Join us  

पोट-कंबर खूप सुटले? मागचा भागही वाढलाय? घरीच रोज १० मिनिटं करा ५ व्यायाम, बघा फरक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2023 12:57 PM

Home workout for belly fat loss : HIIT वर्कआउट मध्ये अशा व्यायाम प्रकारांचा समावेश असतो जे व्यायाम तुम्ही कमी वेळात करू शकता.

वाढत्या वजनामुळे आजकाल बऱ्याच महिला त्रस्त असतात. वजन कमी करण्यासाठी मेहनत करतात पण वजन काही रातोरात कमी होत नाही. डाएट, व्यायाम असे बरेच प्रयत्न केल्यानंतर वजन कमी होतं.  अनेकांना जीमला जाण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही तर काहीजणांना डाएट करणंही जमत नाही अशावेळी स्वत:साठी रोज फक्त १० मिनिटं ते अर्धा तास  इतका वेळ काढून तुम्ही घरीच व्यायाम करू शकता. यामुळे तुमच्या शरीराचं पोश्चर सुधारण्यास मदत होईल आणि वाढलेली चरबीही कमी होईल. (Home workout for belly fat loss)

HIIT वर्कआउट मध्ये  अशा व्यायाम प्रकारांचा समावेश असतो जे व्यायाम तुम्ही कमी वेळात करू शकता. यामळे हार्ट रेट वाढतो आणि कॅलरीज वेगानं बर्न होण्यास मदत होते. फिटनेस एक्सपर्ट प्रियांका यांनी आपल्या इंस्टाग्राम पोस्टवरून याबाबत अधिक माहिती दिली आहे. (10 minute hiit workout for belly fat loss)

१) स्वॅट जॅक हॉप्स

हा व्यायाम करण्यासाठी फोटोत दाखवल्याप्रमाणे स्वॅक्ट्सच्या स्थितीत जंपिग  करा. यामुळे पायांचे स्नायू मजबूत होण्यास मदत होईल. तुमचा स्टॅमिना वाढेल आणि अतिरिक्त फॅट्स कमी होतील.

२) हाय नीज

हा व्यायाम करण्यासाठी सर्व प्रथम सरळ उभे रहा. कंबर किंवा नितंबांच्या समान अंतरावर पाय उघडा. पोटाचे स्नायू घट्ट  करा. हात कोपरांसह समोरच्या दिशेने वाकवलेले ठेवा. नंतर उजवा गुडघा कमरेच्या वर थोडासा छातीच्या दिशेने आणा. आता उजव्या हाताने गुडघ्याला स्पर्श करा.नंतर डावा गुडघा वरच्या दिशेने हलवा आणि डाव्या हाताने गुडघ्याला स्पर्श करा. हा व्यायाम २० ते २५  वेळा ३ सेट्समध्ये करा.

३) जंपिग जॅक स्वॅट्स

सगळ्यात आधी पाय एकत्र आणि हात सरळ ठेवा. आता खांद्याच्या रुंदीमध्ये उडी मारताना पाय उघडा. पाय उघडताना, हात डोक्याच्या वर घ्या. नंतर स्वॅक्ट्स स्थितीत बसताना नितंब जमिनीच्या दिशेने मागे सरकवा. जसे आपण खुर्चीवर बसतो तसे.  तुमचे कूल्हे गुडघ्याखाली असावेत आणि दोन्ही हातही खालच्या दिशेनं असावेत.

प्स (Squat Jack Hops)

४) प्लँक जॅक

हा व्यायाम करण्यासाठी सगळ्यात आधी प्लँकच्या स्थितीत या. गुडघ्यातून खाली वाकून पाय रुंद करा. जंपिक जॅकसाठी पाय आत आणि बाहेर फिरवा.

५) पिक्ड हाफ बर्पीज

दोन्ही हात जमिनीवर स्क्वॅट स्थितीत ठेवा. यानंतर, एक पाय वर उचला आणि पुश-अप स्थितीत या. त्याचप्रमाणे, दुसरा पाय वर उचला आणि पुन्हा करा. शक्य तितक्या लवकर शरीराला स्क्वॅट स्थितीत वर आणि खाली आणा. 

टॅग्स :फिटनेस टिप्सआरोग्यहेल्थ टिप्स