Lokmat Sakhi >Fitness > दिवाळीत फराळ - मिठाया भरपेट खाल्ले, आता बॉडी डिटॉक्स करण्यासाठी प्या घरगुती ४ हेल्दी ड्रिंक्स...

दिवाळीत फराळ - मिठाया भरपेट खाल्ले, आता बॉडी डिटॉक्स करण्यासाठी प्या घरगुती ४ हेल्दी ड्रिंक्स...

Post - Festival Detox Diet : Homemade Drinks To Recharge Your Body And Mind : दिवाळीच्या निमित्ताने आपण सगळं काही खातो परंतु नंतर पोटाच्या लहान - सहान समस्या होऊ नयेत म्हणून प्या हेल्दी ड्रिंक्स...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2023 09:00 AM2023-11-16T09:00:40+5:302023-11-16T09:05:01+5:30

Post - Festival Detox Diet : Homemade Drinks To Recharge Your Body And Mind : दिवाळीच्या निमित्ताने आपण सगळं काही खातो परंतु नंतर पोटाच्या लहान - सहान समस्या होऊ नयेत म्हणून प्या हेल्दी ड्रिंक्स...

How do you detox your body after a festival, Detox After Diwali, Easy Homemade Recipes To Flush Out Toxins | दिवाळीत फराळ - मिठाया भरपेट खाल्ले, आता बॉडी डिटॉक्स करण्यासाठी प्या घरगुती ४ हेल्दी ड्रिंक्स...

दिवाळीत फराळ - मिठाया भरपेट खाल्ले, आता बॉडी डिटॉक्स करण्यासाठी प्या घरगुती ४ हेल्दी ड्रिंक्स...

नुकताच दिवाळी सण आपण सगळ्यांनीच मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरी केला. दिवाळी म्हटलं की फराळ, गोडधोड पदार्थ, मिठाया अशा पदार्थांची रेलचेल सुरुच असते. सण - समारंभ असताना आपण आपले रुटीन डाएट, एक्सरसाइज सगळेच काही दिवसांसाठी पाळत नाही. सगळेच सण वर्षातून एकदा येतात त्यामुळे आपण सगळं काही विसरुन या सणांचा आनंद लुटतो. दिवाळीनिमित्त आपण सगळ्यांनीच फराळ, मिठाया, गोडधोड पदार्थ यांवर ताव मारलाच असेल. यासोबतच सण म्हटला की तो आपल्या लोकांसोबत साजरा करताना किंवा काही खाताना चार घास हे जास्तीचेच जातात. दिवाळीच्या निमित्ताने आपण सगळं काही खातो परंतु नंतर याचा आपल्या पोटावर परिणाम झालेला दिसून येतो(Diwali 2023 Detox: 5 Tips To Clean Your Body After High Fat And Sugar Intake).

दिवाळी सणाच्या निमित्ताने भरपेट खाल्ल्याने पोटदुखी, गॅस, अ‍ॅसिडिटी, अपचन यांसारख्या अनेक समस्या निर्माण होतात. यासोबतच दिवाळीत आपण बरेच तेलकट, तूपकट पदार्थ देखील खातो. हे असे पदार्थ भरपूर प्रमाणांत खाल्ल्यामुळे आपल्या पोटात टॉक्सिन हे मोठ्या प्रमाणावर जमा होतात. जे आपल्या शरीरासाठी अपायकारक ठरतात. यासाठी हेच अपायकारक टॉक्सिन आपल्या शरीरातून वेळीच बाहेर काढून टाकणे महत्वाचे असते. शरीरातील हे वाईट टॉक्सिन बाहेर काढण्यासाठी आपल्याला बॉडी डिटॉक्स करणे गरजेचे असते. बॉडी डिटॉक्स करण्यासाठी काही हेल्दी घरगुती डिटॉक्स ड्रिंक्स पिणे फारच फायदेशीर ठरते. बॉडी डिटॉक्स करण्यासाठी नेमके कोणते घरगुती हेल्दी ड्रिंक्स प्यावेत ते पाहूयात(Detox After Diwali. Easy Homemade Recipes To Flush Out Toxins).

शरीरातील टॉक्सिन बाहेर काढून टाकण्यासाठी कोणते हेल्दी ड्रिंक प्यावे... 

