Lokmat Sakhi >Fitness > How to lose weight Faster : फक्त ३ महिन्यात पोटाचा वाढलेला घेर होईल कमी; हे घ्या फिगर मेंटेन ठेवण्याचे सोपे उपाय

How to lose weight Faster : फक्त ३ महिन्यात पोटाचा वाढलेला घेर होईल कमी; हे घ्या फिगर मेंटेन ठेवण्याचे सोपे उपाय

How to lose weight Faster :  रातोरात तुम्ही बारीक होऊ शकत नाही त्यासाठी काही महिने तुम्हाला व्यायाम आणि आहारावर  पुरेपूर लक्ष द्यायची गरज आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2021 07:28 PM2021-11-28T19:28:12+5:302021-11-28T19:43:19+5:30

How to lose weight Faster :  रातोरात तुम्ही बारीक होऊ शकत नाही त्यासाठी काही महिने तुम्हाला व्यायाम आणि आहारावर  पुरेपूर लक्ष द्यायची गरज आहे.

How to lose weight Faster : Weight loss guaranteed stomach will be inside in 3 months just follow these3 effective tips | How to lose weight Faster : फक्त ३ महिन्यात पोटाचा वाढलेला घेर होईल कमी; हे घ्या फिगर मेंटेन ठेवण्याचे सोपे उपाय

How to lose weight Faster : फक्त ३ महिन्यात पोटाचा वाढलेला घेर होईल कमी; हे घ्या फिगर मेंटेन ठेवण्याचे सोपे उपाय

सुंदर दिसण्यासाठी स्लिम-ट्रिम आणि मस्क्युलर बॉडी असावी असं प्रत्येकालाच वाटतं, मात्र अनियमित आहार आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे अनेकांची ही इच्छा पूर्ण होत नाही. (Weight Loss Tips)  आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की सुंदर आणि टोन्ड बॉडी मिळणे फार कठीण नाही. त्यासाठी फक्त प्रबळ इराद्याची गरज आहे.  रातोरात तुम्ही बारीक होऊ शकत नाही त्यासाठी काही महिने तुम्हाला व्यायाम आणि आहारावर  पुरेपूर लक्ष द्यायची गरज आहे. म्हणून आज या लेखात वजन ३ महिन्यात कमी करण्यासाठी काही महत्वाच्या टिप्स सांगणार आहोत. (How to lose weight Faster)

कॅलरीज इनटेक कमी ठेवा

वजन कमी करण्याची पहिली अट म्हणजे कॅलरीज कमी करणे. म्हणूनच कमी उष्मांक असलेले अन्न खावे. नाश्त्यात ओट्स, दुपारच्या जेवणात डाळ रोटी, रात्रीच्या जेवणातही सॅलेड, सूप असा हलका आहार घ्या.  आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, एकदा  तुम्हाला तुमची दैनंदिन कॅलरीज इनटेकची माहिती कळली की, वर्कआउट सुरू करण्याची किंवा काही फिटनेस एक्टिव्हिटीजमध्ये गुंतण्याची वेळ आली आहे. अशा स्थितीत स्वतःसाठी असे काही उपक्रम निवडा. ज्यामुळे तुम्हाला खूप बरे वाटेल. यासाठी तुम्ही तुमच्या दैनंदिन दिनचर्येत जिमिंग किंवा कोणताही खेळ खेळू शकता.

रोज १० हजार पाऊल चालून कॅलरीज बर्न करण्याचा प्रयत्न करा

फिटनेस तज्ज्ञांच्या मते, वजन कमी करण्याच्या प्रवासात पुढे जाण्यासाठी तुम्हाला आणखी एक महत्त्वाची गोष्ट करावी लागेल. तंदुरुस्त राहण्यासाठी दररोज सुमारे 10 हजार पावले चालणे खूप महत्वाचे आहे. हा एक अतिशय सोपा व्यायाम आहे आणि तुम्हाला दररोज सुमारे 400 ते 500 कॅलरीज बर्न करण्यात मदत होईल. म्हणूनच एखाद्या व्यक्तीने दररोज 10,000 पावले चालणे आवश्यक आहे, जेणेकरून तुम्ही नेहमी तंदुरुस्त राहाल.

इतर उपाय

१) सकाळी उठून रिकाम्या पोटी १-२ ग्लास पाणी प्या, यामुळे चयापचय वाढेल.

२) जेवणाच्या अर्धा तास आधी पोटभर पाणी प्या, जास्त खाण्याची इच्छा कमी होईल.

३) जास्त तेलकट पदार्थ, बर्गर, पिझ्झा, चीज इत्यादी खाणे टाळा.

४) साखरयुक्त पदार्थांचा वापर कमीत कमी करा, कारण त्यामुळे वजन झपाट्याने वाढते.

५) बसून हळूहळू खाण्याची सवय लावा, त्यामुळे अन्न पचते आणि काही वेळाने भूकही लागणार नाही.

६) तुमचे घर 4-5 मजल्यांवर असेल तर लिफ्टऐवजी पायऱ्या वापरा.

Web Title: How to lose weight Faster : Weight loss guaranteed stomach will be inside in 3 months just follow these3 effective tips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.