सध्याची जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी यांमुळे बरेचसे लोक तरूण वयातच वयस्कर असल्यासारखे दिसतात. कामाचा ताण, थकवा, अशक्तपणा, केमिकल्सयुक्त उत्पादनांचा वापर ही त्या मागची काही कारणं आहेत. म्हणूनच तब्येत चांगली ठेवण्यासाठी दोनवेळच्या जेवणाव्यतिरिक्त काही पौष्टीक घटकांचा आहारात समावेश करायला हवा. जेणेकरून शारीरिक मानसिकदृष्ट्या कमकुवतपणा वाटणार नाही. (How To Make Energy Drink At Home)
कोरोनाकाळात खर्दी, खोकल्यासारखे आजार टाळण्यापासून रोगप्रतिराकशक्ती वाढवण्यापर्यंत अनेक आजारांसाठी दूधाचं सेवन गुणकारी असल्याचं समोर आलं. खारीक, मखाना आणि दुधाचे एकत्रितरित्या सेवन केल्यानं शरीराला अनेक फायदे मिळतात. (Milk benefits for health)
खारिक, दूधाच्या सेवनाचे फायदे
या दूधात ग्लुकोज आणि फ्रक्टोज असल्याचे तात्काळ एनर्जी मिळते. त्यामुळे कमकुवतपणा दूर होतो. खारीक एकत्र केलेल्या दूधात प्रोटीनचे प्रमाण अधिक असल्याने मसल्स मजबूत होण्यास मदत होते. खारीकमध्ये कॅल्शियम असल्याने जॉर्इंट पेनची समस्या दूर होते. या दूधात ‘बी६’ असल्याने मेंदूची शक्ती वाढते आणि स्मरणशक्तीही वाढण्यास मदत होते.
दूधात खारीक घालून सेवन केल्याने शरीरातील रक्त प्रवाह सुधारण्यास मदत होते. यामुळे त्वचा आणि केस हेल्दी राहतात त्यामुळे स्मार्टनेस वाढतो. या दूधात कोलेस्ट्रॉल कमी असल्याने हार्ट प्रॉब्लेमपासून बचाव करते. या दोघांमध्ये लोहदेखील असते, त्यामुळे रक्ताच्या कमतरतेची समस्या दूर होण्यास मदत होते. या शिवाय या दूधात फॉस्फरस असल्याने दात मजबूत होतात.
खारीक, मखाना दूध कसं तयार कराल?
खारीक आणि मखाना यांचं दूध तयार करण्यासाठी ते पाण्यात किंवा दुधात १ ते २ तास भिजत ठेवावे. यानंतर योग्य प्रमाणात दूध घेऊन खारीक आणि मखान्यासोबत ग्राइंडरमध्ये टाकून सुमारे पाच मिनिटं फिरवावे. जेणेकरुन हे तिन्ही पदार्थ चांगल्या प्रकारे मिसळले जातील.
खारीक-मखाने हे एक उत्तम एनर्जी-ड्रिंक आहे. आवश्यकतेनुसार तुम्ही या दुधात मध आणि अश्वगंधादेखील घालू शकता. त्यामुळे या पेयाचा प्रभाव आणखी वाढतो. या पेयाच नियमित सेवन केल्यानं तुम्हाला थकवा जाणवणार नाही. तब्येत चांगली राहण्यास मदत होईल. जर तुम्ही रोज हळदीचं दूध पित असाल तर त्यातही खारिक किंवा इतर ड्रायफ्रुट्स घालून त्यातील पोषण अधिक वाढवू शकता. जेणेकरून शरीराला अधिकाधिक फायदे मिळतील