Join us

बडे अच्छे! राम कपूरने कसं कमी केलं ५५ किलो वजन, नेमकं खाल्लं तरी काय नी किती?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2025 18:42 IST

How did Ram Kapoor lose 55 kg, what exactly did he eat and how much? : फक्त डाएटने काही होणार नाही. हेही करावंच लागेल. जाणून घ्या काय करावं लागेल.

आपण आजपर्यंत सगळ्यांना डाएट करा वजन कमी होते. असे सांगताना ऐकले आहे. पण राम कपूर काहीतरी वेगळंच सांगतो. (How did Ram Kapoor lose 55 kg, what exactly did he eat and how much?)तो म्हणाला, " डाएट करून कमी केलेले वजन पुन्हा झपाट्याने वाढेल."  'बडे अच्छे लगते है' या हिंदी सिरीयल मधून गाजलेल्या राम कपूरमध्ये आश्चर्यकारक बदल आपण पाहू शकतो. तो बऱ्यापैकी स्थूल होता. (How did Ram Kapoor lose 55 kg, what exactly did he eat and how much?)आता त्याने चांगलेच वजन कमी केले आहे. 'सायरस सेझ' या पॉडकास्टवर संवाद साधताना त्याने त्याचा वेटलॉस जर्नीचा अनुभव सांगितला.

राम कपूर म्हणाला, "मी काही दावा करत नाही. पण माझा अनुभव सांगतो. मी तब्बल आयुष्याची वीस वर्षे ओबेसिटीमध्ये घालवली आहेत. माझे वजन १४० किलो एवढे होते. जास्त नाही खुपच जास्त वजन घेऊन मी जगलो आहे. असं नाही की मी वजन कमी करण्याचा प्रयत्न केला नाही. मला अनेक आजार झाले होते. त्यातूनही बाहेर पडण्याचा प्रयत्न चालू होता. मी दोन वेळा ३० किलो वजन कमी केले. पण काही वेळातच माझे वजन आधी सारखेच होऊन जायचे. पण आता मी ५५ किलो वजन कमी केलं आहे. आता मला ना कोणता आजार आहे ना माझे वजन पुन्हा वाढत आहे."

पुढे त्याने सांगितले की, प्रश्न तुमच्या शरीराचाच नाही आहे. मनाचाही आहे. शरीराला जबरदस्ती बारीक नाही करता येते. त्या प्रवासासाठी मानसिक तयारी हवी. भरपूर डाएट करून तुम्ही बारीक झालात पण बाकी जीवनशैली आधीसारखीच आहे. तर तुमचे कमी झालेले वजन पुन्हा झपाट्याने वाढेल. फक्त डाएट करून चालत नाही. पूर्ण रहाणीमान बदलाव लागेल. मानसिकता बदलावी लागेल. हेल्दी आणि अनहेल्दी लोकांच्या सवयी वेगळ्या असतात. त्यामुळे जर तुम्हाला सुदृढ व्हायचे आहे. तर सवयी त्यांच्या सारख्या कराव्या लागतील. 

राम कपूरने सांगितल्याप्रमाणे बऱ्याच जणांचाही असाच अनुभव असतो. डाएट तर ते करतात, पण चांगली जीवनशैली आणि दिनक्रम पाळत नाहीत. त्यामुळे मानसिक तयारी करूनच वजन कमी करण्यासाठीचा प्रवास सुरू करा.     

टॅग्स :वेट लॉस टिप्सराम कपूरफिटनेस टिप्सआरोग्य