Join us  

१ ग्लास दूधात हे पदार्थ मिसळून प्या; कंबर-गुडघेदुखीपासून मिळेल आराम- अंगातलं रक्तही वाढेल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2023 1:09 PM

Homemade Energy Milk Drink : यातून कॅल्शियम, मॅग्नेशियम, आणि फॉस्फरेस सारखी तत्व मिळतात. इतकंच नाही तर गॅस, पोटाचे इतर विकारही दूर होतात.

सतत बसून किंवा उभं राहून गुडघे आणि कंबरदुखीचा त्रास अनेकांना जाणवतो. एकदा हे दुखणं वाढलं की कमी होता होत नाही. घरात उपलब्ध असलेल्या काही पौष्टीक पदार्थांचा आहारात समावेश करून तुम्ही पोषक तत्वांची कमतरता भरून काढू शकता. (Homemade Energy Milk Drink for Back Pain and Knee Pain) यामुळे दुखण्यावरही आराम मिळेल.

दूध प्रत्येकाच्याच घरी असते. दूधात काही पदार्थ मिसळून प्यायल्यास ताकद दुप्पटीने वाढते आणि स्नायूंना बळकटी मिळते.  पोषक घटकांनी परिपूर्ण अशी पावडर घरीच तयार करून तुम्ही दुधाबरोबर याचे सेवन करू शकता. (Homemade Calcium Iron Rich Healthy Drink Milk Powder)

हा उपाय करण्यासाठी सगळ्यात आधी एका १ चमचा खसखस, १ चमचा तीळ आणि ७ ते ८ बदाम घ्या. हे सर्व पदार्थ एकत्र करून याची पावडर तयार करून घ्या. एका भांड्यात एक ग्लास दूध घालून व्यवस्थित गरम करून घ्या. दूध गरम झाल्यानंतर त्यात चमचाभर तयार पावडर घाला.

 दूध उकळल्यानंतर त्यात थोडा गूळ घालून पुन्हा उकळवून घ्या. हे ड्रिंक आयर्न, कॅल्शयम, मॅग्नेशियमने परिपूर्ण आहे. ज्यामुळे कंबरदुखी, पाठदुखीच्या वेदना दूर होण्यास मदत होईल. रोज झोपण्याआधी हे दूध पिऊन झोपल्याने पुरेपूर फायदा मिळेल. 

१) खसखस खाल्ल्याने कॅल्शियम, मॅग्नेशियम, आणि फॉस्फरेस सारखी तत्व मिळतात. इतकंच नाही तर गॅस, पोटाचे इतर विकारही दूर होतात. चांगली झोप येण्यास मदत होते. रक्तदाबही नियंत्रणात राहतो.

२) रोज तीळ खाल्ल्याने हाडं मजबूत होतात. एनिमिया असल्यास रक्ताची कमतरता दूर करण्यासही तीळ उत्तम पर्याय आहेत. रिकाम्या पोटी तिळाचे सेवन केल्याने दातांमध्ये कॅव्हिटीज  होण्याचा धोका नसतो.

रात्री भिजवून सकाळी खा ५ पदार्थ; प्रोटीन-व्हिटामीन भरपूर मिळेल, गॅस-पोटाचे त्रास होतील दूर

३) बदाम असेच न खाता रात्री पाण्यात भिजवून सकाळी खावेत. आवडीनुसार तुम्ही सालीसकट किंवा सालं काढून बदाम खाऊ शकता. ५ ते १० वर्ष वयोगटातील मुलांनी २ ते ४ बदाम दिवसाला खावेत,  १८ ते २० वयोगटात असलेल्यांनी  ६ ते ८ बदाम खावेत.

पोट-मांड्याचे फॅट सुटलंय? किचमधले 'हे' पदार्थ रोज खा; झरझर घटेल चरबी- स्लिम, मेंटेन दिसाल

४) पचनक्रिया चांगली ठेवण्यासाठी रोज गुळाचे सेवन करावे. हिमोग्लोबीन वाढवण्याासाठी गूळ उत्तम मानला जातो. यामुळे स्टॅमिना वाढतो याशिवाय शरीर एक्टिव्ह राहते.

टॅग्स :हेल्थ टिप्सआरोग्यफिटनेस टिप्स