सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी, वजन कमी - जास्त करून उत्तम पात्र वठवले आहेत. ही वजनाची गणिते कलाकारांसाठी नवीन नाही. वजन कमी- जास्त करण्यासाठी त्यांना न्यूट्रीशिनिस्ट, जिम ट्रेनर, योगा गुरु मदत करतात. पण या सगळ्याशिवाय एका अभिनेत्रीने तब्बल ४ महिन्यात ३२ किलो वजन कमी केले आहे. ही अभिनेत्री म्हणजे भूमी पेडणेकर.
'दम लगाके हैशा' हा चित्रपट सगळ्यांना माहित आहे. आयुष्मान - भूमीची जोडी खूप गाजली. या चित्रपटात भूमीचे वजन ८९ किलो झाले होते. चित्रपटानंतर तिने स्वतःचं वजन ५७ किलोवर आणले. कोणतेही डाएट फॅड न पाळता तिने वजन कमी केले. नियमित व्यायाम व घरी शिजवलेले साधे जेवण, या दोन गोष्टींच्या जोरावर तिने वजन घटवले(Bhumi Pednekar's Weight Loss Journey).
भूमीने ३२ किलो वजन कमी कसे केले?
यासंदर्भात बोलताना ती म्हणाली, ''मला विविध पदार्थ खायला प्रचंड आवडतात. मी स्वतःला खाण्यापासून वंचित ठेवत नाही. माझ्या आहारात तूप, लोणी, ताकाचा समावेश आहे. मी साखर आणि कार्बोहायड्रेटचे सेवन पूर्णपणे बंद केले. मी नियमित व्यायाम आणि घरगुती आहाराचे सेवन केले, मी दर पाच दिवसांनी चीट मिल म्हणजेच आवडीचे जेवण मनसोक्त खाते.''
घरी शिजवलेलं अन्न खा
ती पुढे म्हणते, ''मी कधीच आहारतज्ञ किंवा पोषणतज्ञांकडून वजन कमी करण्याचे सल्ले घेतले नाही, मी गुगल आणि आईच्या टिप्सच्यानुसार आहाराचे सेवन करत आले. वजन कमी करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे, घरी शिजवलेल्या अन्नाचे सेवन करणे.”
गोड खायला खूप आवडतं पण वजन वाढतं म्हणून तोंडाला कुलूप? ५ टिप्स, गोड खा आणि वजनही नाही वाढणार
साखरचे प्रमाण कमी केले
''साखरेचे सेवन सोडणे हा माझ्या आयुष्यातील एक सर्वोत्तम निर्णय होता. मला गोड पदार्थ फार आवडतात, परंतु वजन कमी करण्यासाठी साखर सोडावी लागली. त्याऐवजी मधाचे सेवन करणे आरोग्यासाठी उत्तम आहे. त्यातील झिंक, पोटॅशियम, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन बी 6 आपल्या शरीराला अनेक पौष्टीक घटक देतात. मधाचा वापर वेगवेगळ्या प्रकारे करता येतो.”
रोज ७ लिटर पाणी प्या
''वजन कमी करण्यासाठी पाणी आवश्यक आहे. मी रोज डिटॉक्स वॉटर पाणी पिते. हे पाणी शरीर स्वच्छ करते आणि डिटॉक्सिफाय करते. त्यात मी लिंबू, काकडी आणि पुदिना मिक्स करते. त्यातील लिंबू केवळ शरीर स्वच्छ करत नाही तर, उर्जा देखील देते. तसेच रोगप्रतिकारशक्तीही वाढवते. पुदिना पचनास मदत करते. काकडी त्वचेसाठी उपयुक्त तर आहेच, यासह शरीर हायड्रेट ठेवते.''
नियमित वर्कआउट करा
भूमी जिममध्ये कार्डिओ आणि वेट ट्रेनिंगवर भर देते. आठवड्यातून किमान तीनवेळा कार्डिओ केल्याने कॅलरी यासह अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत मिळते. आठवड्यातून दोनदा वेट ट्रेनिंग केल्याने स्नायू मजबूत होतात. यासह ताकद वाढते. यासंदर्भात ती म्हणते, ''वजन कमी करत असताना शरीराची हालचाल गरजेची. लिफ्ट ऐवजी पायऱ्या चढणे किंवा कमी अंतर ठेऊन चालणे, तहान लागल्यावर बाटली शेजारी ठेवण्याऐवजी, फक्त एक ग्लास पाणी पिण्यासाठी उठणे. यासारख्या छोट्या छोट्या गोष्टी करून शरीराची हालचाल ठेवा".
वजन कमी करायचं तर सफरचंद खा! फ्रूट डाएटचा नवा ट्रेण्ड, ५ दिवस सफरचंद खाऊन वजन घटेल..
दरम्यान, अलीकडेच एका सर्वेक्षणात टीएलसी डाएटला सर्वोत्कृष्ट डाएटच्या यादीत पाचवे स्थान प्राप्त झाले. या डाएटमध्ये आहाराच्या नियंत्रणावर भर देण्याचा सल्ला दिला जातो. टीएलसी डाएटनुसार, कॅलरीयुक्त पदार्थ आहारातून पूणर्पणे न वगळता त्याचे प्रमाण मर्यादित ठेवायला हवे. शरीराची कॅलरीजची गरज फॅट्सच्या माध्यमातून २५ ते ३५ टक्के पूर्ण करायला हवी.