पाणी आपल्या शरीरासाठी सर्वात महत्वाचे आहे (Drinking water Benefits). जल है तो जीवन है (Water). पाणी असेल तर, आरोग्याला अनेक फायदे मिळतात (Weight Loss). पाण्याशिवाय जीवनाची कल्पनाही करता येत नाही. पाणी आपल्या शरीराला हायड्रेट ठेवते आणि सर्व अवयवांना सक्रिय ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते (Fitness).
पुरेशा प्रमाणात पाणी प्यायल्याने पचन आणि चयापचय क्रिया सुधारते. तसेच शरीरातून विषारी पदार्थ काढून टाकते. पण आपल्याला माहिती आहे का, वेट लॉससाठीही पाणी महत्वाची भूमिका बजावतात?(How Drinking More Water Can Help You Lose Weight).
मलायका अरोरा रोज पिते ‘या’ फळाचे ज्यूस, पन्नाशीत तिच्यासारखा ग्लो हवा चेहऱ्यावर तर हा घ्या उपाय
कॅलरीजचे प्रमाण होते कमी(Calories Deficit)
वेब एमडीच्या अहवालानुसार, 'वेट लॉससाठी व्यायाम, डाएट महात्वाची भूमिका बजावतात. नियमित पाणी प्यायलानं कॅलरीजचे प्रमाण कमी होईल. यासह चयापचय बुस्ट करण्यास मदत करते. ज्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि वेट लॉससाठी मदत होते. शरीरातील कॅलरीज जलद बर्न करण्यासाठी पाणी पिणं आवश्यक आहे.
अनेक संशोधनातून असे निदर्शनास आले की, पिण्याचे पाणी ३० टक्क्यांनी चयापचय वाढवू शकतात. जे वजन कमी करण्यास उपयुक्त आहे. जेव्हा आपण पाणी पितो, तेव्हा भुकेवरही नियंत्रण मिळते. ज्यामुळे वेट लॉससाठी मदत होते.'
जेवण्यापूर्वी पाणी प्यावे का?
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, जेवण्यापूर्वी एक ग्लास पाणी पिणे खूप फायदेशीर ठरू शकते. असे केल्याने आपण अन्न कमी प्रमाणात खातो. कारण पाणी पिऊन आपलं पोट बऱ्यापैकी भरतं. जर आपण नियमित व्यायाम करत असाल तर, व्यायाम करतानाही पाणी पीत राहा. पुरेसे पाणी प्यायल्याने कार्यक्षमता वाढते. हायड्रेटेड राहिल्याने स्नायूंचे कार्य वाढते, ज्यामुळे जास्त कॅलरी बर्न होतात.
कोरियन मुली तांदुळाच्या पाण्याचा करतात 'असा' वापर; तुकतुकीत - चमकती त्वचा हवी असेल तर..
वेट लॉससाठी दिवसभरात नेमकं किती पाणी प्यावं?
आता प्रश्न असाल आहे की, वेट लॉससाठी दिवसभरात नेमकं किती पाणी प्यावं? डॉक्टरांच्या मते, प्रत्येक व्यक्तीचे वय आणि शारीरिक हालचाल वेगवेगळी असते, त्यामुळे प्रत्येकाचे पाणी पिण्याचे प्रमाण वेगळे असू शकते. मोठ्यांनी दिवसभरात किमान २-३ लिटर पाणी प्यावे. जर आपल्याला वेट लॉस करायचं असेल तर, ४ लिटर पाणी प्यावे. जेणेकरून वेट लॉससाठी मदत होईल.
वेट लॉस करायचं असेल तर, 'या' पद्धतीने पाणी पिणे टाळा
आयुर्वेद डॉक्टर.नेटच्या रिपोर्टनुसार वजन कमी करण्यासाठी उभे राहून पाणी पिऊ नये. यासाठी मलासनात बसून पाणी प्यावे. यासह एकाच वेळी पाणी पिऊ नये. हळूहळू पाणी प्या. आता काही दिवसात हिवाळा सुरु होईल. हिवाळ्यात नेहमी साधं किंवा कोमट पाणी प्या.