वजन भराभर वाढतं... मात्र वेटलॉस करताना पुरती दमछाक होऊन जाते. एकेक इंच वजन उतरविण्यासाठी कसा आणि किती व्यायाम (exercise/ workout) करावा लागतो, हे वेटलॉस करणाऱ्या व्यक्तीलाच माहिती. बरं वजन कमी करण्यासाठी त्या व्यक्तींनी केवळ व्यायामच केलेला नसतो. तर तोंडावर, जिभेवरही मोठा कंट्रोल ठेवलेला असतो. खूप महिन्यांपासून नियमितपणे डाएट आणि रेग्युलर वर्कआऊट असं रुटीन पाळून जेव्हा आपण खरोखरंच आपल्याला अपेक्षित असणाऱ्या स्टेजवर येतो, तेव्हा तो आनंद अतिशय सकारात्मक असतो.
तुमचंही असंच झालं असेल आणि आपण किती मोठा वेटलॉस करू शकलो, या आनंदात तुम्ही असाल, तर वेळीच सावध व्हा. कारण हाच तर एक महत्त्वाचा पॉईंट असतो, ज्यावेळी कमी झालेलं तुमचं वजन पुन्हा वेगाने बाऊन्स बॅक करत वाढू शकतं. कारण वजन अपेक्षेनुसार कमी झालं आहे, असं स्वत:ला समजावून सांगत आपण अनेक बाबतीत एकदम रिलॅक्स होऊन जातो. नेमकं इथेच चुकतं आणि वजनाचा काटा पुन्हा भराभर उजवीकडे धावायला लागतो. म्हणून जेव्हा भरपूर वेटलॉस करून तुम्ही या पॉईंटला येता तेव्हा या काही गोष्टी फॉलो करा...
या गोष्टींची काळजी घ्या....
१. खाण्यावर कंट्रोल ठेवा..
control your diet
आताच कुठे आपण वजन कमी केलं आहे, ते एवढ्यात कसं वाढणार असं वाटून जर जिभेवरचा ताबा सोडाल, तर पस्तवाल... म्हणूनच वजन कमी केल्यानंतर सगळ्यात आधी जिभेवर कंट्रोल ठेवा. वेटलॉसमध्ये जो डाएट फॉलो करायचात, तोच डाएट वेटलाॅसनंतरही तसाच चालू ठेवा.
२. व्यायाम विसरू नका
don't forget regular workout
वेटलॉस झाला आहे म्हटल्यावर साहजिकच आपण आपल्या व्यायामाबाबत थोडं निष्काळजी होतो. पण हाच पॉईंट आहे, जिथे मनावर ताबा ठेवा. कितीही कंटाळा आला तरी व्यायामाचं रुटीन मात्र अजिबात सोडू नका.
३. वजन वारंवार चेक करा
check your weight regularly
वजनाचा काटा तुमच्या जवळ नेहमीच ठेवा. आठवड्याचा एका दिवस ठरवून घ्या आणि त्या दिवशी न चुकता वजन करा. वजनात होणारे सुक्ष्म चढ उतारही व्यवस्थित टिपून ठेवा. जेणेकरून आपलं रुटीन चुकतंच की बरोबर मार्गाने जात आह हे लक्षात येईल.