Join us  

Hot Water for weight loss : रोज गरम पाणी प्यायल्यानं खरंच झरझर वजन घटतं? स्लिम, फिट राहण्यासाठी तज्ज्ञ सांगतात.....

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2023 1:41 PM

Hot Water for weight loss : कोणी डाएट, व्यायाम कर काहीजण आयुर्वेदीक उपाय करतात.

सध्याच्या स्थितीत वजन वाढणं खूपच कॉमन झालंय. वाढलेलं वजन कमी करण्यासाठी प्रत्येकजण  प्रयत्न करतो. कोणी डाएट, व्यायाम कर काहीजण आयुर्वेदीक उपाय करतात. सकाळी गरम पाणी प्यायल्यानं वजन कमी होतं. (Hot Water for weight loss) पोटावरची अतिरिक्त चरबी कमी होते असं अनेकजण म्हणतात. यात कितपत  तथ्य आहे, गरम पाण्यानं खरंच वजन कमी  होतं का, याबाबत आहारतज्ज्ञ रिचा यांनी अधिक माहिती दिली आहे. (Does sipping on hot water really help you lose belly fat)

गरम पाणी प्यायल्यानं तब्येतीला कसा फायदा होतो?

१) गरम पाणी प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते.  तुम्ही जितकं जास्त पाणी प्याल  तितक्या लवकर तुमचं वजन कमी होईल असे दावे तुम्ही अनेकदा ऐकले असतील. 

२) जे वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना गरम पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो पण वजन कमी करण्यासाठी गरम पाणी ही काही जादूची गोळी नाही.

वजन कमी करायचंय पण डायटींग, व्यायाम आवडत नाही? ५ टिप्स, वजन झटपट होईल कमी

३) अनेकांना असं वाटतं की जेवणानंतर गरम पाणी पिणं वजन कमी करण्यास मदत करतं. पण यामुळे अन्न पचनास चांगली मदत होते. गरम पाणी पचनास मदत करते. 

४) जेवणानंतर गरम पाणी प्यायल्याने शरीर डिटॉक्सिफाय होण्यास मदत होते. म्हणून आपण ते ट्राय करून पाहू शकता.

५) वजन कमी करण्यासाठी लोक कॅलरी कमी घेतात आणि शारीरिकदृष्ट्या सक्रीय राहतात. त्यामुळे फक्त गरम पाण्यावर अवलंबून राहणं योग्य नाही. वजन कमी करण्यासाठी संतुलित आहार आणि व्यायाम या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत.

टॅग्स :हेल्थ टिप्सआरोग्य