१. हळदीचे पाणी :- हळदीचे पाणी शरीराची रोग प्रतिरोधक क्षमता मजबूत बनते आणि शरीरातून टॉक्सिन बाहेर काढते. हळदीचे पाणी बनवण्यासाठी एका भांड्यात एक ग्लास पाणी उकळण्यासाठी ठेवून द्या. या उकळत्या पाण्यांत एक टेबलस्पून हळद व थोडेसे किसून घेतलेले आले घालावे. आता हे मिश्रण चांगले उकळू द्यावे. उकळल्यानंतर हे पाणी गाळणीने गाळून घ्यावे. हे पाणी प्यायल्याने आपल्या शरीरातील टॉक्सिन बाहेर फेकण्यास मदत होते.   

डेस्क जॉबमुळे शारीरिक हालचाल होत नाही ? ५ सोपे उपाय, डेस्क जॉब करुनही फिट राहण्याचा सोपा फंडा...

२. लिंबू पाणी :- साधारणतः आपण लिंबू पाणी हे बरेचवेळा पितो. सणांदरम्यान सरबत म्हणून अनेकदा आपण लिंबू पाणी पिणेच पसंत करतो. लिंबू पाणी पिण्याने आपल्या शरीराला याचे अनेक फायदे मिळतात. सकाळी उठून उपाशीपोटी लिंबू पाणी प्यायल्याने आपल्या शरीरांतील हानिकारक टॉक्सिन बाहेर फेकण्यास मदत होते. लिंबू पाणी प्यायल्याने पोटात गॅस होणे, पोट फुगणे यांसारख्या समस्यांसोबतच बॉडी डिटॉक्स करण्यासाठी देखील मदत होते. आपण नेहमीप्रमाणे जसे लिंबू पाणी बनवतो तसेच लिंबू पाणी बनवून सकाळ व संध्याकाळ अशा दोन्ही वेळेला आपण पिऊ शकतो. 

तासंतास ऑफिसमध्ये बाक काढून - वाकून बसता ? चुकीच्या बॉडी पोश्चर सुधारण्याचे ७ फायदे, पाठीचा कणा सांभाळा...

३. आल्याचे पाणी :- आल्यामध्ये अँटी बॅक्टेरियल व अँटी इंफ्लेमेटरी गुणधर्म हे मोठ्या प्रमाणावर असतात. पचनक्रिया मजबूत करण्यासाठी आल्याचे पाणी पिणे खूपच फायदेशीर ठरते. आल्याचे पाणी बनवण्यासाठी एक ग्लास पाणी व्यवस्थित उकळवून घ्यावे. यात आल्याचा एक लहान तुकडा व प्रत्येकी १ टेबलस्पून मीठ आणि मध घालावे. त्यानंतर आपण हे पाणी थंड करुन किंवा गरम चहासारखे पिऊ शकता. जर आपल्याला पोटदुखीचा त्रास होत असेल तर आल्याचे पाणी पिणे हे शरीरासाठी फारच उपयुक्त ठरेल. 

मलासनात बसून पाणी पिण्याचे आहेत भन्नाट फायदे, पोटाचे विकार अनेक समस्या होतील कायमच्या दूर...

४. नारळाचे पाणी :- शरीरातील वाईट टॉक्सिन बाहेर काढून फेकून देण्यासाठी नारळाचे पाणी पिणे हे अतिशय फायदेशीर ठरते. नारळाच्या पाण्यात लिंबाचा रस मिसळून प्यायल्याने या पाण्याने आपले शरीर टॉक्सिन फ्री होण्यास मदत मिळते. आपण नारळाचे पाणी नेहमीप्रमाणे साधेही पिऊ शकता किंवा त्यात लिंबाचा रस घालून प्यायलास ते शरीरासाठी अधिक फायदेशीर ठरते. नारळ पाणी पिणे हे पोटाच्या अनेक लहान - मोठ्या समस्यांसाठी फायदेशीर ठरते, त्याचबरोबर वजन कमी करण्यासाठी देखील ते फारच उपयुक्त ठरते.

Web Title: How do you detox your body after a festival, Detox After Diwali, Easy Homemade Recipes To Flush Out Toxins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.