Lokmat Sakhi >Fitness > एक्रोयोगा हा योगाचा कोणता नवा प्रकार ? सध्या एक्रोयोगा करण्याची का आहे तरुणांत क्रेझ...

एक्रोयोगा हा योगाचा कोणता नवा प्रकार ? सध्या एक्रोयोगा करण्याची का आहे तरुणांत क्रेझ...

What is Acro Yoga ? How does this latest trend help you live a healthy life ? : एक्रोयोगाची वाढती क्रेझ आणि तरुणांचा इंटरेस्ट, हा नवीन योगाभ्यास नेमका काय आहे ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2023 08:50 AM2023-08-31T08:50:50+5:302023-08-31T08:55:01+5:30

What is Acro Yoga ? How does this latest trend help you live a healthy life ? : एक्रोयोगाची वाढती क्रेझ आणि तरुणांचा इंटरेस्ट, हा नवीन योगाभ्यास नेमका काय आहे ?

How Can Learning Acro Yoga Help You In Living A Healthy Life? | एक्रोयोगा हा योगाचा कोणता नवा प्रकार ? सध्या एक्रोयोगा करण्याची का आहे तरुणांत क्रेझ...

एक्रोयोगा हा योगाचा कोणता नवा प्रकार ? सध्या एक्रोयोगा करण्याची का आहे तरुणांत क्रेझ...

'योगा' (Yoga)हा आपल्यापैकी बऱ्याच लोकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. आजकाल प्रत्येकजण स्वतःला तंदुरुस्त, फिट ठेवण्यासाठी योगा, जिमिंग, झुंबा किंवा अशा अनेक प्रकारच्या अ‍ॅक्टिव्हिटीज करण्यावर अधिक भर देतात. योगा केल्याने शरीर आणि मनावर नियंत्रण ठेवण्यास मदत होते. 'योगा' ही एक कला आहे जी तुमचे शरीर, मन आणि आत्मा एकत्र करते आणि आपल्याला शारीरिक व मानसिक दृष्ट्या मजबूत व शांत बनवते. 

'योगा' महत्वाचा आहे कारण ते आपल्याला तंदुरुस्त ठेवते, तणाव कमी करते आणि आपल्या संपूर्ण आरोग्याची काळजी घेते. योगा केल्यामुळे आपले निरोगी मन आपल्याला अधिक लक्ष केंद्रित करण्यात मदत करू शकते. योगामुळे आंतरिक शांतता आणि तणाव आणि इतर समस्यांशी लढा देण्यात मदत होते. योगामुळे व्यक्तीचा आत्मविश्वास  वाढण्यास आणि स्वतःला आनंदी ठेवण्यास मदत होते. आजकाल आपल्याला योगाचे विविध प्रकार पहायला मिळतात, त्यापैकीच एक्रोयोगा हा एक प्रकार आहे. योग, आणि अ‍ॅक्रोबॅटिक्सचे मिश्रण म्हणजे एक्रोयोगा. सध्या एक्रोयोगा ट्रेंडमध्ये आहे, ज्याला बघाव तो एक्रोयोगा करताना दिसतो. एक्रोयोगा (Acro Yoga) म्हणजे काय ? व त्याचे आपल्या शरीराला नेमके काय फायदे होतात ते पाहूयात(How Can Learning Acro Yoga Help You In Living A Healthy Life?).

एक्रोयोगा म्हणजे काय ? (What is Acro Yoga?)

एक्रोयोगा (Acro Yoga) हा एक शारीरिक व्यायाम आहे जो योग आणि अ‍ॅक्रोबॅटिक्सच्या तत्त्वांना एकत्र करतो. हा योगा चीअरलीडिंग, नृत्य एक्रो आणि सर्कस आर्ट्सपासून प्रेरित आहे. जरी आपल्याला हा योगा एकट्यात करण्याचा आत्मविश्वास आला असला तरी सहसा योगा ट्रेनरसोबतच किंवा गृपसह हा योगा करावा. 

मॉर्निंग वॉकला काही खाऊन जावे की उपाशीपोटीच जाणे योग्य ? तज्ज्ञ सांगतात, नक्की योग्य काय...

फॅट टू फिट प्रवासात शहनाज गिल सकाळी प्यायची सिक्रेट ड्रिंक, इतकं स्वस्त की कुणालाही परवडेल...

एक्रोयोगा (Acro Yoga) करण्याचे फायदे :- 

१. शक्ती वाढवते (Gives Strength) :- एक्रोयोगा हा डोप डायनॅमिक योगा प्रकार आहे. हा योगाप्रकार करताना शरीर संपूर्ण गती आणि संतुलनाच्या विविध बिंदूंमधून जाते. एक्रोयोगा हा स्नायूंची ताकद वाढवण्याचा उत्तम मार्ग आहे.

२. आत्मविश्वास वाढतो (Improves Confidence) :- नियमित योगासन केल्याने आत्मविश्वास, आत्मसन्मानाची भावना वाढू शकते. एक्रोयोग म्हणून आपल्यासाठी आवश्यक आहे. यामुळे तुम्हाला तुमची आंतरिक शक्ती मोठ्या प्रमाणात वापरण्यात मदत करू शकते.

जाॅगिंग रोज करण्याचा फायदा होतो की तोटा ? ५ गोष्टी जॉगिंग करतानाच काय चालतानाही विसरु नका...

३. मानसिक संतुलन राखण्यास मदत(Maintaining Mental Balance) :- कोणत्याही व्यायामाप्रमाणे, एक्रोयोगा आपल्या शरीरातील डोपामाइन हार्मोन्स सोडण्यास उत्तेजित करते, परिणामी  मानसिक संतुलन वाढवते. त्यामुळे नियमित एक्रोयोगा केल्याने मानसिक शांतता व मानसिक संतुलन राखण्यास देखील मदत होऊ शकते. 

वजन कमी करण्यासाठी ४ मंत्र विसरुच नका ! तापसी पन्नूच्या न्यूट्रिशनिस्ट मुनमुन गनेरीवालचा सल्ला...

४. शारीरिक लवचिकता (Physical Flexibility) :- मुळातच योगामुळे आपल्या शरीराची शारीरिक लवचिकता वाढवण्यास मदत होते. एक्रोयोगा करताना आपल्या शरीरातील स्नायू फार मोठ्या प्रमाणावर ताणले जातात, यामुळे आपले स्नायू लवचिक होण्यास मदत मिळते. 

५. एकाग्रता (Improve Concentration):- योगामुळे एकाग्रता वाढते. योग एखाद्या व्यक्तीच्या मेंदूच्या न्यूरल पॅटर्नवर कार्य करतो, ज्यामुळे एखाद्याच्या एकाग्रतेचा कालावधी वाढतो. नेहमी स्मरणशक्ती आणि एकाग्रतेसाठी योगाचा आधार घ्यावा.

आपल्या वयानुसार आपण दिवसभरात किती पावले चालावीत ? पहा स्वीडन विद्यापीठाचा अभ्यास काय सांगतो...

Web Title: How Can Learning Acro Yoga Help You In Living A Healthy Life?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.