Join us

उन्हाळ्यात कधी आणि किती वेळ चालणं योग्य ठरतं? व्यायाम करण्याच्या नादात आजारी पडून बसाल घरात..

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 17:29 IST

Walking In Summer : अनेकांना असा प्रश्न पडतो की, उन्हाळ्यात कधी चालावं आणि किती वेळ चालावं? याच प्रश्नाचं उत्तर..

Walking In Summer : उन्हाळ्यात आरोग्याची अधिक काळजी घ्यावी लागते. कारण तापमान वाढलं की, थकवा आणि शरीरात पाणीही कमी होण्याचा धोका वाढतो. अशात सकाळी फिरायला जाणं खूप फायदेशीर ठरू शकतं. सकाळी पायी चालल्यानं फ्रेशही वाटतं. मात्र, अनेकांना असा प्रश्न पडतो की, उन्हाळ्यात कधी पायी चालावं आणि किती वेळ चालावं? याच प्रश्नाचं उत्तर आज आम्ही सांगणार आहोत.

उन्हाळ्यात पायी चालण्याची योग्य वेळ

उन्हाळ्यात पायी चालण्यासाठी सकाळची वेळ सगळ्यात बेस्ट मानली जाते. कारण यावेळी वातावरण जरा थंड असतं आणि फ्रेश असतं. दिवसांमध्ये सामान्यपणे सकाळी ५ ते ७ वाजता दरम्यान चालण्याचा सल्ला दिला जातो. यावेळी हलका सूर्यप्रकाश असतो, ज्याद्वारे व्हिटॅमिन डी सुद्धा मिळतं. तसेच सकाळी उन्ह कमी राहतं त्यामुळे उन्ह सुद्धा लागत नाही.

किती वेळ चालावं?

उन्हाळ्यात सामान्यपणे रोज २० ते ३० मिनिटं चालावं असं मानलं जातं. हळूहळू चालण्याची वेळ वाढवू शकता. ही वेळ वाढवून ३० ते ६० मिनिटं करावी. आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे जेवढं शक्य आहे किंवा सहन होतं तेवढंच चालावं. उन्हाळ्यात पायी चालण्याचे फायदे

१) थंडावा आणि फ्रेश

सकाळी वातावरण दुपारपेक्षा थंड असतं. त्यामुळे पायी चालण्यासाठी सकाळची वेळ बेस्ट मानली जाते. पायी चालल्यानं शरीराला ऊर्जा मिळते आणि दिवसभर फ्रेशही वाटतं.

२) वजन कमी होतं

रोज सकाळी पायी चालल्यानं मेटाबॉलिज्म बूस्ट होतं आणि शरीरातील एक्स्ट्रा कॅलरी बर्न होतात. यानं वजन कमी करण्याचा प्रोसेस वेगानं होते.

३) हृदय निरोगी राहतं

नियमितपणे पायी चालल्यानं ब्लड प्रेशर संतुलित राहतं आणि हृदयरोगांचा धोकाही कमी होतो. सकाळची फ्रेश हवा हृदयासाठी फायदेशीर ठरते. तसेच मनाला शांतता सुद्धा मिळते.

४) मानसिक शांतता, तणाव कमी होतो

रोज सकाळी थोडा वेळ पायी चालल्यानं तणाव कमी होतो आणि मनाला शांतात मिळते. पायी चालताना निसर्गासोबत वेळ घालवल्यानं मनाला आराम मिळतो.

५) पचन तंत्र मजबूत होतं

सकाळी पायी चालल्यानं पचन तंत्र सक्रिय होतं आणि बद्धकोष्ठतेची समस्याही दूर होते. पायी चालणं तुमच्या पोटासाठी खूप फायदेशीर ठरतं. 

टॅग्स :फिटनेस टिप्सहेल्थ टिप्स