डायबिटीस (Diabetes) हा जीवनशैलीशी निगडीत एक आजार आहे जो जगभरातील लोकांमध्ये वेगानं वाढत आहे. या आजारात फास्टींग ब्लड शुगरपासून जेवल्यानंतरच्या शुगर लेव्हलपर्यंत संतुलन ठेवणं फार महत्वाचं असतं. (Walk after eating to reduce blood sugar) संतुलित आहाराबरोबरच वॉकिंगसुद्धा तितकंच महत्वाचं असतं. पायी चालल्यानं शुगर कमी केली जाऊ शकते का असा प्रश्न उपस्थित होतो. (How long to walk to lower blood sugar)
पायी चालल्यानं शुगर कमी होते का?
अमेरिकन डायबिटीस असोशिएशननुसार डायबिटीसच्या रुग्णांनी सक्रिय राहणं फार महत्वाचं आहे. अधिक सक्रिय राहील्यास डायबिटीसचा धोका कमी असतो. तुम्ही जितंक जास्त चालाल तिचकंच शुगर लेव्हल कमी राहण्यात मदत होते.
१) जलद गतीने चालणे स्वादुपिंडाच्या पेशींना जलद काम करण्यास मदत करते.
२) ही पद्धत साखरेचे चयापचय गतिमान करते आणि अन्नातून साखरेचे जलद पचन करून, रक्तातील त्याची पातळी वाढण्यापासून रोखते.
३) चालण्याने नेहमी साखर नियंत्रित राहण्यास मदत होते.
डायबिटीस असल्यास किती चालायला हवं?
अमेरिकन डायबिटीज असोसिएशनच्या मते, दररोज 10,000 पावले किंवा किमान 30 मिनिटे चालणे आपल्याला साखर नियंत्रित करण्यास मदत करू शकते. तुम्हाला एकावेळी 30 मिनिटे चालणे कठीण वाटत असल्यास, दिवसभर सकाळी, दुपार आणि संध्याकाळी 10 मिनिटे चालण्याचा प्रयत्न करा.
या दरम्यान आहारावर नियंत्रण ठेवा, विशेषत: कार्बोहायड्रेट जे पचण्यासाठी जास्तीत जास्त चालणे आवश्यक आहे. त्यामुळे मधुमेही रुग्ण सकाळी किंवा संध्याकाळी वेळ काढून चालण्याचा प्रयत्न करतात. या दरम्यान तुम्ही या वेगाने सतत चालायचे आहे आणि ही समस्या नेहमी नियंत्रणात ठेवावी.