताप कमी होतो. तसेच तुळशीच्या पानांचा काढाही ताप कमी करण्यास फायदेशीर ठरतो. लहान मुलांना ताप आल्यानंतर तुळशीच्या तेलाने मालिश केल्याने ताप कमी करण्यास मदत होते. तुळशीमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रतिजैविक आणि वेदनानाशक गुणधर्म असतात. त्यमुळे तुळशीची पाने कच्ची खाल्याने देखील ताप कमी होण्यास मदत होते.

मध

नियमित दोन चमचे मध खाल्ल्याने सर्दी-खोकल्यापासून आराम मिळतो. मधामध्ये अॅन्टी मायक्रोव्हियल गुण असल्यानं यामुळे संसर्ग पसरवणाऱ्या जिवाणूंचाही खात्मा होतो. आरोग्य तज्ञ्जांनुसार मधाचे सेवन केल्यास रक्तामध्ये पॉलिफोनिक अँटी-ऑक्सिडेंट्सचा स्तर वाढवतो, यामुळे हृदयविकारांचा धोका कमी होतो. मधातून सेरोटोनिन रसायन निघते, यामुळे आपली मनःस्थिती चांगली राहण्यास मदत मिळते. मधातील सेरोटोनिन रसायन शरीर मेलाटोनिन रसायनात बदलते, यामुळे झोप चांगली मिळते. अपुऱ्या झोपेचा त्रास सतावत असल्यास रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास दुधात मध मिसळून प्यावे. यामुळे चांगली झोप येईल.

आलं

आले हे औषधी आहे. यातील  फेनोलिकमुळे अपचन तसेच जलन याला आराम मिळतो. पित्त होण्यापासून रोखले जाते. आले वेदनाशामक, तापमान कमी करणारे आहे. आल्यामुळे तोंडात लाळेची निर्मिती जास्त प्रमाणात होते. त्यामुळे घास गिळायला सोपे जाते. आले पाचक, सारक व भूक वाढविणारे आहे.पित्ताने चक्कर आली वा मळमळत असेल, शस्त्रक्रियेनंतर उलटीसारखे वाटत असेल तर आल्याचा रस साखर व मिठाबरोबर घ्यावा. सर्दी व कफावर तुळशीच्या पानांबरोबर आल्याचा किस उकळून प्यावा.

काळी मिरी

काळ्या मिरीचे आरोग्याच्या दृष्टीनं अनेक फायदे आहेत. सतत खोकल्यामुळे त्रास होत असल्यास, काळीमिरीच्या 4-5 दाण्यांसह 15 मनुका चावून खाल्ल्याने आराम मिळेल. जर तुम्हाला सतत खोकल्याचा त्रास होत असेत तर काळीमिरीचा वापर करून तुम्ही या समस्येपासून सुटका मिळवू शकता. काळीमिरी सेवन केल्याने 3 ते 4 दिवसांतच फरक दिसून येईल

Web Title: Home remedies : Monsoon cold and cough remedy by bhagyashree article

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.