Join us  

वजन कमी करण्यासाठी दिवसातून किती लिटर पाणी प्यावे? पाणी प्यायल्याने खरंच वजन कमी होते?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2023 3:56 PM

How Drinking More Water Can Help You Lose Weight जास्त पाणी प्यायल्याने लठ्ठपणा कमी होतो? तज्ज्ञ सांगतात काय खरं काय खोटं..

वजन कमी करणं हे एखाद्या टास्कपेक्षा कमी नाही. वजन कमी करण्याचे अनेक फंडे बाजारात उपलब्ध झाले आहेत. जिम, योग, डाएट या सगळ्या उपायांना फॉलो करून लोकं वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असतात. पण या सगळ्या गोष्टी करून भूक कंट्रोल करण्यासाठी पाणी पिण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात.

जास्त पाणी प्यायल्याने जास्त कॅलरीज बर्न होतात. यासह भूक देखील कमी लागते. पण वजन कमी करण्यासाठी पाणी खरंच मदत करते का? जास्त पाणी प्यायल्याने खरंच वजन कमी होते का?(How Drinking More Water Can Help You Lose Weight).

यासंदर्भात, बँगलोरस्थित अपोलो हॉस्पिटलचे मुख्य क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट डॉ. प्रियंका रोहतगी सांगतात, 'काही लोकं वजन कमी करण्यासाठी वॉटर फास्टिंग करतात. ज्यात पाण्याशिवाय काहीही खात किंवा पीत नाही. पण यामुळे इतरही समस्या उद्भवू शकतात. शरीरात अचानक भरपूर पाणी शिरल्यामुळे सोडियमची मोठी कमतरता निर्माण होते. या कारणामुळे अनेकांचा मृत्यूही झाला आहे. त्यामुळे तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच वॉटर फास्टिंग करावे'.

व्यायाम - डाएट करूनही तिशीनंतर वजन कमी का होत नाही? ५ कारणं, वेळीच बदला नाहीतर..

वजन वाढण्यामागे मुख्य कारण अनहेल्दी लाईफस्टाईल आहे. वेळेवर जेवण न करणे, उलट - सुलट फास्ट फूड खाणे, व्यायाम न करणे, पुरेशी झोप न घेणे, स्ट्रेस यासह इत्यादी कारणांमुळे वजन झपाट्याने वाढते. जर या गोष्टी सुधारल्यास वजन कमी होऊ शकते. जर आपण स्वतःला पाणी पिण्याची सवय लावली, तर यामुळे भूक कमी लागू शकते. खाण्याची इच्छा कमी होते. ज्यामुळे कॅलरीज कमी होतात.

रिसर्च काय सांगते..

हेल्थलाइन या वेबसाईटवरील माहितीनुसार, 'जेव्हा एखादी व्यक्ती जास्त पाणी पिते तेव्हा, १० मिनिटात कॅलरीज बर्नची तीव्रता २४ ते ३० टक्क्यांनी वाढते. ज्या स्त्रियांचे वजन खूप जास्त आहे. त्यांचे एका वर्षात २ किलोपेक्षा जास्त वजन कमी झाले. त्या दिवसातून फक्त एक लिटरहून जास्त पाणी प्यायचे.

झटपट वजन कमी करायचंय? ५ गोष्टी करा - जिम लावायची गरज नाही इतका वाढेल फिटनेस

तर काही लोकांच्या म्हणण्यानुसार जेवण करण्यापूर्वी पाणी प्यायल्याने भूक कमी लागते. पाण्यामध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी असते. ते फक्त पोट भरून ठेवण्यास मदत करतात. ज्यामुळे आपल्याला वारंवार भूक लागत नाही.

टॅग्स :पाणीवेट लॉस टिप्सफिटनेस टिप्सहेल्थ टिप्सआरोग्य